रात्रभर झोप न येणे हा सुद्धा एक आजारच आहे. त्याला इनसोम्निया असे म्हटले जाते. यामध्ये रात्री झोपावेसे वाटत असले तीरीही आपण जागेच राहतो. मुलांमध्ये ही समस्या शिशुवयापासूनच सुरु होऊ शकते. तर काही वेळेस ही समस्या किशोरावस्थापर्यंत राहू शकते. त्यामुळे मुलांना झोप येत नाही आणि जरी ते झोपले तरी ते खुप कमी वेळ झोपतात. ऐवढेच नव्हे तर उठण्याच्या नेहमीच्या वेळेआधीच ते उठलेले असतात. त्यानंतर ते परत झोपतच नाहीत. कमी झोपण्याच्या कारणामुळे त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्या खुप प्रभाव पडतो. ही समस्या एखाद्या प्रकारचा तणाव, एखाद्या गोष्टीची भीती किंवा आजूबाजूचे वातावरण या कारणांमुळे सुद्धा असू शकते.(Childhood Insomnia)
झोप न झाल्याचे परिणाम
-थकवा जाणवणे
-झोपण्यासाठी नकार देणे किंवा प्रत्येकवेळी झोपण्याचा प्रयत्न करणे
-दिवसभर झोप न येणे, डुलकी घेणे किंवा शाळेत झोपणे
-एकाग्रतेची समस्या
-अभ्यास, रिलेशनशिपवर लक्ष केंद्रित करण्यास समस्या
-व्यवहारासंबंधित समस्या
-वेळोवेळी भावनिक होणे
-निर्णय घेण्यास असक्षम
मुलांना झोप येत नसेल तर करा हे उपाय
-मुलांचे रुटीन तयार करा
मुलांची झोप पूर्ण न झाल्याने त्यांना रात्रीच्या वेळेस जेव्हा झोपायचे असते तेव्हा त्याचा त्रास होतो. अशातच मुलांची झोपण्याची वेळ ठरवा आणि रुटीनचे कठोरतेने पालन करा.
-वेळ ठरवा
मुलांनी आपल्या वयानुसार २४ तासात किती वेळ झोपले पाहिजे याबद्दल डॉक्टरांना विचारु घ्या. जर तुमचे मुलं दिवसा झोपत असेल तर रात्री सुद्धा त्याला झोपण्यासाठी भाग पाडा.
-खोलीतील वातावरण
प्रयत्न करा की, मुलं जेव्हा झोपत असेल तेव्हा घरात किंवा खोलीत आवाज होऊ देऊ नका. तसेच ते ज्या ठिकाणी अधिक उजेड पडणार नाही ना याची सुद्धा काळजी घ्या. त्यांचा बेड हा आरामदायी असू द्या.(Childhood Insomnia)
-रिलेक्सेशन तंत्रज्ञानाचा वापर
मुलांना झोप येत नसेल तर त्यांना बेडवर झोपले असले तरीही ब्रिदींग एक्सरसाइज, प्राणायम करण्यास सांगा. मुलांना गरम पाण्याने अंघोळ घातल्यानंतर झोपण्याची सवय लावा.
हे देखील वाचा- लहान मुलांमध्ये ऑटिज्मच्या कारणामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या, पालकांनी वेळीच लक्ष द्या
-स्क्रिन टाइम कमी करा
अधिक स्क्रिन टाइमच्या कारणास्तव मुलांमध्ये झोपण्याची समस्या उद्भवू शकते. अशातच झोपण्यापूर्वी कार्टून पाहणे किंवा आणखी काही पाहिल्याने त्यांचा मेंदू दीर्घकाळ अॅक्टिव राहतो त्यामुळे त्यांना झोप येत नाही.
-अॅक्टिव लाइफ
जर तुमचे मुलं घराबाहेर जाऊन किंवा घरात जरी खेळले तर त्याला नक्कीच थकवा जाणवणार. अशातच त्याला झोप ही येईल.
-डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर या सर्व उपायांशिवाय सुद्धा तुमचे मुलं झोपत नसेल तर त्याला स्लीप डिसऑर्डरची समस्या निर्माण झाली आहे. अशातच तुम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि सर्वकाही त्यांच्यासोबत शेअर करुन योग्य तो सल्ला घ्या.