Home » स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे आरोग्य धोक्यात, डिजिटल डिटॉक्सची का आहे गरज?

स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे आरोग्य धोक्यात, डिजिटल डिटॉक्सची का आहे गरज?

by Team Gajawaja
0 comment
Digital Detox
Share

सध्याच्या डिजिटल युगात एखाद्या पर्यंत अगदी सहज पोहचता येते. डिजिटल प्लॅटफॉर्म जसे फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक माध्यमांतून लोक एकमेकांशी जोडली जातात. यामुळे आपल्याला अनेक गोष्टी कळतातच पण तंत्रज्ञान किती वेगाने पुढे जात आहे याचा सुद्धा अंदाज येतो. अशातच आपल्याकडे एक जूनी म्हण आहे, गरजेपेक्षा अधिक प्रत्येक गोष्ट ही विषासारखी असते. डिजिटल युगात सुद्दा हळूहळू तरुणवर्ग हा काही समजून घेणे, कृती करणे या गोष्टींपासून दूर आणि तणाव, काही गंभीर आजार याच्याशी सामना करत आहे. अधिक सुचनांपासून सुद्धा अॅक्डिक्ट होणे अत्यंत वाईट आहे. त्यामुळेच लोकांनी डिजिटल डिटॉक्स करणे फार गरजेचे आहे. आपण शरिराचे डिटॉक्स केले जाते हे ऐकतो पण डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) म्हणजे काय आणि त्याची का सध्या गरज आहे याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

दिवसभर स्मार्टफोन, टॅब किंवा लॅपटॉपवर आपले डोळे चाळवत असतो. परंतु याची अधिक सवय तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. आता लोक एकमेकांना प्रत्येक्षात भेटण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जास्तकरुन भेटतात. वर्च्युअल जगात अधिकाधिक वेळ घालवणे सुद्धा तुमच्या लाइफस्टाइलसाठी ठिक नव्हे. यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता दूर होऊ शकते. अशातच तुम्ही सोशल मीडियातील अॅप पासून दूर राहणे, स्क्रिन टाइमवर लक्ष दिल्यास तुमच्या मानसिक आरोग्यासह संपूर्ण आरोग्य ही उत्तम राहते.

स्मार्टफोन, टीव्ही स्क्रिन आणि वर्च्युअल वर्ल्ड यापासून पूर्णपणे दूर राहणे म्हणजेच डिजिटल डिटॉक्स. या मध्ये व्यक्ती एका निश्चित काळासाठी पूर्णपणे ऑनलाईनच्या जगापासून दूर होतो आणि कोणत्याही डिवाइसवर आपला वेळ खर्च करत नाही.

का भासते डिजिटल डिटॉक्सची गरज?
आपल्या डोक्यात सातत्याने कोणते ना कोणते विचार सुरु असतात. त्यांचा काही वेळेस थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर ही होतो. तर सध्या आपण मोबाईल पासून दूर राहिलो तरीही आपल्याला बैचेन वाटते. ऐवढेच नव्हे तर झोपेतून उठल्यानंतर ही प्रथम आपण फोन पाहतो. ही गोष्ट सध्या सर्व वयोगटातील व्यक्तींसोबत होत आहे. नेहमीच ऑनलाईन हालचालींमध्ये सहभागी होणे हे तुमच्या आरोग्यावर परिणाम करु शकते.

Digital Detox
Digital Detox

इंटरनेटचा अधिकाधिक वापर करणारी लोक ही आपल्याच तंद्रीत असतात. काही लोकांमध्ये पाहिले की, ते स्वत:शीच बोलतात तर कधी हसतात-रडतात. काही वेळा इंटरनेटवरील कंन्टेट पाहून त्यांना अधिक दु:ख ही होते. काही वेळासाठी ते काल्पनिक आयुष्य ही जगतात. त्यामुळे कधी कधी असे वाटते की, आपण डिवाइसला नव्हे तर डिवाइसच आपले आयुष्य चालवत आहेत.(Digital Detox)

गॅजेट्सच्या अधिक वापरामुळे बहुतांश जणांना झोप लागत नाही. त्यांना स्लिपींग डिसऑर्डर होऊ लागते. काही लोक डिप्रेशनमध्ये जातात. लाइफ स्टाइल ही यामुळे खुप प्रभावित होते आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत वजन वाढते. हेल्थ एक्सपर्ट्स यांनी विविध अभ्यासात दावे केले आहेत की, स्मार्टफोच्या सातत्याच्या वापरामुळे तुमचे मूड स्विंग्स होतात. जर तुम्हाला एखादा व्यक्ती अडवत असेल त्याच्यावर तुम्ही तुमचा राग व्यक्त करता.

हे देखील वाचा- मोबाईल बँकिंगचा वापर करत असाल तर व्हा सावध! वेगाने पसरतोय ‘हा’ वायरस

आरोग्यासाठी का फायदेशीर आहे डिजिटल डिटॉक्स?
काही तासांपर्यंत स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबवर वेळ घालवल्याने तुमच्या डोळ्यांवर स्क्रिनचा परिणाम होतो. अशातच तुमचे डोळे चुरचुरणे, अंधुक दिसणे अशा समस्या उद्भवतात. फोन वापरताना सातत्याने नजर खाली असल्याने पाठ आणि मानेच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात.

खरंतर स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे तुमच्या शरिरातील घड्याळ ही प्रभावित होते. तुमचा मेंदू मेलाटोनिन नावाचे एक रसायन सोडते जी तुमच्या झोपेसाठी जबाबदार असते. झोपण्यापूर्वी फोन किंवा डिजिटल डिवाइसच्या वापरामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि मेलाटोनिन रिलीज होण्यास वेळ लागतो.दीर्घ काळापर्यंत झोप न येणे, तुमचा मूड आणि आरोग्याला प्रभावित करु शकते. डिजिटल डिटॉक्सच्या कारणामुळे तुमचे बॉडी क्लॉक सुधारण्याची संभावना वाढू शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.