शाहण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे. न्याय पटकन मिळत नसल्यामुळे, कोर्टाच्या प्रक्रियेत माणूस घुसमटून जातो. त्यातल्या त्यात जर खटला घटस्फोट कींवा घरगुती हिंसाचाराशी निगडीत असेल, तर कायदा हा पुरुषांच्या विरोधातच आहे असं वाटू शकतं. अतुल सुभाष याची केस पाहिल्यावर ते आणखी स्पष्ट होतं. अतुल सुभाष एक IT इंजिनिअर वय ३४ वर्ष, ९ डिसेंबर रोजी त्याने बेंगळुरूमध्ये आत्महत्या केली. आत्महत्ये पूर्वी २४ पानांची Suicide Note आणि १.३० तासांचा एक व्हीडीओ सुद्धा शूट केला. त्यांची पत्नी निकीता आणि तिच्या घरचे या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं या व्हीडीओ आणि Sucide नोटमध्ये म्हंटलं आहे. अतुल सोबत असं काय झालं की त्याच्यासोमोर आत्महत्येशिवाय दूसरा पर्यायच उरला नाही? जाणून घेऊया. (Atul Subhash)
९ डिसेंबर २०२४ सकाळी सहा वाजता बेंगळुरू पोलिसांना सूचना मिळाली की अतुल सुभाष आत्महत्या करणार आहे. पोलिसांची एक टीम लगेचचं अतुलच्या घरी पोहचली, त्याने दरवाजा उघडला नाही म्हणून पोलिसांनी दरवाजा तोडला. पण तो पर्यंत उशीर झालेला. त्याने आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना तिथे जस्टिस इज ड्यू असं लिहिलेलं आढळलं. म्हणजे न्याय मिळणं बाकी आहे.हे पाऊल उचलण्यापूर्वी अतुलने दीड तासांची एक व्हिडीओ तयार करून आपली बाजू मांडली होती आणि त्यासोबतच २४ पानांची एक नोट आपल्या मित्रांना ईमेलद्वारे पाठवली. या नोटमध्ये अतुलने पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया आणि जौनपूर कुटुंब न्यायालयातील न्यायाधीश रीता कौशिक आणि वकील माधव यांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं. (Latest Updates)
अतुलने आपल्या नोटमध्ये आरोप केला की, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं घटस्फोट प्रकरण न्यायालयात न्यायाधीश रीता कौशिक यांच्या समोरं सुरू होतं. अतुलच्या पत्नीने पोटगीसाठी अतुल आणि त्याच्या कुटुंबावर एकामागोमाग १० गुन्हे दाखल केले. अतुल यांनी आरोप केला की त्यापैकी बहुतेक गुन्हे खोटे होते. अतुलने असंही म्हटलं की, या खटल्याच्या निकालासाठी न्यायाधीश रीता कौशिक यांनी ₹५ लाखांची लाच मागितली. लाच न दिल्यामुळे न्यायाधीश रीता कौशिक यांनी अतुलला पत्नी आणि मुलाच्या भरण पोषणाठी ८०,००० रुपये प्रति महिना देण्याचे आदेश दिले. २१ मार्च २०२४ रोजी न्यायाधीश रीता कौशिक यांच्या केबिनमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान, कौशिक म्हणाल्या, “तुम्ही केस सेटल का करत नाही?” त्यावर अतुल म्हणाला की, “ते लोक आधी १ कोटीची मागणी करत होते, पण आता तुमच्या आदेशानंतर ते ३ कोटींची मागणी करत आहेत.” त्यावर रिता म्हणाल्या, “ ३ कोटी असतील तुझ्याकडे म्हणून ते मागत असतील.” काही वेळानंतर न्यायाधीश रीता कौशिक समोर अतुलची पत्नी निकीता त्याला म्हणाली की, तू पण का नाही करत आत्महत्या? यावर न्यायाधीश रिता यांनी हसून निकीताला बाहेर जायला सांगितलं. (Atul Subhash)
