देशाचे मुख्य न्यायाधीश यूयू ललित यांनी आज आपल्या उत्तराधिकारीच्या आधारावर डी.वाय. चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या नावाची सिफारिश सरकारकडे केली आहे. आता जस्टिस डी.वाय.चंद्रचूड देशाते ५० वे मुख्य न्यायाधीश असणार आहेत. जस्टिस यूयू ललित हे यंदाच्या वर्षात ८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. खरंतर वर्ष २०२२ हे सुप्रीम कोर्टासाठी अत्यंत अनोखे वर्ष असणार आहे. यंदा फक्त तीन महिन्यात तीन न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे नेतृत्व करणार आहेत. ऑगस्टमध्ये CJI NV Ramana निवृत्त झाले. त्यानंतर Uday Umesh Lalit यांनी सुप्रीम कोर्ट सांभाळले. आता ते नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार असून त्यांच्या नंतर न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे पुढील सीजीआय असतील. तर कोण आहेत डी.वाय.चंद्रचूड यांच्याबद्दलच अधिक जाणून घेऊयात.
दीर्घकाळ सीजीआय राहिलेले युवी चंद्रचूड यांचा मुलगा डी.वाय. चंद्रचूड
नोव्हेंबर महिन्यात डीवाय चंद्रचूड हे देशातील पुढील मुख्य न्यायाधीश असतील. ते दोन वर्ष या पदावर कार्यरत असतील. फार कमी लोकांना माहिती आहे की, त्यांचे वडिल सुद्धा देशाचे मुख्य न्यायाधीश होते. खरंतर डीवाय चंद्रचूड देशाचे माजी मुख्य न्यायाधीश वाइवी चंद्रचूड यांचा मुलगा आहे. खासियत अशी की, त्यांचे वडिल युवी चंद्रचूड यांच्या नावे दीर्घकाळ देशाचे मुख्य न्यायाधीश राहण्याचा रेकॉर्ड आहे. ते ७ वर्ष ४ महिने मुख्य न्यायाधीश राहिले होते. त्यांना ‘आयरन हँन्ड्स’ च्या नावाने सुद्धा ओळखले जाते.
दिल्ली येथून केलायं कायद्याचा अभ्यास
धनंजय यशवंत चंद्रचूड सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत. यापूर्वी ते इलाहाबाद हाय कोर्टाचे चीफ जस्टिस आणि बॉम्बे हाय कोर्टाचे जज सुद्धा होते.सध्या ते नॅशनल लीगल सर्विस अथॉरिटीचे एग्जीक्युटिव्ह चेरअमन आहेत. डीवाय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ मध्ये झाला होता. त्यांचे वडिल सुद्धा भारताचे माजी मुख्य न्यायाधीश होते. त्यांची आई प्रभा एक शास्रीय संगीतज्ञ आहे. डीवाय चंद्रचूड यांनी सन १९७९ मध्ये दिल्लीतील सेंट स्टीफंस कॉलेजमधून इकोनॉमिक्स आणि गणितात ग्रॅज्युएशन केले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीत लॉ फॅकल्टीमधून लॉ ची डिग्री घेतली आणि हार्वर्ड लॉ स्कू मधून लॉ मध्ये मास्टर्स केले. सन १९८६ मध्ये हार्वर्ड मधूच त्यांनी ज्युरिडिशयल साइंस मध्ये डॉक्टरेट सुद्धा केली. (DY Chandrachud)
हे देखील वाचा- कोण आहेत जस्टीस यू यू ललित?
डीवाय चंद्रचूड यांनीच सुनावला होता ट्वीन टॉवर पाडण्याचा निर्णय
३१ ऑगस्ट २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टात भ्रष्टाचारातून उभारण्यात आलेले ट्वीन टॉवर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा ऐतिहासिक निर्णय न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानेच सुनावला होता. न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले होते की, या टॉवरची निर्मिती नोएडा प्राधिकरण आणि सुपरटेकच्या अधिकाऱ्यांच्या गडबळीमुळेच असा निर्णय घेतला गेला.