आपल्या हिंदू लोकांमध्ये कोणतीही धार्मिक पूजा नारळाशिवाय निव्वळ अपूर्ण असते. अनेक लोकंच्या घाट तर कायम देवघरात कलश ठेवलेला असतो. कलश अर्थात नारळ आलेच. नारळाला आपल्याकडे शुभ मानले जाते, त्यामुळे नारळाचा वापर पूजेत अपरिहार्य असतो. आपल्याला पूजेसाठी नारळ आणायला सांगितले की, आपण जातो आणि घेऊन येतो. मात्र तुम्ही कधी नारळाचे नीट निरीक्षण केले आहे का? आता तुम्ही म्हणाल नारळा सारखा नारळ त्यात काय निरीक्षण करायचे. फक्त त्यात पाणी आहे की नाही हे तेवढं बघायचे. पण असे नाही. नारळामध्ये बरेच प्रकार आहेत. यातलाच एक नारळ म्हणजे एकाक्षी नारळ. अनेकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले असावे. हे नारळ तसे दुर्मिळ असते पण काहींनी हे नारळ पाहिले देखील असावे. एकाक्षी हे नारळ धार्मिक पूजेमध्ये अतिशय महत्वाचे असते. जर या नारळाची पूजा केली तर याचे अनेक उत्तम लाभ आपल्याला होतात. एकाक्षी नारळाची संपूर्ण माहिती आपण पाहूया. (Marathi News)
एकाक्षी नारळ हा अतिशय खास आणि अत्यंत दुर्मिळ नारळ आहे. मग एकाक्षी नारळ म्हणजे काय? तर असा नारळ ज्याला फक्त एकच डोळा (अक्ष) असतो अशा नारळाला एकाक्षी नारळ म्हटले जाते. या नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तो घरात ठेवल्याने धन-संपत्ती, सुख-समृद्धी येते, दरिद्रता दूर होते. याची घरात पूजा करून देव्हाऱ्यात किंवा तिजोरीत स्थापना केल्यास अनेक चांगले फायदे होतात असे मानले जाते. एकाक्षी अर्थात एकमुखी नारळ हा लक्ष्मीचा दाता आहे, असे म्हटले जाते आणि ज्याच्याकडे असेल त्याला धन-दौलत कधी कमी पडत नाही. (Todays Marathi Headline)
नारळाची शेंडी काढली तर त्याच्या तळाशी तीन छिद्रे दिसतात. या तीन छिद्रांपैकी दोन छिद्रांना डोळे आणि एकाला नारळाचे तोंड म्हटले जाते. अशा प्रकारच्या नारळात तीन उभ्या रेषा दिसतात. पण, एकाक्षी नारळात फक्त दोन छिद्रे असतात, त्यापैकी एक तोंड आणि एक डोळा मानला जातो. हे नारळ आकाराने खूपच लहान असते आणि त्यात दोन उभ्या रेषा असतात. एकाक्षी नारळालाच श्रीफळ म्हटले जाते. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून अशा एकाक्षी नारळाला खूप मागणी आहे, पण तसा नारळ सापडणे अत्यंत दुर्मिळ आहे. मात्र आजच्या काळात पैशाच्या मोहामुळे अनेक लोकं बनावट एकाक्षी नारळ तयार करून विकतात. (Top Marathi News)
जर तुम्ही नशीबवान असाल आणि जर तुम्हाला खरा एकाक्षी नारळ मिळाला तर तो नारळ होळी, दिवाळी, सूर्य-चंद्रग्रहण, रवि-गुरु पुष्य नक्षत्र, अक्षय तृतीया, आवळा नवमी, दसरा, नवरात्री आदी शुभ प्रसंगी त्याची षोडशोपचारात पूजा करून लाल रेशमी वस्त्रात त्याला बांधून ठेवा. त्यानंतर तो आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे लक्ष्मीची पूर्ण कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. (Latest Marathi News)
एकाक्षी नारळाचे फायदे
– एकाक्षी नारळामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. ज्या घरात असा नारळ असतो, ते घर सुख आणि संपत्तीने भरलेले असते.
– एकाक्षी नारळामुळे नऊ ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळते. कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात.
– एकाक्षी नारळाचा उपयोग संमोहन आणि वशिकरणातही केला जातो. ज्याच्याकडे हा नारळ आहे तो सर्वांना आकर्षित करतो. ज्या व्यक्तीकडे एकाक्षी नारळ असतो, त्याला कोणीही हानी पोहोचवण्यासाठी केलेल्या तंत्र-मंत्र प्रयत्नांचा उपयोग होत नाही. (Top Trending News)
– व्यवसायाच्या कामात किंवा नोकरीत काही अडथळे येत असतील तर एकाक्षी नारळाची पूजा करून अडथळा दूर होतो.
– जर एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला भूताने झपाटले असेल तर त्याच्या मांडीवर एकाक्षी नारळ ठेवल्याने तो अशा सर्व अडथळ्यांपासून मुक्त होतो. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Narali Purnima : जाणून घ्या नारळी पौर्णिमा सणाचे महत्व
Rakshabandhan : भावा बहिणीचे प्रेमळ नाते अधोरेखित करणारे ‘रक्षाबंधन’
===========
– असे मानले जाते की जर तुम्ही एकाक्षी नारळावर चंदन, केशर, कुंकू मिसळून त्याचा टिळा कपाळावर लावला तर तुम्हाला एका विशिष्ट कार्यात नक्कीच यश मिळते.
– एकाक्षी नारळाला वैवाहिक आनंदाचे प्रदाता म्हटले गेले आहे. असे मानले जाते की ज्या घरात एकाक्षी नारळाची पूजा केली जाते आणि मंत्रांनी सिद्ध केले जाते, त्या घरात सुख राहते. एकाक्षी नारळाच्या शुभ प्रभावामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि सौहार्द कायम राहते. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics