Home » इलॉन मस्कची कमाल

इलॉन मस्कची कमाल

by Team Gajawaja
0 comment
Elon Musk And Space X
Share

अब्जाधीश इलॉन मस्क याला एका वेडानं पछाडलं आहे, ते वेड म्हणजे, अंतराळात पर्यटन सुरु करण्याचं, आणि मंगळ ग्रहावर वसाहत निर्माण करण्याचे आहे. या वेडापोटी इलॉन मस्कनं आत्तापर्यंत किती खर्च केला आहे, याची नोंद नाही. त्याला अपयशही आलं, पैसे बुडाले. पण मस्क आपल्या निर्धारावर ठाम राहिला. त्याचा हाच विश्वास आता अभियांत्रिकी विश्वातल्या एका स्वप्नाला खरं करुन गेला आहे. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीने पुन्हा पुन्हा वापरता येणारे स्पेसशिप डिझाइन केले आहे. यातून अंतराळात गेल्यानंतर अंतराळवीर सहज पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकतात. जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट म्हणून त्याची नोंद झाली आहे. या स्टारशिपची 5वी चाचणी यशस्वी झाली आहे. ‘SpaceX’ ने आपले सुपर हेवी बूस्टर रॉकेट आतापर्यंतच्या सर्वात साहसी चाचणी उड्डाणात लॉन्च केले. यानंतर, आकाशात पाठवलेले सुपर हेवी बूस्टर लाँचपॅडवर परत आणले गेले, जे दोन धातूच्या हातांमध्ये अलगद पकडले गेले. हा सगळा सोहळा जगभरातील लाखो लोक बघत होते. सातमजली इमारतीएवढे हे रॉकेट पृथ्वीकडे सरकू लागले आणि हा सोहळा बघत असलेल्या हजारो लोकांच्या तोंडातून आनंदाचे चित्कार निघत होते. (Elon Musk And Space X)

जेव्हा हे रॉकेट धातूच्या दोन्ही हातांमध्ये सामावले गेले, तेव्हा हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून या मानवी करामतीचे अभिनंदन केले. इलॉन मस्कचा हा विजय आहेच, सोबत आधुनिक अभियांत्रिकी शास्त्राचेही हे यश मानले जाते. या रॉकेटच्या यशस्वी चाचणीनंतर अंतराळातील रहस्य भेदण्यासाठी मानवानं आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे. इलॉन मस्कनं अंतराळात आपले राज्य चालवण्याच्या दिशेनं केलेली वाटचाल यशस्वी होई लागली आहे. त्याच्या SpaceX ने तयार केलेल्या स्पेसशिपनं अवकाशाला यशस्वी गवसणी घातली आहे. हे रॉकेट अंतराळात गेल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येऊ शकणार आहे. 2008 पासूनच इलॉन मस्कची SpaceX अंतराळात प्रवास सुरु करण्यासाठी काम करत आहे. इलॉन मास्क या अंतराळात जाण्याच्या कल्पनेनं एवढा पछाडलेला आहे की त्यानं अब्जो रुपयांची SpaceX मध्ये गुंतवणूक केली आहे. पण आत्तापर्यंत त्याला अपयशच आले आहे. त्याच्या अनेक रॉकेटची उड्डानंही काही सेकंदातच अपयशी होऊन करोडो रुपयांची राख करुन गेली आहेत. मात्र या अपय़शानंतर आता मस्कला सोनेरी दिवस आले आहेत. कारण आता SpaceX ला मानवलाही अंतराळात पाठवणे शक्य होणार आहे. स्टारशिपची ही 5वी उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. अमेरिकेच्या टेक्सास, बोका चिका येथून ही चाचणी झाली. (International News)

यापूर्वी स्पेसएक्सने ही चाचणी चार वेळा केली होती, मात्र ती अयशस्वी ठरली होती. पूर्वीच्या चारही स्टारशिप मेक्सिकोच्या आखातावरून एका वळणावर गेल्या होत्या आणि नंतर त्यात तांत्रिक अडचणी उद्भवल्या. या सर्व स्टारशिप्स उड्डाणानंतर काही क्षणातच खराब झाल्या आणि पृथ्वीवर कोसळल्या आहेत. त्यामुळे मस्कनं या नव्या स्टारशिपसाठी आपली सर्व गुंतवणूक लावली होती. स्टारशिपमध्ये 6 रॅप्टर इंजिन आहेत, तर सुपर हेवी स्टारशिपमध्ये 3 रॅप्टर इंजिन आहेत. त्याची थ्रस्ट पॉवर सामान्य फ्लाइटच्या तुलनेत 700 पट जास्त आहे. त्यामुळेच या यानाच्या यशस्वीतेवरही प्रश्नचिन्ह होते. शिवाय पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यानंतर हिंदी महासागरात नियंत्रित लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा स्टारशिपने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तेव्हा त्याचा वेग 26,000 किलोमीटर प्रति तास होता आणि तापमान 1,430 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचले होते. त्यानंर त्याच्यासाठी उभारण्यात आलेल्या लॉंचपॅडमधील दोन धातूंच्या हातामध्ये ते सहजरित्या सामावले. (Elon Musk And Space X)

======

हे देखील वाचा :  चंद्रग्रहण आणि सुपरमून

======

ही चाचणी यशस्वी झाल्यावर इलॉन मस्कनं याचं सर्व श्रेय अभियांत्रिकी दलाला दिले आहे. अभियांत्रिकीसाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याची प्रतिक्रीया त्याने SpaceX मुख्यालयातून दिली आहे. स्टारशिप सिस्टम पूर्णपणे पुन्हा वापरण्यायोग्य आहे. या यानाची उंजी 397 फूट असून ते 150 मेट्रिक टन भार वाहून नेण्यास सक्षम आहे. स्टारशिप सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की ती एकावेळी 100 लोकांना मंगळावर नेऊ शकते. यामुळे मंगळावर वस्ती स्थापन करण्याचे इलॉन मस्कचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.