Home » डार्क सर्कल ते ब्लॅकहेड्स, या 3 प्रकारे करा कॉफीचा वापर

डार्क सर्कल ते ब्लॅकहेड्स, या 3 प्रकारे करा कॉफीचा वापर

by Team Gajawaja
0 comment
Share

Coffee for skin care : कॉफीमुळे आलेला आळस, सुस्ती दूर होण्यास मदत होते. पण कॉफी स्किन केअर रुटीनसाठी देखील वापरली जाते. मात्र कॉफीचा यावेळी योग्य वापर कसा करावा हे तुम्हाला माहिती हवे. जाणून घेऊया कॉफीसंदर्भात असे काही घरगुती उपाय ज्यामुळे त्वचेसंबंधित काही समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. खरंतर, बहुतांशजण डार्क सर्कल, ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्ससारख्या समस्यांचा सामना करतात. यामुळे सौंदर्य बिघडले जाते. अशातच कॉफीचा वापर केला जाऊ शकतो.

कॉफीमध्ये काही अँटीऑक्सिडेंट्स असतात जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. कॉफीचा वापर त्वचा स्वच्छ करणे, कोमल होण्यासाठी केला जाऊ शकतो. कॉफी एक बेस्ट एक्सफोलिएटर देखील आहे. यामधील कॅफेनमुळे त्वचेचे ब्लड सर्कुलेशन उत्तम होते. यामुळे त्वचा नॅच्युरली ग्लो होते. जाणून घेऊया कोणत्या प्रकारे कॉफीचा वापर करावा….

Coffee Benefits for Skin

Coffee Benefits for Skin

डार्क सर्कल दूर करण्यासाठी
बिघडलेले डेली रुटीन, चुकीची खाण्यापिण्याची सवय, तणाव आणि दीर्घकाळ स्क्रिन टाइमच्या कारणास्तव बहुतांशजणांना डार्क सर्कलची समस्या होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये मध आणि हळद मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कापसावर गुलाब पाणी घेऊन स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून दोन-तीनवेळा करू शकता.

ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स
नाक आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात ब्लॅकहेड्सची समस्या होते. काहींना व्हाइट हेड्सची समस्या देखील असते. उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे ही समस्या अधिक वाढली जाते. यापासून दूर राहण्यासाठी कॉफी पावडरमध्ये तांदळाचे पीठ आणि गुलाब पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा आणि स्टीम घ्या. यामुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स निघून जाण्यास मदत होईल.(Coffee for skin care)

======================================================================================================

हेही वाचा : 

केसांना चमक येण्यासाठी करा हे उपाय

उन्हाळ्यात कोरड्या ओठांच्या समस्येसाठी फॉलो करा या 3 टिप्स

=======================================================================================================

उन्हाळ्यात त्वचेला येईल ग्लो
उन्हाळ्यात डल त्वचा किंवा टॅनिंगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कॉफीचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा कॉफी पावडरमध्ये चिमूटभर हळद, बेसनाचे पीठ आणि दही मिक्स करुन चेहऱ्याला लावा. 20 मिनिटानंतर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा आणि चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करुन पहा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.