Home » BATA कंपनी स्वत:च्याच देशात व्यवसाय करण्यास झाली फ्लॉप पण भारतात रचला इतिहास

BATA कंपनी स्वत:च्याच देशात व्यवसाय करण्यास झाली फ्लॉप पण भारतात रचला इतिहास

by Team Gajawaja
0 comment
BATA History
Share

चप्पल-बूट बनवणारी कंपनी बाटा ही बहुतांश जणांना वाटते की, ती भारतीय कंपनी आहे. मात्र तसे नाही आहे. याची पायमूळ ही मध्य युरोपातील चेकोस्लोवाकिया मध्ये आहेत. या कंपनीची सुरुवात थॉमस बाटा यांनी १८९४ मध्ये केली होती. थॉमस बाटा यांचा जन्म अशा एका गरिब घरात झाला होता जे बूट बनवण्याचे काम करायचे. आर्थिक समस्येचा सामना परिवारातील मंडळी करत होते पण ती परिस्थिती थॉमस यांना बदलायची होती. सर्वात प्रथम त्यांनी आपल्या गावात दोन खोल्या या भाड्याने दिल्या. बूट ही मोठ्या स्तरावर तयार करण्याचे स्वप्न थॉमस यांनी आपल्या उराशी बाळगले होते. यामध्ये आपली आई, बहिण आणि भावाला सुद्धा सहभागी केले व त्यांना व्यापारात सुद्धा हिस्सेदार बनवले. त्यांच्या आईकडून ३२० डॉलर घेतले आणि कच्चा माल खरेदी केला.(BATA History)

जेव्हा भाऊ-बहिने सोडली साथ
थॉमस यांनी व्यवसायाची सुरुवात केली. समस्या आल्या पण तेव्हाच भाऊ-बहिणीनी साथ सोडली. तरीही थॉमस यांनी हार मानली नाही. सातत्याने संघर्ष करत अखेर तो यशाचा दिवस आला आणि त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली. हेच पाहून त्यांनी कर्ज घेत व्यापार अधिक वाढवण्याचा विचार केला. मात्र पुन्हा स्थिती बिघडली आणि व्यवहार ठप्प झाला. कर्ज फेडू न शकल्याने परिस्थिती अधिक वाईट झाली. कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यात आले.

BATA History
BATA History

कंपनी दिवाळखोर झाली आणि बूट कंपनीत कामगार म्हणून काम केले
कंपनीला दिवाळखोर घोषित केल्यानंतर थॉमस इंग्लंडला आले आणि त्यांनी एका बूटांच्या कंपनीत कामगार म्हणून काम सुरु केले. कामादरम्यान त्यांनी तेथे व्यापारासंदर्भात बारकाव्याने समजून घेतले. ६ महिने काम केल्यानंतर ते पुन्हा आपल्या देशात परतलले आणि पुन्हा नव्याने काम सुरु करण्याचे ठरविले.(BATA History)

आपली कंपनी पुन्हा नव्याने सुरु करण्याचे ठरविल्यानंतर व्यापाराला गती मिळू लागली. १९१२ मध्ये व्यापार ऐवढा वाढला की थॉमस यांनी ६०० कामगारांना भर्ती केले. मजबूत, आरामदायी आमि टिकाऊ असल्याच्या कारणास्तव बूटांची मागणी वाढली. मागणी पूर्ण करण्यासाठी थॉमस यांनी शहरांमध्ये कंपनीचे स्टोर सुरु केली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान मंदी आली आणि उत्पादनावर फार मोठा परिणाम झाला. या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी थॉमस यांनी बूटांच्या किंमती ५० टक्क्यांपर्यंत कमी केल्या. किंमत कमी झाल्यानंतर उत्पादनात १५ पटीने वाढ सुद्धा झाली. याचाच फायदा घेत थॉमस यांनी व्यापार वाढवण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये स्टोर सुरु करण्याची तयारी केली. १९२५ पर्यंत बाटाने संपूर्ण जगभरात १२२ ब्रांन्च खोलल्या. आता बाटा बूटांसह मोजे आणि टायर सुद्धा तयार करत होती. पाहता पाहता एक कंपनी बाटा ग्रुपमध्ये रुपांतरित झाली.

हे देखील वाचा- लॉजिस्टिक पॉलिसीची का आणि कशासाठी गरज असते?

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने व्यवसाय सांभाळला
एका विमान अपघातात थॉमस यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलाने व्यवसाय सांभाळला. त्यांनी उत्तम चामडे आणि रब्बरच्या शोधात भारतात आले. येथे त्यांना बहुतांश लोक ही बुटांमध्ये दिसली त्यामुळे त्यांनी सुद्धा बाटाचा व्यवसाय येथे सुरु करण्याचा विचार केला.

भारतातील कोलकाता गावापासून बाटा कंपनीने सुरुवात केली. बाटाच्या फुटवेअरची मागणी वाढू लागल्याने प्रोडक्शन ही दुप्पट करावे लागले. पाहता पाहता कंपनी प्रत्येक आठवड्यात ४ हजार बूट बनवू लागली. भारतात ४ हजार कर्मचाऱ्यांसह कंपनीने टेनिस बूटांचे डिझाइन करण्यास सुरुवात केली. कंपनी असे करणारी पहिली कंपनी ठरली.

अशी ही एक वेळ आली जेव्हा कंपनीला पॅरागॉनसोबत टक्कर करावी लागला. तेव्हा बाटाने एक कॅम्पेन सुरु केले. ज्यामध्ये टिटनेस पासून बचाव करण्यासाठी बूट घालण्याचा सल्ला दिला. यामुळे कंपनीच्या सेल्समध्ये फार वाढ झाली. सध्या भाटा कंपनीत ८ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. जगभरात त्यांचा ९० देशांमध्ये व्यवसाय पसरला गेला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.