सध्या शिक्षण आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीमुळे जगत प्रगती करत आहे. त्यामुळे लोकांचा काही गोष्टींवरील अंधविश्वास ही दूर होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जगाला अशी माणसं भेटत आहेत ते आपल्यासह इतरांना सुद्धा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जादुटोण्यावर विश्वास ठेवल्याने शिक्षण तर दूरच राहिले पण अंधविश्वास अधिक वाढला जातो. यामागील काही कारणे असू शकतात. एका नव्या अभ्यासात असे दिसून आले की, जगभरात जेवढी काही लोक आहेत त्यांच्यापैकी जादूटोण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या ही अपेक्षेपेक्षा अधिक आहे. (Believe in Witchcraft)
जगभरात बहुसंख्येने करण्यात आलेल्या अभ्यासात त्या लोकांचा सुद्धा सहभाग आहे जे जादूटोण्यावर विश्वास ठेवतात. जादूटोणा ही अशी एक कला आहे ज्यांच्यामध्ये काही व्यक्तींना सुपरनॅच्युरल पॉवर मिळालेली असते. त्याच्या माध्यमातून दुसऱ्यांना नुकसान पोहचवणे ते मारण्यापर्यंतची क्षमता असते.
आता एका नव्या अभ्यासात वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे अमेरिकन अर्थशास्रज्ञ बोरिस ग्रॅशमॅन यांना असे दिसून आले की, जादूटोण्यावर विश्वास ठेवणे हे जसे यापूर्वी समजले जात होते त्यापेक्षा काही पटींनी अधिक जगात त्याचे जाळे आता पसरले गेले आहे. ग्रॅशमॅनन यांनी याबद्दलची एक मोठी आकडेवारी जमा केली जी ९६ देश आणि परिसरातील १.४ लाख लोकांची आहे. यावरुन असे कळते की, यामध्ये ४० टक्के लोकांनी स्विकार केले की, ते जादूटोण्यावर विश्वास ठेवतात. तर काही लोक अशी सुद्धा आहेत जे जादूटोण्याच्या माध्यमातून श्राप सुद्धा दिला जातो असे मानतात.
जथे असे वाटते की, अशा प्रकारच्या जादूटोण्यावर विश्वास ठेवणारे जगभरात पसरले गेले आहेत. मात्र तरीही अशा विश्वात विविध ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये विविधतेसह भेटतात. जसे स्विडनमध्ये केवळ ९ टक्के लोक या गोष्टीवर विश्वास करतत. तर ट्युनिशियामध्ये ९० टक्के लोकांनी जादूटोण्यावर विश्वास ठेवत असल्याचे स्विकार केले आहे. ग्रॅशमॅनन यांना असे ही कळले की, जादूटोणा वर विश्वास ठेवणारी वेगवेगळी लोक आणि समूह सुद्धा आहेत. ज्यामध्ये उच्च शिक्षण आणि आर्थिक रुपात सुरक्षित स्तरातील लोकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याबद्दल असे मानले जाते की, ते या गोष्टीवर विश्वास ठेवत नसतील. या व्यतिरिक्त जादूटोण्यावर विश्वास हा वेगवेगळ्या देशात विविध प्रकारचे मनोवैज्ञानिक, सांस्कृतिक, संस्थानात्मक आणि सामाजिक आर्थिक कारण सुद्धा असतात.(Believe in Witchcraft)
हे देखील वाचा- कपाळाला टिळा का लावला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि नियम
विश्लेषणात असे दिसले की, सर्व कारणांमध्ये खास प्रकारची स्थिती ही जादूटोण्यावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन देते. हे सुद्धा दिसले, या खास प्रकारच्या स्थितीच्या कारणामुळेच त्यांच्यामध्ये विश्वास अधिक असतो. PLoS ONE मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात ग्रॅशमॅनन यांनी असे सांगितले की, जादूटोण्यावर विश्वास ठेवण्याची किंमत ही सामाजिक संबंध, उच्च स्तरावर बैचेन वाटणे, जगाप्रति निराशावादी विचार अशा काही गोष्टींबद्दल त्यांना काही वाटणे कमी झाल्याचे दर्शवते.