एखाद्या बाळाला जन्म देण्याचे स्वप्न प्रत्येक आईचे असते. तर बाळाला नव्या जगात आणण्यासाठी आई-वडिलांसह घरातील मंडळी ही फार उत्सुक असतात. परंतु काही ठिकाणी असे दिसून येते की, आम्हाला मुलगी नको केवळ मुलगाच पाहिजे. परंतु ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून आपण एखाद्या आईच्या पोटी कोणतं मुलं जन्माला यावे हे ठरवु शकत नाही. सध्या तंत्रज्ञान बदल्याने चोरीछुप्या पद्धतीने काही ठिकाणी पोटातील बाळ हे मुलगा आहे की, मुलगी हे पाहिले जाते. मात्र असे करणे कायदेशीर गुन्हा आहे. यामध्ये शिक्षा होऊ शकते. परंतु आता बाळाला जन्म देण्यापूर्वी तुम्हाला मुलगा पाहिजे की मुलगी हे कपलला ठरवता येणार आहे. वैज्ञानिकांनी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याच्या माध्यमातून कपलच्या मुलाचे योग्य लिंग ठरवता येणार आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, नवे तंत्रज्ञान अगदी सुरक्षित आहे आणि ८० टक्के प्रकरणांमध्ये आपल्या मनानुसार परिणाम मिळतात. हा दावा न्यूयॉर्क मधील वेल कॉर्नल मेडिसिनचे संशोधक प्रोफेसर गियानपियरो यांनी आपल्या रिसर्चमध्ये केला आहे. पण असे कसे संभाव्य होऊ शकते याचबद्दल जाणून घेऊ.(Child Gender)
संशोधकांनी असे म्हटले की, लिंग ठरवण्यात आम्हाला यश मिळाले आहे. मात्र मनानुसार लिंग ठरवणे हा एक गंभीर मुद्दा ठरु शकतो. कारण जगातील बहुतांश देशांत जन्मापूर्वी बाळाचे लिंग शोधणे हे बेकायदेशीर मानले जाते. केवळ एका अटीमुळे लिंगाची ओळख सांगितली जाते तेव्हा गर्भातील बाळ एखाद्या विशेष आजाराशी सामना करत असेल. आता समजून घेऊयात अखेर जन्मापूर्वी कशा प्रकारे लिंग ठरवले जाऊ शकते.
लिंग ठरवण्यापूर्वी क्रोमोसोम बद्दल ही समजून घेऊयात. दोन प्रकारचे क्रोमोसोम असतात. एक X आणि Y. मुलींच्या जन्मामागे एक्स क्रोमोसोम आणि मुलांच्या जन्मामागे वाय क्रोमोसोम जबाबदार असतात. वैज्ञानिकांनी लिंग ठरवण्यासाठी काही क्रोमोसोम निवडले जेणेकरुन त्यांना जे परिणाम मिळतील. जसे की, मुलासाठी एक्स क्रोमोसोम. याचा शोध घेण्यासाठी त्यांनी डेंसिटी तंत्रज्ञानाच आधार घेतला.
वैज्ञानिकांनी असे म्हटले की, डेंसिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे कळू शकते की, क्रोमोसोम एक्स आहे की वाय. एक्स क्रोमोसोम वाय क्रोमोसोमच्या तुलनेत अधिक जड असतात. अशा प्रकारे पसंद करुन लिंग ठरवल्यानंतर त्याच्यानुसार क्रोमोसोम तयार करु शकता आणि आयवीएफच्या माध्यमातून लॅबमध्ये भ्रुण विकसित केले जाऊ शकतात.(Child Gender)
हे देखील वाचा- अत्यंत गंभीर आजार ‘डीप्थीरिया’ बद्दल जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार
संशोधकांनी असे म्हटले की, अशा पद्धतीला आयवीएफ तंत्रज्ञानात वापरले जाऊ शकते आणि आपल्या आवडीनुसार मुलांचे लिंग ठरवता येऊ शकते. रिसर्च दरम्यान १३१७ कपल्सवर हे ट्रायल करण्यात आले. त्यांना दोन हिस्स्यांमध्ये विभागले गेले. ५९ कपल्सला ७९ टक्के योग्य परिणाम मिळाले. तर ४६ कपल्सला मुलगा हवे असे म्हटले. त्याचे परिणाम ७९.६ टक्के योग्य होते.