वास्तुशास्र असे एक प्राचीन विज्ञान आहे ज्याच्या माध्यमातून काही गोष्टी योग्य दिशेला ठेवण्यासह घरातील वास्तु दोष करण्यास मदत करतात. असे मानले जाते की, जर घरात ठेवण्यात आलेल्या कोणत्याही गोष्ट दिशेला ठेवल्यास तर नेहमीच सुख शांति कायम राहते. त्याचसोबत सकारात्मक उर्जा ही घरात निर्माण होतात. अशातच वास्तुनुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. आपण पाहतो की, बहुतांश लोक घरात पितळेचा कासव (Brass Turtle) ठेवतात. परंतु तो ठेवण्यामागील नक्की कारणं काय आणि त्यामुळे आपल्याला काय लाभ होते हे वास्तुशास्रात सांगितले गेले आहे. त्याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
घरात पितळेचा कासव कुठे ठेवावा?
वास्तु शास्रानुसार पितळेचा कासव अत्यंत शुभ मानला जातो. तो आनंदाचा प्रतीक मानतात. जर आपण घरात पितळेचा कासव उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्यास तर घरात नेहमीच सकारात्मक उर्जा निर्माण होत राहते. तसेच घरातील नकारात्मक उर्जा दूर होण्यास मदत होते.
हा कासव घरात सौभाग्य घेऊन येतो. जर तुम्ही तो योग्य दिशेला ठेवल्यास तर परिवारातील सदस्य, खासकरुन अभ्यास करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात शुभ आणि सौभाग्य आकर्षित होते. पितळेचा कासव तुम्ही दक्षिण-पश्चिम दिशेला सुद्धा ठेवू शकता.
पितळेचा कासव ठेवण्याचे फायदे
जर आपण पितळेचा कासव ठेवतो तर आपल्या आयुष्यात शुभ गोष्टी घडतात. तसेच अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो खुप मदत करतो. अशा प्रकारचा कासव मुलांची एकाग्रता ही वाढवतो. जर तुम्ही अभ्यासाच्या खोलीत हा कासव ठेवल्यास तर मुलांना यश मिळेल. त्याचसोबत नोकरीत लाभ मिळवून देण्यास ही मदत करतो.
कशा प्रकारे ठेवाल पितळेचा कासव
जर तुम्ही घरात पितळेचा कासव (Brass Turtle) ठेवत असाल तर लक्षात ठेवा त्याचे पाय नेहमीच पाण्यात बुडालेले असावेत. एका पीतळेच्या भांड्यात थोडे पाणी टाका आणि त्यामध्ये कसावाचे तोंड हे घराच्या दिशेने असावे.
अशा प्रकारे ठेवण्यात आलेला कासव हा घरात धनाला आकर्षित करतो आणि आयुष्यात यशाचे मार्ग ही दाखवतो. त्यामुळे तुम्ही हा कासव घरातील देव्हाऱ्याच्या जवळ ही ठेवू शकतात. लक्षात ठेवा की, कासवाचे तोंड नेहमीच देव्हाऱ्याच्या दिशेने असावे. कासवाला पाण्यात ठेवण्यासाठी पाणी वेळोवेळी बदलत रहा. प्रयत्न करा की, पाणी दुसऱ्या दिवशी बदलून नवे पाणी त्यामध्ये ठेवा.
या धातुंचा कासव ठरु शकतो शुभ
तुम्हाला घरात कासव ठेवायचा असेल तर धातुचा उत्तम मानला जातो. काही विशेष धातुंचा कासव ठेवणे तुमच्यासाठी उत्तम मानले जाते. घरात पितळ, सोने किंवा चांदीचा कासव ठेवू शकता. परंतु तो तुम्ही घरात उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेला ठेवू शकता.
हे देखील वाचा- कपाळाला टिळा का लावला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि नियम
अशा काही प्रकारचे कासव ही घेऊन येतात समृद्धी
घरात सुख-समृद्धीसाठी तुम्ही पितळ किंवा कोणत्याही धातुचे कासवं किंवा क्रिस्टलचा कासव ही ठेवू शकता. मात्र क्रिस्टलचा कासव ठेवताना तो ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास तो अधिक लाभदायी ठरेल. त्याचसोबत काही वास्तूच्या नियमानुसार तुम्ही कासव ठेवू शकता.