Home » चिनमध्ये ‘या’ कंदापासून बनवतात अनेक पदार्थ

चिनमध्ये ‘या’ कंदापासून बनवतात अनेक पदार्थ

by Team Gajawaja
0 comment
Benefits Of Water Chestnut
Share

शिंगाडा हा कंद कोणी खाल्ला आहे का ? ऑक्टोबर महिन्यात ठराविक फळवाल्यांकडे हिरव्या देढांसह मिळणारे कोवळे शिंगाडे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तयार होऊन काळ्या रंगात बाजारात विकायला येतात. कोवळे, हिरव्या रंगातले शिंगाडे नुसते सोलून खाल्ले जातात.  काही ठिकाणी त्यांची भाजीही केली जाते.  तर तयार झालेले काळे शिंगाडे उकडून खाल्ले जातात.  हे दोन्ही प्रकारचे शिंगाडे चवदार असतात. पण फक्त चवीसाठीच ते खाल्ले जात नाहीत तर त्यापासून मिळणारे फायदेही अफाट आहेत.  पाण्यात, दलदलीत मिळणारे हे शिंगाडे भरपूर पौष्टीक तत्त्वांनी युक्त असतात.  हिवाळ्याच्या मौसमामध्ये या शिंगाड्यांचे सेवन  केल्यावर शरीराला आवश्यक अशी उर्जा मिळतेच.  शिवाय अनेक रोगांचे समुळ उच्चटन या शिंगाड्यापासून केले जाते.  आपल्याकडे उपवासामध्ये शिंगाड्याच्या पिठाचे विविध प्रकार केले जातात.  उपवासामुळे वाटणारा थकवा कमी करण्यासाठी हे पौष्ठिक पिठ उपयोगी पडते.  मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बाजारात येणा-या ताज्या शिंगाड्यांचे सेवन केले तरी शरीराला आवश्यक अशी पोषक तत्त्वे मिळू शकतात.  (Benefits Of Water Chestnut)

शिंगाड्याचा वापर भारताबरोबर चिनमध्येही मोठ्याप्रमाणात केला जातो. चिनमध्ये या कंदापासून अनेक पदार्थ बनवले जातात.  मात्र महाराष्ट्रात या कोवळ्या शिंगाड्याच्या कंदाची काही ठिकाणी भाजी केली जाते.  ब-याचवेळा ही कंद अशीच कच्ची खाल्ली जातात.  उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ही शिंगाड्याची कंद गाडीवर मोठ्याप्रमाणात विकली जातात.  एक चाटप्रकार म्हणून त्यांचे सेवन केले जाते.  कच्च्या शिंगाड्यांवर मसाले आणि चाटसमाला लावून त्यांना खाल्ले जाते.  या भागात पडणा-या कडाक्याच्या थंडीपासून या शिंगाड्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि थंडीपासून आपसूक बचाव होतो, असे मानण्यात येते.  महाराष्ट्रातही शिंगाड्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.  उपवासाचा पदार्थ म्हणून या शिंगाड्याकडे बघितले जाते.  

हिरवे शिंगाडे ब-याचवेळा नुसते सोलून खाल्ले जातात.  (Benefits Of Water Chestnut) यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.  त्यामुळे प्रवासात पाणी आणि भूक या शिंगाड्यांवर भागवता येते.  थंडीचा मौसम सुरु झाला की सर्वात जास्त त्रास होतो तो दम्याच्या रुग्णांना.  या दम्याच्या रुग्णांसाठी हे शिंगाडे वरदान ठरतात.  तसेच मुळव्याधीचा त्रास असेल त्यांनाही शिंगाडा खाल्ला तर फायदा होतो.  शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.  थंडीमध्ये काहींना हाडांमध्ये वेदना होतात.  अशावेळी या शिंगाड्यांचे सेवन केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.  मासिक पाळीच्या समस्याही शिंगाड्यांच्या सेवनाने दूर होतात.  शिंगाड्यामुळे शरीरास उर्जा मिळते.  यामुळे थंडीमध्ये त्याचा जास्त फायदा होतो.  

=========

हे देखील वाचा : मायोसायटिस आजार तुम्हाला आहे का?

=========

शिंगाड्याला इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट (Water chestnuts)  असे म्हणतात.  पाण्यामध्ये येणारे हे कंद दिवाळीच्या आसपास बाजारात विक्रीसाठी येतात.  दलदलीच्या भागात या शिंगाड्यांची शेती केली जाते.  अलिकडे भारतीय आणि पाश्चात पदार्थांचा मेळ जिथे केला जातो, तिथे या शिंगाड्यांचे सॅलडही लोकप्रिय ठरत आहे.  कच्च्या शिंगाड्यांमध्ये विविध प्रकारचे मसाले आणि सॅलेडच्या भाज्या सोबत दिल्या जातात.  पण कशाही प्रकारे का होईना हे शिंगाडे खाणे खूप फायदेशीर ठरते.  (Benefits Of Water Chestnut) यात कमी कॅलरीज भरपूर न्यूट्रिशन आहेत.  याशिवाय त्यात फायबरचे प्रमाणही भरपूर आहे.  फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात रहाते.  शिंगाड्यामध्ये मॅंग्नेशिअम, रायबोफ्लोविन आणि व्हिटॅमिन बी-6 मोठ्या प्रमाणात आढळते.  शिंगाड्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. शिंगाडे खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण होते, असे संशोधनही नुकतेच झाले आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी तर हे शिंगाडे वरदान म्हणायला हवे.  यात 74 टक्के पाण्याचे प्रमाण आहे.  शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे पोट भरल्याची जाणीव होते.  त्यामुळे ब-याचवेळा वजन कमी करण्यासाठी आहारतज्ञ आहारात शिंगाड्याचा किंवा त्याच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा असा सल्ला देतात. 

या सर्वांसोबत शिंगाड्यांबाबत केलेल्या संशोधनानुसार शिंगाडे हे कॅन्सर सारख्या रोगालाही दूर ठेऊ शकतात.  (Benefits Of Water Chestnut) शिंगाड्यामध्ये अँटिऑक्सिडंन्ट फेरुलिक अ‍ॅसिड  अधिक आढळून येते. अभ्यासानुसार हे अ‍ॅसिड कॅन्सरसारख्या रोगाला अटकाव करु शकते.  महिलांमध्ये वाढणा-या स्तनाच्या कर्करोगावरही हे शिंगाडे फायदेशीर असल्याचे संशोधन झाले आहे.एकूण काय दलदलीत आढळणारे शिंगाडे शरीराला अत्यंत पोषक आहेत.  थंडीच्या मौसमात मिळणा-या या काळ्या शिंगाड्याचे फायदे मात्र सोनेरी आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.