आपण बहुतांशवेळा लोकांना असे बोलताना पाहतो की, आम्ही तर ब्राउन शुगर खातो, व्हाइट शुगर खाणे बंद केले आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, नक्की या दोघांमधील फरक काय? याच संदर्भात आपण या लेखात अधिक जाणून घेणार आहेत. खरंतर ब्राउन आणि व्हाइट शुगर हे दोन्ही साखरेचेच प्रकार आहेत. मात्र त्यांच्यामध्ये थोडा फरक असतो. (Brown vs white sugar)
ब्राउन शुगर हा एक साखरेचा प्रकार आहे. जी सामान्य साखरेपेक्षा थोडी गडद किंवा थोडी फिकट रंगाची असते.ही साखर खास पद्धतीने तयार केली जाते. त्यात मोलासेज (उसाचा रस) आणि साखरेचे संयोजन करुन तयार केली जाते. ब्राउन शुगर ही विविध पदार्थांसह बेकरी प्रोडक्ट्समध्ये वापरली जाते. ब्राउन शुगरला सर्वसामान्य साखरेपेक्षा हेल्दी आणि पोषक असल्याचे मानतात. त्यामुळे ब्राउन शुगर बहुतांशजण आपल्या पदार्थांत वापरतात.
व्हाइट शुगर मध्ये उच्च कार्बोहाइड्रेट असतात. जे साखरेचे अगदी सामान्य रुप मानले जातात. ते सर्व सामान्यपणे सफेद रंगाचे असतात. ही साखर आपण सर्वजण खातो. त्यामुळे पदार्थांची गोड चव अधिक वाढली जाते.मोलासेजच्या कारणामुळे दोन्ही साखरेच्या रंगात अंतर असतो.
ब्राउन शुगरमध्ये असतात पोषक तत्व
व्हाइट शुगर किंवा रिफाइंड शुगर एक प्रकारचे कार्बोनेटेड साखर आहे. जी सफेद रंगाची असते. यामधील खनिज काढल्यानंतर शुद्ध केले जातात. यामध्ये व्हिटॅमन मिनरल्स आणि फायबरचा अभाव असतो. दुसऱ्या बाजूला ब्राउन शुगर मध्ये मोलासेसला साखरेतून काढले जात नाही. त्यामुळे याचा रंग अधिक गडद दिसतो. त्याचसोबत ब्राउन शुगरमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. (Brown vs white sugar)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ब्राउन शुगर
ब्राउन शुगरमध्ये मोलासेज अधिक प्रमाणात असते. त्यामुळे ती मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार उपयुक्त मानली जाते. त्याचसोबत ब्राउन शुगरमध्ये फायबर असतात जे पचनासाठी उत्तम मानले जातात आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. काही लोक ही शुगर आपले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याने गोड पदार्थांत वापरतात.
हेही वाचा- Weight Loss Drinks: वजन कमी करायचयं? तर मग आजपासूनच ‘हे’ ड्रिंक्स प्यायला सुरुवात करा !
व्हाइट शुगरचा स्वाद हा अधिक गोड असतो. त्यामुळे गोड पदार्थ अधिक खावेसे वाटतात. याव्यतिरिक्त या साखरेचा वापर चहा, कॉफी आणि अन्य पेयांमध्ये केला जातो. व्हाइट शुगरमध्ये सक्रिय तत्व असतात, जे शरिराला इंस्टेंट एनर्जी देतात. व्हाइट शुगरमध्ये फार कमी पौष्टिक तत्व असतात. जसे की, कॅल्शिअम, लोह आणि पोटॅशियम.