Home » एसी मध्ये ही घाम येतो ? असू शकतो हा आजार, काय आहे यावर उपाय ?

एसी मध्ये ही घाम येतो ? असू शकतो हा आजार, काय आहे यावर उपाय ?

by Team Gajawaja
0 comment
sweat
Share

घाम(sweat) येणे हे सामान्यतः निरोगी असण्याचे लक्षण मानले जाते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र जेव्हा ही सामान्य प्रक्रिया असंतुलीत होते, तेव्हा अडचणी निर्माण होतात. काही लोकांमध्ये या असंतुलनामुळे घाम येणे पूर्णपणे थांबते. तर काहींसाठी काहीवेळा अवकाळी पावसाचा प्रसंगही ठरतो.

तुम्हाला माहित आहे का की, जर सामान्य पातळीवर घाम येणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. तर जास्त घाम येणे हे शारीरिक समस्येचे संकेत मानले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, ज्यांना थोड्याशा उष्णतेमध्ये चेहऱ्याला, पाठीला आणि काखेला भरपूर घाम(sweat) येऊ लागतो. उष्णता वाढवल्यानंतर किंवा जास्त व्यायाम केल्यावर हा घाम येत असेल, तर ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु कधीकधी या परिस्थितींव्यतिरिक्त जास्त घाम येणे ही समस्या जाणवू शकते. जास्त घाम येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे आणि त्याची कारणे व उपचार जाणून घेऊया.

एअर कंडिशनरमध्येही घाम येतो 

जास्त घाम येण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत हायपरहाइड्रोसिस म्हणतात. सामान्य परिस्थितीत शरीराचे तापमान बाह्य तापमानानुसार संतुलित ठेवण्यासाठी, घाम ग्रंथींमधून घाम बाहेर येतो. जेव्हा तापमान संतुलित होते, तेव्हा घाम येणे देखील थांबते. परंतु हायपरहाइड्रोसिस असलेल्या लोकांमध्ये असे होत नाही. त्याच्या घामाच्या ग्रंथींना विनाकारण घाम(sweat) येत राहतो. त्यांना एअर कंडिशनरमध्ये बसूनही घाम येतो. त्याच वेळी, काही प्रकरणांमध्ये स्विमिंग पूलमध्ये राहिल्यानंतरही घाम येऊ शकतो.

हायपरहाइड्रोसिसची लक्षणे

हा एक प्रकारचा हायपरहायड्रोसिस आहे, जो प्रामुख्याने हात, पाय, काखेत किंवा चेहरा प्रभावित करतो. त्याला प्राथमिक हायपरहायड्रोसिस म्हणतात. तर, संपूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या मोठ्या भागावर घाम(sweat) येण्याच्या स्थितीला दुय्यम हायपरहायड्रोसिस म्हणतात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात.

=====

हे देखील वाचा – तुम्हाला ‘या’ वेदना होतायत ? सांभाळून असू शकतो ‘हार्ट अटॅक’ चा धोका

=====

जास्त घाम येण्याची कारणे

आकडेवारीनुसार, जगभरातील लाखो लोकांना हायपरहाइड्रोसिसच्या कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा त्रास होऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, जास्त घाम(sweat) येणे हे धोक्याचे लक्षण नाही, तर ही एक समस्या आहे. जी सोप्या उपायांचा अवलंब करून नियंत्रित केली जाऊ शकते. प्राथमिक हायपरहाइड्रोसिस आनुवंशिक देखील असू शकतो. याचा अर्थ असा होऊ शकतो, की तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी ही समस्या होऊन गेली आहे. दुसरीकडे, दुय्यम हायपरहाइड्रोसिस हा गर्भधारणेपासून मधुमेह, थायरॉईड असंतुलन, रजोनिवृत्ती, चिंता, लठ्ठपणा, पार्किन्सन रोग, संधिवात, लिम्फोमा, संधिरोग, संसर्ग, हृदयरोग, श्वसन रोग किंवा जास्त प्रमाणात मद्यपाणाचे सेवन करणे यासारख्या स्थितीमुळे होऊ शकतो. विशिष्ट प्रकारची औषधे, जसे की अल्झायमर रोगासाठी लिहून दिलेली औषधे, एन्टीडिप्रेसंट्स, मधुमेहाची औषधे, काचबिंदूची औषधे इत्यादींमुळे देखील हायपरहाइड्रोसिस होऊ शकतो.

जास्त घाम येणे थांबवण्यासाठी उपचार

जास्त घाम येण्यामुळे ज्या शारीरिक समस्या उद्भवतात त्या आपल्या जागी आहेत. मात्र यामुळे पीडितेला मानसिक स्तरावरही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तो लोकांमध्ये मिसळणे टाळू शकतो, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, त्याच्या शरीराबाबत तो अतिसंवेदनशील बनू शकतो. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्वरित समस्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉक्टर हे उपाय सुचवू शकतात-

– घामाच्या ग्रंथींना संदेश पाठवणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम करणारी काही औषधे किंवा ऍल्युमिनियम असलेले घटक डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले जाऊ शकतात.

– बोटॉक्स इंजेक्शन्स विशेषतः काखेच्या घामासाठी.

– तणाव आणि चिंता दुर करण्यासाठी औषधे.

– काही प्रकरणांमध्ये शेवटचा उपाय म्हणून शस्त्रक्रियेचा वापर.

या गोष्टी लक्षात ठेवा

– तुम्ही या समस्येने त्रस्त असाल, तर स्वत:च्या मनाने पावडर, लोशन, डीओ इत्यादी कोणतेही रसायनयुक्त साधन वापरू नका.

– डॉक्टरांनी सांगितलेले कोणतेही औषध किंवा उपाय, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच मर्यादित कालावधीसाठी वापरा. मनाने या गोष्टींच्या प्रमाणाचा कालावधी वाढवू किंवा कमी करू नका.

– कोणाचेही पाहून किंवा ऐकून स्वतःवर काहीही वापरणे टाळा.

– भरपूर पाणी आणि द्रव आहार घ्या.

– सुती घाम शोषणाऱ्या कपड्यांना प्राधान्य द्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.