तुमच्या खात्यावर पीएफच्या व्याजाची रक्कम दिसत नाहीय? जर तुम्हाला सुद्धा पीएफच्या व्याजाचे पैसे मिळत नसतील तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. खरंतर ईपीएफओने असे म्हटले आहे की, अखेर तुमच्या खात्यात ही रक्कम का दिसत नाहीय. अर्थमंत्रालयाने याबद्दलच आपले स्पष्टीकरण दिले आहे. (EPFO Update)
अर्थ मंत्रालयाने दिली माहिती
अर्थ मंत्रालयाने एक ट्विट करत त्याला तांत्रिक बिघाड असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने माहिती देत असे म्हटले की, पीएफवरील सेविंगवर टॅक्सेशन कायद्यात बदलावासाठी सॉफ्टवेअर अपग्रेडच्या कारणास्तव ग्राहकांना व्याजाचे क्रेडिट दिसत नाही आहे. मात्र तरीही कोणत्याही ग्राहकाच्या व्याजाचे नुकसान झालेले नाही. व्याज सर्व ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात जमा केली जात आहे. दरम्यान, ईपीएफओ द्वारे लागू करण्यात आलेल्या एका सॉफ्टवेअ अपग्रेडला लक्षात घेता ते दिसत नाही आहे.
दरम्यान, इंफोसिस टेक्नॉलॉजीजचे माजी निर्देशक मोहनदास पई यांच्या एका ट्विटला उत्तर देत अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने आणखी एका ट्विट मध्ये म्हटले की, सर्व निवर्तमान ग्राहकांसाठी पेमेंटची मागणी आणि काढण्याची मागणी करणाऱ्या ग्राहकांना व्याजासह पैसे दिले जात आहेत. (EPFO Update)
मोहनदास पई यांनी केले ट्विट
खरंतर यापूर्वी मोहनदास पई यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमम, पंतप्रधान कार्यालय आणि पीएम मोदी यांना टॅग करुन एक ट्विट केले होते. त्यामध्ये ईपीएफओ माझे व्याज कुठे आहे असा प्रश्न विचारला होता.
हे देखील वाचा- 5G सुविधेचे फायदे-तोटे तुम्हाला माहितेयत का? जाणून घ्या अधिक
यावेळी दिले जात आहे कमी व्याज
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ईपीएफ ग्राहकांना त्यांच्या निवृत्त सेविंग अकाउंट्समध्ये २०२१-२२ साठी ८.१ टक्क्याने व्याज मिळणार आहे. यापूर्वी यंदाच्या वर्षात मार्च महिन्यात ईपीएफओने २०२०-२१ मध्ये ईपीएफच्या जमा रक्कमेवर ८.५ टक्के कमी करत २०२१-२२ साठी ८.१ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच पेमेंटसाठी उशिर होण्यापासून बचाव करण्यासाठी व्याजाचा ६०-६५ पैसा सुरक्षिततेच्या उपायांसह एका महिन्याच्या आतमध्येच क्रेडिट केली जाऊ शकते. शिल्लक पैसा अर्थमंत्रालयाच्या परवानगीनंतर क्रेडिट केला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षात ईपीएफओने आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुधारणा करण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. मात्र याला प्रोफेशनल मॉर्डन सोसायटीच्या रुपात बदलण्यासाठी राजकीय निर्णयांची सुद्धा गरज आहे. याला ऑटोनोमस ऑर्गेनाइजेशन बनवण्याची गरज आहे.