पाणी आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा असा भाग. पाणी हा असा घटक आहे, ज्याच्याशिवाय कोणीही जगूच शकत नाही. असे सांगितले जाते की, अन्नाशिवाय तरी मनुष्य काही काळ तग धरू शकेल, मात्र पाण्याशिवाय व्यक्ती अजिबातच जगू शकत नाही. निरोगी आयुष्याचा महत्वाचा मूलमंत्र म्हणजे दररोज किमान ३/४ लिटर पाणी पिणे हा आहे. रोज नियमित पाण्याचे सेवन केले तर आपण अनेक आजारांना दूर ठेऊ शकतो. रोज भरपूर पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत. मात्र आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की, जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर पाणी प्यावे?
जेवल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत आणि जेवणानंतर किती वेळानंतर पाणी प्यायलं पाहिजे.
जेवतांना पाणी प्यायल्याने पचनाची क्रिया हळू होते. त्यामुळे गॅस, छातीत जळजळ यासारख्या समस्याही सुरू होतात. जेवताना पाणी प्यायल्याने अन्नातील पोषकद्रव्ये पाण्यात विरघळतात आणि लघवीसोबत बाहेर पडतात. यामुळे शरीराला अन्नातून आवश्यक आणि अपेक्षित पोषक द्रव्ये मिळत नाहीत. याचा परिणाम थेट प्रतिकारशक्तीवर होतो.
जेवण करत असताना पोटात असलेल्या गॅस्ट्राइटिस वाढते. हे अन्न पचवण्यास मदत करते. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने जठराची सूज कमी होते, त्यामुळे खाललेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. गॅस्ट्राइटिस पोटाच्या ऊर्जेप्रमाणे काम करते. जेवताना किंवा नंतर लगेच पाणी पिण्याची चूक पुन्हा केल्याने भूक न लागणे, पोटात जडपणा जाणवणे आणि अपचन अशा समस्या जाणवतात. याशिवाय जेवण झाल्यानंतर ते पचवण्यासाठी आवश्यक असलेले ऍसिड किंवा इतर द्रव्य पाणीचे सेवन केल्यामुळे पातळ होतात. त्यामुळे त्यांचे काम नीट होत नाही.
आयुर्वेदानुसार जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधीच नेहमी पाणी प्यावे आणि जेवल्यानंतर किमान अर्धा तासानंतर पाणी प्यावे. कारण जेवल्यानंतर किमान ३० मिनिटांनंतर पोटात पुढची प्रक्रिया सुरू होते. यानंतर, पाणी पिण्यामुळे पाचक समस्या उद्भवत नाहीत आणि अन्न देखील सहज पचते. दुसरीकडे, जर तुम्ही जेवणादरम्यान थोडे-थोडे पाणी प्याल, तर त्याने तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही.
दररोज किती पाणी प्यावे?
तज्ज्ञांच्या मते दररोज किमान 10-12 ग्लास पाणी प्यावे. आपण जितके जास्त पाणी पितो तितके ते शरीरातून द्रव बाहेर काढते. मग ते ग्रीन टी, सूप, नारळ पाणी किंवा सरबत असो. थंड पेय टाळावे. जर तुम्ही जंक फूड खाल्ले असेल तर भरपूर पाणी प्या. यामुळे जंक फूडमध्ये असलेले अतिरिक्त मीठ पाण्याद्वारे शरीरातून बाहेर पडते.
पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धती
आयुर्वेदात असे म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही पाणी योग्य प्रकारे प्याल तेव्हाच तुम्हाला पाणी पिण्याचे फायदे मिळू शकतात. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. एवढेच नाही तर शरीरातील पेशींना आवश्यक पोषण, त्वचा निरोगी ठेवण्याचे आणि सांधे दुखीचा त्रास कमी होतो. एका श्वासात एक ग्लास पाणी पित असाल तर हे चुकीचे आहे. पाणी पितांना एक एक घोट घेऊन प्या.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
एक एक घोट पाणी प्या.
जेवण करण्यापूर्वी लगेच किंवा नंतर पाणी पिऊ नका
जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटाआधी पाणी प्या.
जेवण करताना तहान लागल्यास 1-2 घोट पाणी प्या
अन्न पचण्यासाठी गरम पाणी प्या.