Home » कपिंग थेरपी नक्की काय आहे? जाणून घ्या फायदे

कपिंग थेरपी नक्की काय आहे? जाणून घ्या फायदे

आजकाल कपिंग थेरपीचा ट्रेंड आहे. काही सेलिब्रेटी यासंबंधित काही पोस्ट देखील शेअर करत असतात. पण अद्याप बहुतांशजणांना कपिंग थेरपीबद्दल फारसे माहिती नाही. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Cupping Therapy Benefits
Share

Cupping Therapy Benefits : सध्या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइजची मदत घेतली जातेच. पण याव्यतिरिक्त देखील काही थेरपींच्या माध्यमातून हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न केला जातो. यापैकीच एक म्हणजे कपिंग थेरपी आहे. आजकाल बहुतांश सेलिब्रेटी कपिंग थेरपीचा आधार घेताना दिसतात. ही थेरपी व्यक्तीच्या आरोग्यासाठी काही प्रकारे फायदेशीर ठरू शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया….

कपिंग थेरपी म्हणजे काय?
वेबएमडीनुसार, कपिंग थेरपी अल्टरनेटिव्ह मेडिसिनचे एक प्राचीन रुप आहे. येथे थेरपीस्ट सक्शन निर्माण करण्यासाठी काही मिनिटांसाठी त्वचेवर विशेष प्रकारचे कप ठेवले जातात. याचा उद्देश रक्ताला शरिरातील काही भागात दूर अथवा आतपर्यंत खेचण्याचा असतो. काहीजण कपिंग थेरपी दुखणे आणि सूजेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी केली जाते. काहीजण बॉडी रिलॅक्स करण्यासाठी कपिंग थेरपी करतात. यामध्ये काच, मातीची भांडी अथवा सिलिकॉन अथवा प्लास्टिकच्या कपचा वापर केला जाऊ शकतो.

कपिंग थेरपीचे फायदे
कपिंग थेरपीचे काही फायदे आहेत. यामुळे ब्लड डिसऑर्डर जसे की, एनीमिया आणि हिमोफिलियाची समस्येवर उपाय म्हणून करू शकता. रुमेटाइड, अर्थराइटिस, फायब्रो मलेशियाची समस्या, पिंपल्स अशा काही समस्यांपासूनही आराम मिळण्यास कपिंग थेरपी फायदेशीर ठरू शकते. कंबर दुखी, अंग दुखण्यासह उच्च रक्तदाबाची समस्या असणारे रुग्ण, मायग्रेन, डिप्रेशन अथवा वेरिकोज वेन्सच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरु शकते. (Cupping Therapy Benefits)

नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अॅंड इंटीग्रेटिव्ह हेल्थनुसार, सर्व स्थितींमध्ये कपिंग थेरपी फायदेशीर ठरते की नाही याबद्दल अद्याप संशोधन करण्यात आलेले नाह. जर्नल ऑफ ट्रेडिशनल अँड कॉम्लिमेंटरी मेडिसनमध्ये वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, कपिंग थेरपी पिंपल्स अथवा अंग दुखीच्या समस्येवर उपाय म्हणून केली जाऊ शकते. परंतु संशोधनकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, याबद्दल अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला कपिंग थेरपीचा आधार घ्यायचा असल्यास त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण कपिंग थेरपीनंतर स्किन इन्फेक्शन आणि जळजळ अशी समस्या होऊ शकते. याशिवाय त्वचेवर डाग देखील येतात.


आणखी वाचा :
हृदयाच्या हेल्दी आरोग्यासाठी 5 सोपे व्यायाम प्रकार
बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते? होऊ शकतात हे गंभीर आजार

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.