हिंदू धर्मात लग्नाला ७ जन्मांचे नाते मानले जाते. असे म्हटले जाते की, जोड्या देव ठरवतो. अशातच हे सुद्धा महत्वाचे आहे की, सर्वांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा. काही वेळेस असे होते की, विवाहानंतर घटस्फोट घेण्याची वेळ येते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, कोणत्या आधारावर घटस्फोटाला मान्यता मिळते आणि कोर्ट तुमच्या निर्णयावर काय ठरवते? (Divorce Law)
हिंदू विवाह अधिनियममध्ये घटस्फोटासाठी ८ आधार ठरवण्यात आले आहेत. म्हणजेच विवाहात जर ८ प्रकारच्या समस्या आल्यास तर त्याच आधारावर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करता येऊ शकतो.
हिंदू विवाह अधिनियम, १९५५ मध्ये विवाहातून मुक्त होण्याचे कारण
हिंदू विवाह अधिनियम १९५५ अंतर्गत विवाहातून मुक्त होण्याची प्रक्रिया दिली आहे. जी हिंदू, बुद्ध, जैन किंवा शीख धर्म मानणाऱ्यांसाठी आहे. या अधिनियमाच्या कलम १३ अंतर्गत काही कारणं असू शकतात.
-व्यभिचार
जर नवरा किंवा बायको यापैकी एकाने जर विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्याला विवाहातून मुक्त होण्याच्या कारणाच्या आधारावर मानले जाईल.
-धर्मांतरण
जर नवरा किंवा बायकोने दुसराच धर्म स्विकारला असेल.
-मानसिक विकार
नवरा किंवा बायको मध्ये कोणतीही मानसिक स्थिती किंवा वेडेपणाचा आजार असेल आणि एकमेकांसोबत राहणे शक्य नसेल.
-विवाह झाला तरीही विवाहबाह्य लैंगिक संबंध
जर नवरा अथवा बायको मध्ये विवाहबाह्य लैंगिंक संबंझ असेल तर त्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज करु शकतो.
–क्रुरता
नवरा किंवा बायको मध्ये त्यांच्या पार्टनरद्वारे शारिरीक, लैंगिक आणि मानसिक रुपात छळ करत असेल तर क्रुरता अंतर्गत घटस्फोट घेऊ शकतो. (Divorce Law)
-सोडून जाणे
जर नवरा अथवा बायको मध्ये एखाद्या पार्टनरने दुसऱ्या पार्टनरला सोडून दिले तर घटस्फोटासाठी अर्ज करु शकतो.
इर्रीट्रीवेबल ब्रेकडाउन ऑफ मॅरेज
अशा वैवाहिक संबंधात काहीच भावना नसतात. त्या दोघांनी एकमेकांसोबत राहणे मानसिक त्रास देते. त्यालाच इर्रीट्रीवेबल ब्रेकडाउन ऑफ मॅरेज असे म्हटले जाते. के. आर. श्रीनिवास कुमार विरुद्ध आर. शमेथा यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विविध न्यायालयीन निर्णयांची तपासणी करत इर्रीट्रीवेबल ब्रेकडाउन ऑफ मॅरेजच्या संविधानातील कलम १४२ चा वापर करत विवाहापासून मुक्ततेचा निर्णय दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, ज्या प्रकरणांमध्ये वैवाहिक संबंध पूर्णपणे अव्यवहार्य, भावनाच नाहीत म्हणजेच ज्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही आणि ते पूर्णपणे तुटलेले आहेत. त्यांना घटस्फोटाचा आधार मानता येईल. असे वैवाहिक संबंध निष्फळ ठरतात आणि ते सुरु राहिल्याने दोन्ही पक्षांना मानसिक त्रास होतो.
हे देखील वाचा- प्रेमाचा रंग लालच का? खास आहे कारण
एकमेकांच्या संम्मतीने घटस्फोट
जेव्हा एकमेकांच्या संम्मतीने घटस्फोटाचा निर्णय येतो तेव्हा नवरा-बायको वर्षभर एककमेकांपासून वेगळे राहतात. आधीच दोन्ही पक्षांना कोर्टात याचिका दाखल करावी लागते. दुसऱ्या टप्प्यात दोन्ही पक्षाकडून आपले मत मांडले जाते. तसेच कागदोपत्री व्यवहार होतात. तिसऱ्या टप्प्यात कोर्ट दोघांना ६ महिन्यांची वेळ देते. जेणेकरुन त्यांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा. काही वेळा त्या दोघांमध्ये पुन्हा गोष्टी आधीसारख्या घडतात. अशातच सहा महिन्यानंतर कोर्ट पु्न्हा त्या दोघांना बोलावते. या दरम्यान निर्णय बदलला गेला तर वेगळी प्रक्रिया पार पडते. अखेरच्या टप्प्यात कोर्ट आपला निर्णय सुनावते. अशातच नाते टिकणार की तुटणार हे स्पष्ट होते.