Home » शांत पद्धतीने हाईजॅक केलेल विमान !

शांत पद्धतीने हाईजॅक केलेल विमान !

by Team Gajawaja
0 comment
Dan Cooper
Share

काळा सूट घातलेला हातात सुटकेस घेऊन एक व्यक्ती विमानात चढतो आणि आपल्या सीटवर जाऊन बसतो. सुरुवातीला एअर हॉस्टेसकडून एक ड्रिंक तो मागवतो आणि पितो.  काही वेळाने तो पुन्हा एअर हॉस्टेसला बोलावतो आणि तिला एक चिठ्ठी देतो. त्यात लिहिलं असतं, “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे. तुम्ही गपचूप माझ्या बाजूच्या सीटवर बसा.” जेव्हा एअर हॉस्टेस बाजूच्या सीटवर बसते, तेव्हा त्याच्या बॅगेत खरंच बॉम्ब असल्याचं तिला समजतं. तो व्यक्ती विमान हाईजॅक करण्याच्या तयारीतच विमानात चढला होता. त्याची मागणी होती – दोन लाख डॉलर, नाहीतर तो विमान बॉम्बने उडवणार होता. सरकार तात्काळ त्याची मागणी मान्य करते. विमान लँड केलं जातं. विमानातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याला पैसे पोहोचवले जातात. पैशांसोबत हाईजॅकर आणखी एक गोष्ट मागतो ती म्हणजे पॅराशूट. विमान एकदा पुन्हा टेक ऑफ केलं जातं. हाईजॅकर पायलटला सांगतो, “विमान मेक्सिकोला घेऊन चल.” पायलट म्हणतो, “फ्यूल कमी आहे. रिफ्यूलिंगसाठी एकदा पुन्हा उतरावे लागेल.” हाईजॅकर ठीक आहे म्हणतो. पण प्लेन ईंधन भरण्यासाठी लँड करण्यापूर्वीच, मध्यात हवा मध्ये प्लेनचा दरवाजा उघडतो. पॅराशूट बांधून हाईजॅकर हवेतून प्लेनवरून उडी मारतो आणि गायब होतो. तो कुठे गेला? तो कोण होता? याचा पत्ता अजूनपर्यंत लागलेला नाही. ही संपूर्ण घटना जाणून घेऊया. (Dan Cooper)

तारीख होती २४ नोव्हेंबर १९७१, अमेरिका पोर्टलंड एअर पोर्टवर एक सामान्य दिसणारा माणूस नॉर्थवेस्ट ओरिएंट एयरलाइंसच्या काउंटरवर पोहोचला. त्याने आपलं नाव डीन कूपर सांगितलं. त्याने कॅश देऊन सिएटल, वॉशिंग्टनसाठी फ्लाइट ३०५ चं एक तिकीट खरेदी केलं. दिसण्यावरून कूपर एक शांत आणि साधा व्यक्ती वाटत होता, ज्याचं वय ४०-४५ च्या आसपास होतं. त्याने काळा टाय आणि पांढऱ्या शर्टसह एक बिझनेस सूट घातला होता आणि हातात होती एक सुटकेस. फ्लाइट टेक ऑफ होण्याची वाट पाहत होती. एअर हॉस्टेसला बोलवून कूपरने एक ड्रिंक ऑर्डर केली, बर्बन व्हिस्की आणि सोडा. दुपारी ३ वाजल्यानंतर कूपरने एअर होस्टेसला पुन्हा बोलावलं आता विमान हवेत होत. त्याने एअर हॉस्टेसला एक चिठ्ठी दिली. “माझ्या सुटकेसमध्ये बॉम्ब आहे. तुम्ही गपचूप माझ्या बाजूच्या सीटवर बसा.” एअर हॉस्टेस घाबरल्यामुळे ती त्याच्या बाजूला बसली. कूपरने एअर होस्टेसला सुटकेस उघडून दाखवली. सुटकेसमध्ये भरपूर वायर्स आणि दोन लाल रंगाचे छोटे सिलेंडर होते. (International News)