पुढे न्यायाधीश रिता यांनी अतुलला ही केस सटेल करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी ५ लाख रुपये मागितले. वर न्यायाधीश रिता अतुलला असंही म्हणाल्या की हे खूप रिझनेबल रेट आहे, इतके पैसे तर तू कमवतो. पुढे १० एप्रिल २०२४ रोजी जौनपूर कुटुंब न्यायालयाच्या बाहेर अतुलची त्याच्या सासू सोबत चर्चा झाली. तेव्हा सासू निशा सिंघानिया हसत हसत अतुलला म्हणाल्या होत्या की, “तू अजून जीव नाही दिला? मला वाटलं आज बातमी येईल.” यावर अतुलने “मी मेलो तर तुमची पार्टी कशी चालेलं” असं उत्तर दिलं होतं. त्यावर “तू मेल्यानंतर तुझा बाप सुद्धा पैसे देईल. पतीच्या मृत्यूनंतर सर्व काही पत्नीचं होतं. तुझे आई बाप सुद्धा मरतील. मग प्रॉपर्टीचा हिस्सा सुनेच्या नावावर होईल. तुझं पूर्ण खानदान कोर्टाच्याच फेऱ्या मारेल.” अशी धमकी सासू निशा सिंघानिया यांनी दिलं. (Latest Updates)
अतुलने रेकॉर्डेड व्हीडीओमध्ये सांगितलं की, त्याचं निकीता सोबत २०१९ साली लग्न झालं. एका वर्षात त्यांना मुलगा झाला. त्याची पत्नी आणि त्याच्या पत्नीचं कुटुंब त्याच्याकडे नेहमी पैशांची मागणी करत होतं, जी तो पूर्ण करायचा. त्याने आपल्या पत्नीच्या कुटुंबाला लाखो रुपये दिले होते, त्याने जेव्हा पैसे देणं बंद केलं तेव्हा त्याची पत्नी मुलाला घेऊन माहेरी गेली. पुढच्या वर्षी पत्नीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गुन्हे दाखल केले. यामध्ये खून, अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि 10 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा आरोप केला. हुंडा मागीतल्या मुळे तीच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. असा आरोप पत्नी निकिताने अतुलवर केला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी पत्नीने सुरुवातीला एक कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र नंतर ती वाढवून तीन कोटी रुपये केली. (Atul Subhash)
========
हे देखील वाचा : कनपटीमार खुनी ज्याने एका हातोड्याने केली ७० जणांची हत्या !
========
या पैशांचा विचार आणि न्यायालयातील फेऱ्या आणि तिकडंचा भ्रष्टाचार या वैतागून अखेर अतुलने स्वत:ला संपवलं. त्या Suicide नोटमध्ये अतुलने शेवटची इच्छा लिहिली आहे. मुलाला आई वडिलांच्या हवाली केलं जावं. माझी पत्नी मुलाचं संगोपन करण्यास सक्षम नाहीये. आणि मला न्याय मिळाला तरच माझ्या अस्थी विसर्जित करण्यात याव्यात नाहीतर त्या गटारात फेकून द्याव्या अशी मागणी त्याने केली आहे. या घटनेमुळे सोशल मिडियावर रोष व्यक्त केला जातोय. भारतीय न्याय व्यवस्था ही फक्त महिलांच्याच बाजूने उभी आहे का? असे प्रश्न विचारले जातं आहेत. २०२२ च्या NCRB च्या अहवालानुसार, भारतात नोंदवलेल्या एकूण खोट्या गुन्ह्यांपैकी ७.२३% गुन्हे बलात्कार, बलात्कार प्रयत्न आणि महिलांवरील हल्ल्याशी संबंधित होते. या केसेसमध्ये महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण केंद्र, महिला दक्षता समिती आहे. पण पुरुषांसाठी अशी यंत्रणा नाही. त्यामुळे अशा केसेसमध्ये पुरुषांना भयंकर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अतुल सुभाषने उचलेलं पाऊल टोकाचं आहे, पण तो पर्याय नव्हता. (Atul Subhash)