Home » मुल्तानी मातीत मिक्स करा ही 1 वस्तू, उजळेल त्वचा

मुल्तानी मातीत मिक्स करा ही 1 वस्तू, उजळेल त्वचा

त्वचेसंबंधित वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी मुल्तानी मातीचा वापर केला जातो. जाणून घेऊया उजळ त्वचेसाठी मुल्तानी मातीत कोणती वस्तू मिक्स केल्याने तुमचे सौंदर्य खुलले जाईल.

by Team Gajawaja
0 comment
Beauty Tips
Share

Beauty Tips : आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे स्किन केअर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. एकापेक्षा एक उत्तम इंग्रीटिएंट्स आणि केमिकल्सचा वापर करून तयार केलेले ब्युटी प्रोडक्ट्स डेली स्किन केअर रुटीनचा हिस्सा मानले जातात. पण सौंदर्यासंदर्भातील अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर आपल्या आजी-आईपासून केला जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुल्तानी माती. चेहऱ्यावर मुल्तानी माती वेगवेगळ्या प्रकारे लावता येऊ शकते. यामध्ये जिंक, सिलिका, मॅक्नेशिअम आणि ऑक्साइड्स अशतात. यामुळे त्वचेवरील तेल शोषून घेत त्वचा मऊ होण्यास मदत करते. जाणून घेऊया मुल्तानी मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या फेस पॅकबद्दल सविस्तर…

मुल्तानी माती आणि मध
मुल्तानी माती आणि मधाचा फेसपॅक कॉम्बिनेशन स्किनसाठी परफेक्ट आहे. यासाठी एका वाटीत दोन चमचे मुल्तानी माती आणि एक चमचा मध मिक्स करा. पेस्ट तयार केल्यानंतर चेहऱ्यावर लावा. खरंतर, पेस्ट घट्ट असू द्या. मुल्तानी माती आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा उजळ होईल.

मुल्तानी माती आणि दही
चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स हटवण्यासाठी तुम्ही मुल्तानी माती आणि दह्याचा पॅक लावू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा मुल्तानी माती आणि एक चमचा दही घेऊन त्याची पेस्ट तयार करा. या पॅकने त्वचेवरील धूळ आणि डेड स्किन दूर होण्यास त्वचा डीप क्लिजिंग होण्यास मदत होईल.

मुल्तानी माती आणि दूध
एका वाटीत दोन चमचे मुल्तानी माती आणि दोन चमचे दूध घेऊन पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये कोरफडीचे जेलही टाकू शकता. पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 20 मिनिटांनंतर धुवून स्वच्छ करा. यामुळे त्वचा उजळ होईल. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक नक्की लावू पाहू शकता. (Beauty Tips)

मुल्तानी माती
तेलकट त्वचेसाठी मुल्तानी माती बेस्ट आहे. यासाठी मुल्तानी मातीत गुलाब पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. चेहऱ्याला 15 मिनिटे फेसपॅक लावल्यानंतर धुवा. यामुळे त्वचेवर ग्लो येईल.


आणखी वाचा :
स्वत:हून ब्राइडल मेकअप करणार असल्यास या टिप्स ठेवा लक्षात
वर्किंग वुमनसाठी हेअर केअर टिप्स, केस होतील मूळापासून मजबूत

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.