त्याने एअर हॉस्टेसला तो जे सांगतोय ते लिहून घ्यायला सांगितलं. तीने ते लिहून घेतलं आणि फ्लाइटच्या कॅप्टनला ती नोट नेऊन दिली. त्या नोटमध्ये चार पॅराशूट आणि २ लाख डॉलरची मागणी केली गेली होती. प्रवाशांना हे ठाऊक सुद्धा नव्हतं की, त्यांचं विमान हाईजॅक झालं आहे. डीन कूपरची विमान हाईजॅक करण्याची स्टाइल एकदम वेगळी होती. त्याने एकदम शांत पद्धतीने विमान हाईजॅक केलं होतं. त्याने पैसे कसे मिळवायचे हे सुद्धा त्याने त्या नोट मध्ये लिहायला सांगितलं होतं. विमान सिएटल एअर पोर्टवर उतरेल, तिथे एक फ्यूल ट्रक प्लेनला रिफ्यूल करेल. एअर होस्टेस बाहेर जाऊन पैसे आणि पॅराशूट आत आणेल. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना उतरवलं जाईल, आणि विमान पुन्हा टेक ऑफ होईल. हा डीन कूपरने पायलटला सांगितलेला प्लॅन होता. त्याशिवाय पैशांच्या बाबतीत त्याची खास अट होती की सगळे पैसा 20 डॉलरच्या नोटांमध्ये असावे. (Dan Cooper)

विमानातल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी कूपरची ही मागणी पायलटने एटीसीकडे म्हणजेच एअर ट्राफिक कंट्रोलरकडे पोहोचवली. आणि तिथून हे प्रकरण एफबीआयकडे गेले. कोणत्या प्रकारचा बॉम्ब डीन कूपरकडे आहे हे माहिती नसल्यामुळे एफबीआयने प्रवाशांच्या जीवांचे संरक्षण करण्यासाठी एफबीआयने कूपरला मागीतल्या प्रमाणे पैसे पाठवले. आणि पॅराशूटही. पूर्ण पैसे 20 डॉलरच्या नोटांमध्ये होता, आणि प्रत्येक नोटांवर सिरियल नंबर ‘L’ ने सुरू होत होता. पैसे देण्यापूर्वी एफबीआयने सर्व नंबर नोट करून ठेवले, जेणेकरून नोटांची ओळख करून पुढे हाईजॅकरला पकडता येईल. फ्लाइट सिएटलमध्ये लँड झाल्यावर कूपरने पैसें आणि पॅराशूटच्या बदल्यात ३६ प्रवाशांना सोडून दिलं. पण त्याने विमानाच्या काही कर्मचाऱ्यांना बंधक ठेवलं. विमान पुन्हा टेक ऑफ झालं आणि कूपरने कॅप्टनला मेक्सिको सिटीकडे जाण्याचे आदेश दिले. त्याशिवाय त्याने विमानातील सर्व कर्मचाऱ्यांना कॉकपीटमध्ये बंदी बनवलं. रात्रीच्या अंधारात सुमारे ८ वाजता विमानाच्या कॉकपीटमध्ये एक लाल बल्ब पेटला. ज्याचा अर्थ होता विमानाचा दरवाजा उघडला गेला आहे. पायलटने इंटरकॉमवर कूपरला विचारलं की त्याला काही हवं आहे का? तेव्हा कूपर ने उत्तर दिलं “ नाही.” त्यांनंतर कूपर विमानातून गायब झाला. (International News)

