Home » क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्वाची माहिती, या बँकांच्या नियमात झालेत बदल

क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्वाची माहिती, या बँकांच्या नियमात झालेत बदल

क्रेडिट कार्ड संदर्भातील काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. याबद्दलच जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Credit card use
Share

Credit Card Rule Changes : क्रेडिट कार्डचा बहुतांशजण सध्या वापर करताना दिसून येत आहे. शॉपिंग ते अन्य ट्रांजेक्शनसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. अशातच जुलै महिन्यात क्रेडिट कार्ड संदर्भातील काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…

एसबीआय क्रेडिट कार्ड
एसबीआय कार्डने घोषणा केली आहे की, कोणत्याही प्रकारच्या शासकीय ट्रांजेक्शनवर 1 जुलैपासून ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. तर काही एसबीआय कार्ड धारकांची ही सुविधा 15 जुलैपासून बंद केली जाणार आहे.

आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड नियम
आयसीआयसीआय बँकेने देखील जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून क्रेडिट कार्ड संदर्भातील काही नियमांत बदल केले आहेत. अशातच कार्ड धारकांना कार्ड रिप्लेसमेंटसाठी 100 रुपयांएवजी 200 रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय चेक आणि कॅश पिकअपसाठी 100 रुपयांचा चार्ज बंद केला जाणार आहे. याशिवाय चार्ज स्लिप रिक्वेस्टसाठी घेण्यात येणारे 100 रुपये देखील घेतले जाणार नाही.

सिटी बँक क्रेडिट कार्ड नियम
एक्सिस बँकेने सिटीबँक क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना 15 जुलैपर्यंत सर्व प्रकारची मायग्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितली आहे. बँकेने ग्राहकांना ईमेलच्या माध्यमातून याची सूचना दिली आहे. (Credit Card Rule Changes)

एचडीएफसी क्रेडिट कार्ड नियम
एचडीएफसी बँकेने देखील आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नियम येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. एचडीएफसी बँक लिमिटेडच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना CRED, Paytm, Cheq, MobiKwik आणि Freecharge सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहेत.


आणखी वाचा :
भारतात Meta AI लाँच, WhatsApp वर असा करा वापर
LIC धारकांसाठी महत्वाची माहिती, या गोष्टीकडे द्या लक्ष…अन्यथा होईल मोठे नुकसान

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.