Home » Cloud Seeding म्हणजे काय?

Cloud Seeding म्हणजे काय?

by Team Gajawaja
0 comment
Cloud Seeding
Share

क्लाउड सिडिंग म्हणजे ढगांची पेरणी. खरंतर हे ऐकणे विचित्र आहे. पण याच्या माध्यमातून गरजेनुसार कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. आपल्या देशातील आयआयटी कानपुरने याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही कोपऱ्यात पावसाची गरज भासेल तेथे कृत्रिम पाऊस याच्या माध्यमातून पाडला जाऊ शकतो. आयआयटी कानपुरसाठी ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणे सोप्पे नव्हते. हा प्रयोग पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 6 वर्ष लागली. या चाचणीच्या यशावर प्रोजेक्ट हेड प्रो. मणींद्र अग्रवाल सुद्धा आनंदित आहेत. याचे क्रेडिट ते आपल्या संपूर्ण टीमला देतात. तर जाणून घेऊयात क्लाउड सीडिंग नक्की काय आहे आणि किती कठीण हा प्रोजेक्ट त्याच बद्दल अधिक. (Cloud Seeding)

प्रो. मणींद्र अग्रवाल असे सांगतात की, हा प्रोजेक्ट त्यांनी २०१७ मध्ये सुरु केला हहोता. काही काम पूर्ण झाले. आम्हाला एयरक्राफ्टसाठी काही उपकरणे हवी होती. जी अमेरिकेतून येणार होती. २०१९ मध्ये आम्ही त्यासाठी ऑर्डर दिली आणि त्यानंतर कोविडची स्थिती निर्माण झाल्याने सर्वकाही ठप्प झाले.

उपकरण गेल्या वर्षी आले तेव्हा आम्हाला एयरक्राफ्टमध्ये बदल करण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी घ्यावी लागली. परवानगी मिळाली तेव्हा अमेरिकेतून इंजिनियर्सला येण्यास विलंब झाला. अशा प्रकारे काही समस्या या दरम्यान येत राहिल्या पण आम्ही आमची पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली.

एअरक्राफ्टचे उड्डाण झाले आणि त्याने क्लाउड सिडिंग केले. हा केवळ एक योगायोग होता की, केवळ आम्ही परिक्षणाची तारीख ठरवली होती आणि त्याच दिवशी खुप पाऊस पडला. याचा आमच्या अभियानावर कोणताही परिणाम झाला नाही. आता भारतात अशी स्थिती आहे जेथे गरज भासल्यानंतर आम्ही कृत्रिम पाऊस पाडू शकतो.

क्लाउड सिडिंग करण्यासाठी एक खास वैज्ञानिक पद्धत वापरली जाते. यामध्ये ड्राय बर्फ, मीठ, सिल्वर आयोडाइडसह काही रासायनिक तत्त्व मिक्स करुन एयरक्राफ्ट मध्ये लावण्यात आलेल्या एका खास टूलमध्ये ठेवले जाते. जेव्हा एअरक्राफ्ट ठरवलेल्या उंचीवर जाते तेव्हा त्याच्या माध्यमातून कृत्रिम ढगांमध्ये सीडिंग केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या काही वेळानंतर पाऊस पडतो. या पावसाचे थेंब जाड असतात. (Cloud Seeding)

किती फायदेशीर आहे हे तंत्रज्ञान
क्लाउड सीडिंगचा लाभ हा कृषी क्षेत्राला होऊ शकतो. वायु प्रदूषणापासून दूर राहण्यास ही याची मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त जल प्रदुषणासाठी ही याची मदत घेतली जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया जल विद्युत उत्पादनात सुद्धा याचा वापर केला जातो. परंतु ही टेक्निक अतिशय खर्चिक आहे.

एयरक्राफ्ट, केमिकल असे सर्वकाही मिळून याचा खर्च फार वाढला जातो. पण आपत्कालीन स्थितीत सरकार या टेक्निकचा वापर करु शकते. कृत्रिम पावसामुळे प्रदूषण सुद्धा होऊ शकते. आता पर्यंत जगात ज्या ठिकाणी याचा वापर केला जात आहे तेथे आसपास प्रदुषणाचा स्तर वाढलेला दिसून येतोय.

हेही वाचा- काय आहे कोको बेटांचे रहस्य?

भारतापूर्वी याचा प्रयोग युएई सरकारने केला होता. तेथे बहुतांशवेळा कृत्रिम पाऊस पाडला जातो. चीनमध्ये सुद्धा ही टेक्निक वापरली जाते आणि त्यांनी २००८ मध्ये बिजींग ऑलंम्पिक दरम्यान याचा यशस्वीरित्या प्रयोग केला होता. तेव्हा जेटच्या माध्यमातून क्लाउड सीडिंग केली होती. ऑस्ट्रेलिया, स्पेन, फ्रांन्ससह जगातील काही देशांमध्ये कृत्रिम पावसाची व्यवस्था करण्यात आली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.