चांद्रयान-३ ची चंद्रावर यशस्वी लँन्डिंग झाल्यानंतर आता इस्रोच्या पुढील मिशनची चर्चा होऊ लागली आहे. इस्रोचे चीफ एस सोमनाथ यांनी जेव्हा मिशन यशस्वी झाल्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा बोलण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा त्यांनी सुद्धा या बद्दल सांगितले. पीएम मोदी यांनी असे म्हटले की, लवकरच सुर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी इस्रो आदित्य एल-वन मिशन सुरु करणार आहे. त्यानंतर शुक्रावर सुद्धा मिशन करणार आहे. चंद्रावर यशस्वीपणे लँन्डिंग केल्यानंत इस्रोने आता पुढील मिशनची तयरी करत आहे. अमेरिकेतील आंतराळ एजेंसी नासा भारतासोबत मिळून जगाचे मोजमाप करणार आहे. त्याचसोबत भारत मिशन गगनयानला पूर्ण करत आंतराळाच्या जगात एक नवा इतिहास रचण्यास प्रयत्न करणार आहे. अशातच जाणून घेऊयात इस्रोच्या काही महत्त्वाच्या मिशनबद्दल अधिक. (Chandrayaan-3)
सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1
इस्रो सुर्याला समजून घेण्यासाठई आदित्य एल-१ चे प्रक्षेपण करणार आहे. हे देशातील पहिले आंतराळ अभियान असेल, जे सुर्याचा अभ्यास करेल. आदित्य एल-१ सूर्य आणि पृथ्वीदरम्यानचा एक खास बिंदू लँगरेंज पॉइंट- १ ज्याला एल-१ असे म्हटले जाते तेथे स्थापन होणार आहे. यान सुर्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. सु्र्याला समजून घेण्यासाठी इग्रोचे यान १५ लाख किमीचे अंतर पार करणार आहे. या सप्टेंबर मध्ये श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून त्याचे उड्डाण होणार आहे.
जगाचे मोजमाप करणार निसार
इस्रो आणि अमेरिकन आंतराळ एजेंसी नासाने संयुक्त रुपात ते तयार केले आहे. हा उपग्रह १२ दिवसात संपूर्ण जगाचे मोजमाप करणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीच्या परिसंस्थेची संपूर्ण तपशीलवार माहिती उपलब्ध होऊ शकते. यामध्ये समुद्राचा स्तर, भूजल, नैसर्गिक संकटे, भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि पृथ्वीबद्दलचे होणारे बदल याची माहिती मिळेल. वर्ष २०२४ मध्ये हे मिशन पार पडू शकते.
एक्सपोसॅट दुसरे ध्रुवीय मिशन
इस्रो याच वर्षात एक्स-रे पोलारिमीटर सॅटलाइन उपग्रह सोडू शकतो. एक्सपोसॅट काही परिस्थितीमध्ये उज्ज्वल खगोलीय एक्स-रे स्रोतांच्या विविध गतिशीलतेचा अभ्यास करेल. हे देशातील पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन असेल. अशा प्रकारचे एक प्रमुख मिशन नासाचे इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोर आहे जे २०२१ मध्ये लॉन्च झाले होते. (Chandrayaan-3)
स्पेडएक्स
स्पेडएक्स मिशन अंतर्गत इस्रो दोन आंतराळ यान सोडेल आणि त्यांना आंतराळात जोडण्याचे परिक्षण केले जाईल. मिशनच्या यशामुळे आंतराळात मानव मिशन यशस्वी होऊ शकते की नाही हे ठरेल. मिशनचा दुसरा पैलू असा की, उपग्रहांच्या जीवनकाळ हा दीर्घ करण्यास मदत होईल. धरतीवरुन दुसरे यान पाठवून त्यात इंधन सुद्धा भरले जाऊ शकते. तिरुवनंतपुरम स्थित विक्रम साराभाई आंतराळ केंद्रातून यावर काम केले जात आहे.
हेही वाचा-इस्रोकडून २०३५ पर्यंत बनवण्यात येणार स्वत:चे स्पेस स्टेशन
गगनयानवर लक्ष
इस्रो २०२४ मध्ये गगनयान मिशनमध्ये मानवाला पाठवू शकतो. मिशन २०२२ साठी ते प्रस्तावित होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते स्थगित झाले. केंद्रीय विज्ञान आणि प्रौद्योगिकी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी असे म्हटले की, मिशनपूर्वी व्यक्तीसारखी दिसणारी एक महिला रोबोट व्योममित्रा पुढील वर्षांत आंतराळात पाठवली जाणार आहे.