Entertainment : मनोरंजन क्षेत्रातही वाद आणि घोटाळ्यांचा विषय सर्वसामान्य आहे. कलाकारांमध्ये कथित रुपात वाद, गुपचुप विवाह ते अफेअरपर्यंतच्या सर्व गोष्टींची चर्चा केली जाते. पण सिनेसृष्टीतील घोटाळे काही काळानंतर विसरले जातात. पण असाच एक वाद जॅक श्रॉफ आणि तब्बू संदर्भात आह. तब्बू भारतीय सिनेमातील सर्वप्रथम प्रसिद्ध आणि विश्वासू अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तुम्हाला माहितेय का, तब्बूने जॅकी श्रॉफला सोडून इंडस्ट्रीमधील सर्व अभिनेत्यांसोबत काम केले आहे. यामागील कारण म्हणजे एक काळ असा होता जेव्हा तब्बूसोबत जॅकी श्रॉफने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता.
जॅकी श्रॉफचा तब्बूला किस करण्याचा प्रयत्न
वर्ष 1986 मधील घटना आहे, जेव्हा जॅकी तब्बूची मोठी बहिण फराह नाजसोबत दिलजला सिनेमात काम करत होता. त्यावेळी तनुजा आणि डॅनी डेन्जोंगपाही सिनेमात होते. संपूर्ण क्रू मॉरिशसमध्ये शूटिंग करत होता. तेव्हा तब्बू तरुणी होती आणि बहिणीसोबत शूटिंगसाठी आली होती. शूटिंगवेळी डॅनीने एका पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी सिनेमातील क्रू ला देखील बोलावण्यात आले होते.
पार्टीवेळी जॅकी श्रॉफने तब्बूला किस करण्याचा प्रयत्न केला. खरंतर, जॅकी तेव्हा दारुच्या नशेत होते. तब्बूने याचा विरोधही केला. यावेळी डॅनीने स्थिती सांभाळली आणि तब्बूपासून जॅकीला दूर नेले.
फराज नाजने केला हंगामा
पार्टीच्या रात्री डॅनीने सर्वकाही सांभाळले. पण दुसऱ्या दिवशी तब्बूची बहिण फराह नाजने यावरुन खूप हंगामा केला. फराहने मीडियासमोर जाऊन जॅकीवर काही आरोप लावले. यावर तब्बूने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा फराहने प्रकरण संपल्यानंतर त्यामध्ये गैरसमज झाल्याचे म्हटले. पण आतापर्यंत तब्बूने जॅकी श्रॉफ सोबत कधीच काम केले नाही. (Entertainment)
तब्बूचे बॉलिवूडमधील करियर
तब्बू बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तब्बूचे नेहमीच तिच्या भूमिकेसाठी कौतुक केले जाते. अभिनेत्रीने वयाच्या 11 व्या वर्षात बाजार सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी हम नौजवानमध्ये देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. तब्बू वर्ष 1994 मधील विजयपथ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही.