Home » ट्रम्प यांच्या हल्यामागच्या चर्चा

ट्रम्प यांच्या हल्यामागच्या चर्चा

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यंच्या पेनसिल्व्हेनिया रॅलीवर झालेल्या हल्याचा तपास आता चालू झाला आहे. ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडणा-या तरुणाला सुरक्षा एजन्सीने लगेच मारलं असलं तरी या घटनेभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. एकतर ही घटना ट्रम्प यांनीच घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Donald Trump)

यातून त्यांनी निवडणुकीत सहानुभूती तयार केल्याचा आरोप आहे. पण दुसरीकडे या सर्वांत अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस जगात आधुनिक असल्याचे सांगण्यात येते, अशावेळी ट्रम्पपासून अवघ्या काही मिटरवर असलेला हल्लेखोर त्यांना दिसला कसा नाही, आणि दिसला तर त्याला आधीच पकडला का नाही, हा प्रश्न विचारला जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया रॅलीत झालेल्या हल्यानंतर आता अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. या सर्वात सीक्रेट सर्व्हिस चर्चेत आलं आहे. त्यांच्याकडे ट्रम्पच्या सुरक्षेची जबाबदारी होती. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील एक उमेदवार आहेत. त्यांच्यावर झालेला हा हल्ला अमेरिकेच्या नावाला काळीमा लावणारा असल्याचे आता नागरिकांचे मत झाले आहे. किम्बर्ली ए. चीटल हे सीक्रेट सर्व्हिसचे संचालक आहेत. त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे. कारण ट्रम्प यांच्यावर ह्ला होणार अशी माहिती किम्बर्ली यांना देण्यात आली होती, मात्र त्यांनी कुठलिही पावलं उचलली नाहीत. या सर्वात अमेरिकेतील अनेक सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तहेर संघटना यामधील विवादही चव्हाट्यावर आला आहे. (Donald Trump))

अमेरिकेच्या सुरक्षितेसाठी अनेक गुप्तचर संघटना आणि यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक सिक्रेट सर्व्हिस. १८६५ मध्ये अमेरिकी चलन, डॉलरमधील बनावटगिरी रोखण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसची स्थापना करण्यात आली. १९०१ पर्यंत फक्त चलनासंदर्भात देखरेख ठेवणारी ही संघटना प्रकाश झोतात आली. कारण तत्कालीन राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ली यांची तेव्हा हत्या झाली. यानंतर राष्ट्राध्यक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही सिक्रेट सर्व्हिसकडे देण्यात आली. सद्यस्थितीत सिक्रेट सर्व्हिस राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष यांच्यासह देशातील आर्थिक घडामोडी यावर लक्ष ठेवते.

एकूण संपूर्ण अमेरिकेची चावीच या यंत्रणेकडे असते. कारण अमेरिकेच्या आजी माजी राष्ट्राध्यक्षांना याच यंत्रणेमार्फेत सुरक्षा दिली जाते. शिवाय त्यांच्या आसपासच्या व्यक्तींवरही नजर ठेवली जाते. ट्रम्प यांच्याबाबतीत तर ही सुरक्षा डब्बल असणे गरजेचे होते. कारण ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, शिवाय निवडणुकीच्या आधी १२० दिवस सिक्रेट सर्व्हिस निवडणुकीतील प्रबळ उमेदवाराला सुरक्षा देते. या दरम्यान संघटनेला कुणावर संशय आल्यास त्याच्यावर वॉरंट दाखल करण्यात येऊ शकतो. तसेच अधिक संशय असेल तर संघटनेचे एजंट वॉरंटशिवाय संबंधिक संशयिताला अटक करु शकतात. या सिक्रेट सर्व्हिसेसमध्ये तब्बल ३ हजार २०० विशेष एजंट आहेत. या सर्वांची निवड करतांनाही अत्यंत कडक अटी आहेत. नंतर या सर्वांचे प्रशिक्षणही कठोर असते. हे पार पडल्यावरच सिक्रेट सर्व्हिसेसचे एजंट तयार होतात. (Donald Trump)

याच एजंटना ट्रम्प यांच्यापासून फक्त १३० मिटवर बंदुक घेऊन असलेला हल्लेखोर दिसला कसा नाही, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. कारण ट्रम्पवर हल्ला करणा-याच्या घरात छापा टाकल्यावर गेले अनेक महिने तो या हल्ल्याचे नियोजन करत अशल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या कारमधून बॉम्ब बनवण्याचे सामानही सापडले आह. त्यात भर म्हणून आता या हल्ल्याच्या वेळेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यात हल्लेखोर या घटनेच्या आधी स्पष्टपणे हातात बंदूक घेऊन दिसत आहे. जी गोष्ट सर्वसामान्य जनतेला टिपता आली, ती सिक्रेट सर्व्हिसच्या नजरेतून कशी निसटली हा जनतेचा प्रश्न आहे.

ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा तरुण रॅलीला आलेल्या ट्रम्प समर्थकांमध्येच बसला होता. त्याच्यामागेही अनेक लोक बसले होते, जे ट्रम्प यांच्या भाषणाला टाळ्या वाजवून दाद देत होते. १३० मीटर अंतरावर असलेल्या या तरुणाच्या समोरच स्नायपर्स होते. या स्नायपर्सजवळ अत्याधुनिक हत्यारे होती. त्यांना हा बंदुक घेऊन बसलेला हल्लेखोर कसा दिसला नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात अजून एक व्हिडिओ आला असून त्यातही हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहे. (Donald Trump)

====================

हे देखील वाचा : अमेरिकेत घुबडांचा बळी !

====================

या व्हिडीओमध्ये हल्लेखोर इमारतीच्या छतावर रायफल घेऊन उपस्थित असताना दिसत आहे. याच इमारतीखाली पोलीसही आहेत, पण पोलीसांना हल्लेखोर दिसत नाही यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या उपस्थित रॅलीला असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींनीही हल्लेखोराला टेरेसवर जाताना पाहिलं आणि पोलिसांना संशयीत रॅलीत आल्याची माहिती दिल्याचा दावा केला आहे.

त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यामागील सिक्रेट सर्व्हिसची भूमिका याबाबत संशय व्यक्त होऊ लागला आहे. धक्कादायक म्हणजे, एका पोलीस अधिका-यांनीही याच हल्लेखोरावर आपण नजर ठेऊन होतो, त्याच्या डोळ्यावर काळा चष्मा होता, हे संशयास्पद होते, आपण वरिष्ठांना याची माहिती दिली. पण वरिष्ठांनी यावर लक्ष दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर आता संशयाचे जाळे तयार झाले आहे. (Donald Trump)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.