तुम्ही सोशल मीडियात तुमचे फोटो पोस्ट करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजेंस या गोष्टीबद्दल अधिक पुढे गेली असून कोणीही तुमचा फोटो अवघ्या काही मिनिटांमध्ये बनावट फोटो बनवू शकतो. त्याला डीप फेक असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की, असे फोटो किंवा व्हिडिओ ज्यामध्ये चेहरा आणि शरिर तुमचेच दिसते पण खरंतर ते तुमचे नसते. (Fake Photo)
उदाहरणार्थ, तुम्ही घरातील खुर्चीवर बसून फोटो काढला असेल पण डीप फेकच्या माध्यमातून तो एडिट करुन एखाद्या क्लब, सिनेमागृह किंवा खेळाच्या मैदान किंवा एखाद्या परदेशातील फोटो असल्याचे सुद्धा दाखवले जाऊ शकते. याच्या माध्यमातून तुम्हाला लहान मुल, वृद्ध किंवा दुसऱ्या लिंगाच्या चेहऱ्याच्या रुपात ही दाखवले जाऊ शकते. हे असे फोटो असतात जे कोणीही एडिट सहज करु शकत नाहीत.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञान विकसित होण्यासह आज इंटरनेटवर असे काही फोटो आणि व्हिडिओसाठी एडिंट अॅप उपलब्ध आहेत जे डीप फेकच्या माध्यमातून डीप फेक बनवू शकतात.

कशा पद्धथीने डीप फेक बनवला जातो
कोणत्याही व्यक्तीचा डीप फेक बनवण्यासाठी त्याचे ५ किंवा त्याहून अधिक फोटोंची आवश्यकता असते. नंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंस या फोटोचा अभ्यास करुन त्यांना सॉफ्टवेअरच्या रुपात स्टोर करतात. असे केल्यानंतर जेवढे पाहिजे तेवढे डीप फेक बनवता येऊ शकतात. ज्यामध्ये तुम्ही असाल पण वेळ आणि स्थिती काय असेल हे तुम्हाला सुद्धा माहिती नसते.
हे देखील वाचा- २०२३ मध्ये लॅबमध्ये जन्म घेतील मुलं तर जगात लाखो जणांचा होणार मृत्यू, बाबा वेंगांची भविष्यवाणी
यापासून बचाव करण्यासाठी काय करावे?
सध्या सर्वात प्रथम उत्तम उपाय म्हणजे तुम्ही तुमचे सोशल मीडियातील सर्व फोटो काढून टाका. हा उत्तम मार्ग आहे. परंतु नेते मंडळी आणि सेलिब्रेटिज यांच्यासह काही सामान्य लोकांना असे करणे संभव नसते. असे सुद्धा असते की, तुमच्या एखाद्या मित्राने तुमचे फोटो त्याच्या पेजवर शेअर केले असतील तर ते तुम्ही स्वत: सुद्धा हटवू शकत नाहीत.(Fake Photo)
डीप फेक तंत्रज्ञान विकसित होण्यासह लोकांचा यापासून बचाव व्हावा यासाठीच्या सुद्धा तंत्रज्ञानावर काम सुरु आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअयर अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत ज्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून छेडछाड करण्यात आलेल्या फोटोंमध्ये स्वत:हून वॉटरमार्क येईल. मात्र यासाठी थोडा वेळ लागणार आहे.