कूपर रात्रीच्या अंधारात कुठे गायब झाला, हे आजपर्यंत एक रहस्य आहे. एफबीआयला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तपास सुरू केला. नॉर्थवेस्ट हायजॅकिंगमुळे याला NORJAK नाव देण्यात आले, जो अनेक वर्षे चालला. शेकडो लोकांशी चौकशी करण्यात आली, त्याचा देशभरात मागोवा घेण्यात आला आणि पुराव्यासाठी विमानाची तपासणी करण्यात आली. जवळ जवळ तपासाच्या पाच वर्षांनंतर, सुद्धा त्याचा शोध लागला नव्हता. संशयितांच्या यादीत ८०० हून अधिक नावे समाविष्ट झाली होती. नंतर एक थिओरी समोर आली ज्यामध्ये सांगितलं गेलं की कूपरने जेव्हा विमानातून उडी मारली ती त्याला नीट मारता न आल्यामुळे त्याचा पडून मृत्यू झाला असेल. १९८० मध्ये ही थिओरीला अधिक खरं मानलं जाऊ लागलं, जेव्हा एका मुलाला नोटांनी भरलेला एक बॅग मिळाली. (Dan Cooper)

नंतर ही गोष्ट समजली की कूपरने वीस डॉलरच्याच नोटा का मागितल्या होत्या, कारण यामुळे बॅगेच वजन कमी राहील. जर नोटा कमी डोलर्सच्या असत्या तर वजन जास्त होऊन उडी मारणं जीवघेणे ठरू शकले असते. एफबीआयने त्याला पकडण्यासाठी आणखी एक प्लॅन आखला होता. पण तो यशस्वी झाला नाही. एफबीआयने हाईजॅक केलेल्या विमानाचा पाठलाग करण्याची योजना तयार केली होती. प्रथम एफ 106 विमान वापरण्याचा विचार केला गेला, पण हे जलद गतीचे लढाऊ विमान कमी गतीवर उडू शकत नव्हतं, म्हणूनच आंतरराष्ट्रीय गार्डकडून टी 33 विमानांची मागणी केली गेली, पण जोपर्यंत हे विमान हायजॅक झालेल्या प्रवासी विमानाजवळ पोहोचले, तोपर्यंत कूपर पैसे घेऊन फरार झाला होता. या हाईजॅकमुळे डीन कूपर खूप प्रसिद्ध झाला होता. पण हे कोणालाच माहिती नव्हतं की, कूपर जिवंत आहे की नाही. (International News)

======

हे देखील वाचा :  एका माणसाला मारण्याचे ९ वेळा भयानक प्रयत्न केले ?

====

काही वर्षांनंतर, ऑगस्ट 2011 मध्ये, एका महिलेने, मारिया कूपरने असा दावा केला की डीन कूपर तिचे काका होते. मारियाने हेही सांगितले की तिच्या काकांनी विमानातून उडी मारल्यानंतर ती रक्कम हवेतच गमावली होती. पण विमान हायजॅक झालेल्या एका फ्लाईट अटेंडंटने मारियाच्या काकाचा फोटो पाहून सांगितले की, हा चेहरा हायजॅकर्सच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. पण अधिकाऱ्यांनी या दाव्यावर विश्वास ठेवला नाही आणि डीन कूपरची केस सॉल्व झाली नाही. डीन कूपर अमेरिका के इतिहासातील एकटा हायजॅकर आहे जो कधीच पकडला गेलेला नाही. या घटनेच्या आठवणीमध्ये दरवर्षी २४ नोव्हेंबरला एक कार्यक्रम आयोजित केला जातो जिथे एफबीआयने डीन कूपरच्या शोधात पहिले मुख्यालय स्थापन केलं होतं. अरियल टवर्नमध्ये बिझनेस सूट घातलेले, चष्मा लावलेले, आणि पॅराशूट धरलेले लोक आजही एकत्र येतात आणि रात्री उशीरापर्यंत तिथे महफील रंगवतात. पण एफबीआय अधिकाऱ्यांसाठी अचानक येऊन विमान हायजॅक होणं आणि नंतर गूढ पद्धतीने गायब होणारी व्यक्ती आजही एक रहस्य आहे. (Dan Cooper)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.