Home » Chandrayaan-3: थेट चंद्रावर ‘या’ कारणास्तव जात नाही अंतराळयान

Chandrayaan-3: थेट चंद्रावर ‘या’ कारणास्तव जात नाही अंतराळयान

इस्रोचे नुकतेच आपले चंद्रयान-3 लॉन्च केले आहे. याची जगभरात चर्चा सुद्धा होत आहे. अशातच आता काहींना असा सुद्धा प्रश्न पडला आहे की, चंद्रयानला थेट चंद्रावर पाठवता येते तर 42 दिवस फिरत राहण्याची काय गरज?

by Team Gajawaja
0 comment
Chandrayaan-3
Share

इस्रोचे नुकतेच आपले चंद्रयान-3 लॉन्च केले आहे. याची जगभरात चर्चा सुद्धा होत आहे. अशातच आता काहींना असा सुद्धा प्रश्न पडला आहे की, चंद्रयानला थेट चंद्रावर पाठवता येते तर 42 दिवस फिरत राहण्याची काय गरज? जर नासा चार दिवसात आपले यान चंद्रावर पाठवतो तर भारताला 42 दिवस का लागतायत? याचीच उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. खरंतर यामागे दोन मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे फिजिक्स म्हणजेच भौतिक विज्ञान आणि दुसरे म्हणजे पैसे. (Chandrayaan-3)

खरंतर चंद्र हा पृथ्वीपासून 3.38 लाख किमी दूरवर आहे. हे अंतर केवळ चार दिवसात पूर्ण होऊ शकते किंवा एका आठवड्याभरा. मात्र कोणतेही आंतराळ यान हे थेट कोणत्याही ग्रहावर का पाठवले जात नाही? त्याला पृथ्वीच्या चहूबाजूंना परिक्रमा करण्यासाठी का सोडले जाते? याबद्दल ही जाणून घेणार आहोत.

नासाने आपले यान चंद्रावर चार ते आठवड्याभरात पाठवले होते. मात्र इस्रो असे का करत नाही? त्यांना चार दिवसांऐवजी 40-42 दिवस का घेतायत? यामागे काही खास कारण आहे का? तर हो, पहिली गोष्ट म्हणजे ते पृथ्वीच्या चहूबाजूंना फिरवून अंतराळयानला खोलवर अंतराळात पाठवण्याची प्रक्रिया ही स्वत पडते.

असे नव्हे की, इस्रो थेट आपले यान चंद्रावर पाठवू शकत नाही. मात्र नासाच्या तुलनेत इस्रोचे प्रोजेक्ट हे स्वस्त असतात. त्यासाठी अधिक खर्च केला जात नाही. मात्र उद्देश हा पूर्ण होतो. इस्रोकडे नासाप्रमाणे ताकदवान आणि मोठे रॉकेट्स नाहीत. जे चंद्रयानला थेट चंद्राच्या थेट कक्षेत पाठवता येतील. असे रॉकेट्स बनवण्यासाठी हजारो-कोटी रुपयांचा खर्च येतो.

Chandrayaan-3

Chandrayaan-3

तर चीनने 2010 मध्ये चांगई-2 मिशन चंद्रावर केले होते. ते चार दिवसात चंद्रावर पोहचले होते. चांगई-3 सुद्धा पोहचले होते. सोवियत संघाचे पहिले लूनर मिशन लूना-1 केवळ 36 तासात चंद्राजवळ पोहचले होते. अमेरिकेचे अपोलो-11 कमांड मॉड्युल कोलंबियाच्या सुद्धा तीन अंतराळवीरांना घेऊन चार दिवसांपेक्षा अधिक वेळात पोहचले होते.

चीन, अमेरिका आणि सोवियत संघांनी अशा मिशनसाठी मोठ्या रॉकेट्सचा वापर केला होता. चीन चांग झेंग-3 सी रॉकेटचा वापर करण्यात आला होता. या मिशनसाठी जवळजवळ खर्च 1026 कोटी रुपये आला होता. स्पेसएक्सच्या फॉल्कन-9 रॉकेटच्या लॉन्चिंगची किंमत 550 कोटी ते 1000 कोटी होती. तर इस्रोच्या रॉकेटच्या लॉन्चिंगची किंमत 150 ते 450 कोटींपर्यंत होती. (Chandrayaan-3)

अंतराळयानात इंधनासाठी मर्यादा असते. मात्र त्याचा वापर दीर्घकाळ करायचा असतो. यामुळे त्याला थेट अन्य ग्रहावर पाठवले जात नाही. कारण यामधेच सर्व इंधन संपते. त्यामुळे ते आपले मिशन पूर्ण करु शकत नाही. अशातच पृथ्वीच्या चहूबाजूंना परिक्रमा केल्याने इंधनाचा वापर करुन यान पुढे जाते.

पृथ्वीची गति आणि गुरुत्वाकर्षणाचा फायदा रॉकेटला होतो
रॉकेटला खोलवर अंतराळात पाठवण्यासाठी गरजेचे आहे की, पृथ्वीची गति आणि गुरुत्वाकर्षणाचा फायदा. याबद्दल सोप्प्या पद्धतीने समजून घ्यायचे असेल तर जेव्हा ट्रेनची गति मंदावते तेव्हा तुम्ही त्याच्या गतिच्या दिशेने उतरता. असे केल्याने पडण्याची शक्यता फार कमी असते. अशाच प्रकारे रॉकेट सुद्धा अंतराळात पाठवले असता ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अधिक वेगाने खेचले जाईल.

पृथ्वीची दिशेने त्याच्या गतिचा ताळमेळ हा व्यवस्थितीत बसवून त्याच्या चहूबाजूंना परिक्रमा केल्याने ग्रॅविटी पुल कमी होते. अशातच अंतराळयान हे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता कमी होते. पृथ्वी आपल्या अक्षाच्या जवळ 1600 कमी प्रतितास वेगाने फिरते. याचा फायदा हा अंतराळयानाला होतो. तर पृथ्वीच्या चहूबाजूंनी फिरताना वारंवार ऑर्बिट मॅन्युवरिंग करतो. म्हणजेच आपली कक्षा बदलतो. (Chandrayaan-3)

हेही वाचा-ISRO अंतराळयानाच्या उड्डाणासाठी ‘या’ कारणास्तव निवडते श्रीहरिकोटा

कक्षेत बदल होण्यास वेळ लागतो. यामुळेच चंद्रयान-3 हे चंद्रावर जाण्यासाठी 42 दिवसांचा कालावधी लागत आहे. कारण चंद्रयान-3 ला पाच परिक्रमा पृथ्वीच्या चहूबाजूंना कराव्या लागणार आहेत. त्यानंतर दूरवर लूनर ट्रांजिट ऑर्बिटजवळ प्रवास करायचा आहे. त्याच्यानंतर ते चंद्राभोवतीच्या कक्षा बदलणार आहे. इस्रोने आता पर्यंत चंद्रयान-3 ची दोन वेळा कक्षा बदलली आहे. पहिल्यांदा 36,500 ते 41,603 हजार किलोमीटरवर पोहचवले आहे. म्हणजेच एपोजी बदलली. त्यानंतर दुसऱ्यांदा 173 किलोमीटर ते 226 किलोमीटर दूर बदलली. म्हणजेच पेरीजी.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.