नोव्हेंबर महिन्यापासून पर्यटनाचा हंगाम सुरु होतो. अशावेळी पर्यटनासाठी वेगळी स्थाने कुठली याचा शोध सुरु झाला आहे. या सर्वांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजे, आपला शेजारी असलेला भूतान देश. दक्षिण आशियातील पूर्वेकडील हिमालयीन प्रदेशात वसलेल्या या निसर्गसंपन्न देशात पर्यटनाचा हंगाम हा वर्षभराचा असतो. भारत आणि चीन यांच्यामधील या देशात घटनात्मक राजेशाही आहे. भारताचा मित्र देश असलेल्या भूतानमध्ये एकापेक्षा एक अशी पर्यटन स्थळे आहेत. आता याच देशात एका नवीन शहर स्थापण्याची घोषणा करण्यात आली आहे. माइंडफुलनेस सिटी असे या शहराचे नाव असून यातील कायदेही वेगळे आहेत. जगातील सर्वात आनंदी आणि सुंदर शहर म्हणून हे माइंडफुलनेश शहर असणार आहे. भूतानची ओळख बनू पहाणा-या या शहरातील अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करणा-या आहेत. (Bhutan)
भूतान सरकारने अलिकडेच माइंडफुलनेस सिटीची घोषणा केली आहे. भूतान हा जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याच देशानं आता नवीन शहर तयार करत त्याचे ‘माइंडफुलनेस सिटी’ असे नामकरण केले आहे. या देशाचे कायदे आणि अन्य देशाचे कायदे वेगळे असणार आहेत. माइंडफुलनेस सिटी प्रकल्प सुमारे 2500 चौरस किलोमीटरमध्ये तयार होणार आहे. आनंदी राहण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी जगात ज्या काही सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्यांचा या शहरात समावेश असणार आहे. भूतानच्या गेलेफूमध्ये हे नवीन शहर होईल. गेलेफूची भूमी सुंदर आणि प्राचीन आहे. त्यामुळे या शहराची स्थापना येथे होत आहे. भूतानमध्ये जैविक विविधता आहे. या सर्वांचा समावेश यामध्ये असणार आहे. स्वच्छ ऊर्जेची पूर्ण क्षमता असलेल्या या शहरात जगभरातील पर्यटकांना आमंत्रण करण्यात आले आहे. (Social News)
“गेलेफु माइंडफुलनेस सिटी” द्वारे भूताऩ दक्षिण आशियाला आग्नेय आशियाशी जोडणार आहे. हा एक आर्थिक कॉरॉडॉरही होणार आहे, यातून भूतानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या शहराती निर्मिती करतांना प्रत्येक गोष्टीचा विचार कऱण्यात आला आहे. यात माणसाला निसर्गाबरोबर जोडण्यासाठी प्रयत्न केला आहे. या शहरामध्ये चालण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक असणार आहेत. शिवाय सायकल चालवण्याचा मार्ग वेगळा असणार आहे. सोबतच ध्यान धारणा आणि योगासने करण्यासाठीही ठराविक अंतरावर ध्यान धारणा केंद्र उभारण्यात येत आहे. माइंडफुलनेस सिटीचे सर्वात मोठे वैशिष्ट असे आहे की, या शहरात कुठेही फिरतांना वाहन वापरण्याची गरज नाही. चालत, किंवा सायकलच्या आधारे या शहराचा फेरफटका मारण्यात येणार आहे. तसेच मध्ये विश्रांतीची गरज लागली तर त्यासाठी उद्यानेही उभारण्यात येत आहेत. या सर्वांबरोबर वनांचे संवर्धन करणारे शिक्षण, सार्वजनिक समुदाय उपक्रम, आरोग्य सेवा आणि निरोगीपणा केंद्रे आणि इको-टूरिझम यांनाही या आनंदी शहरात प्रोत्साहन देणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. (Bhutan)
भूतान सरकारचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प असून यासाठी $100 दशलक्ष रोखे जाहीर करण्यात आले आहेत. भूतानची लोकसंख्या 8 लाखांपेक्षा कमी आहे. यातील बहुतांशी जनता ही पर्यटनावर अवलंबून आहे. याच पर्यटनावर अवलंबून असलेल्या भूतानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही माइंडफुलनेस शहराची संकल्पना मांडण्यात आली आहे. कोव्हिड महामारीच्या दोन वर्षाच्या कालखंडात भूतानला मोठा फटका बसला होता. भूताननं आपल्या देशाच्या सीमा परदेशी पर्यटकांसाठी सील केल्या. त्यामुळे भूतानचे कोव्हिड महामारीपासून संरक्षण झाले तरी, या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली. (Social News)
======
हे देखील वाचा : वेटरला टीप देण्याची सुरुवात कधीपासून झाली ?
====
देशातील पर्यटनावर आधारीत प्रकल्प, हॉटेल बंद कऱण्याची वेळ आली. या सर्वातून आता भूतान सावरत आहे. मात्र कोव्हिड काळात अर्थव्यवस्थेवर आलेले ताण अद्यापही आहे. माइंडफूलनेस सिटीच्या संकल्पनेतून हिच अर्थव्यवस्था सावरण्याचा भूतान सरकारचा प्रयत्न आहे. यातून भूतान आणि भारत यांच्यामधील रस्ते आणि रेल्वेचे जाळेही विस्तारणार आहे. भारताच्या सिमेपर्यंत रस्ते आणि रेल्वे वाहतूक नेण्याचा यातून विचार होत आहे. आता हे शहर तयार होत असून पुढच्या 7 वर्षात येथे दहा लाख नागरिक रहायला येतील अशी भूतान सरकारची आशा आहे. काही परदेशी नागरिकांनाही यातून भूतानमध्ये रहाण्याची संधी मिळणार आहे. परदेशातील अनेक नागरिक मानसिक स्वास्थ शोधण्यासाठी युएई किंवा दुबई सारख्या ठिकाणी जातात. त्यांना आता भूतानमधील माइंडफुलनेस सिटी हा पर्याय उपलब्ध होणार आहे. (Bhutan)
सई ब