Home » ॲन फ्रँक आणि तिची डायरी…

ॲन फ्रँक आणि तिची डायरी…

by Team Gajawaja
0 comment
Anne Frank
Share

ॲन फ्रँक (Anne Frank) म्हणजेच ॲनेलीज मेरी फ्रँक. जर्मनीच्या या पंधरा वर्षीय ॲनचा १२ जून रोजी वाढदिवस. ॲनला जाऊन आता ८८ वर्ष होऊन गेली आहेत. तरीही जर्मनीच काय पण देशात जिथे जिथे हुकूमशाहीला विरोध केला जातो, तिथे या ॲनचा वाढदिवस साजरा होतो. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वेदनामयी मृत्यूला सामोरी जाणा-या ॲनने तिची एक आठवण ठेवली आहे.  ती म्हणजे, डायरी. 

ॲनला डायरी लिहिण्याची सवय होती. याच डायरीतून ॲनने नाझींच्या क्रूरतेच्या ज्या आठवणी लिहिल्या आहेत, त्यातून अंगावर काटा येतो.  ॲन आणि तिच्या बहिणीला या वेदनामयी यातना सहन कराव्या लागल्या.  ही शरीरावरील आणि मनावरील वेदना सहन करतांना ॲन नाझी सैनिकांनी बनवलेल्या यातनागृहात राहत होती. (Anne Frank)

या यातनागृहात राहताना आपल्यावर आलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन तिने डायरीमध्ये लिहून ठेवले. ॲनचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण तिच्या या डायरीमुळे ती अमर झाली.  तिचे हे साहित्य प्रसिद्ध झाले. त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. ॲन या अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीनं जगासमोर नाझींचा क्रूर चेहरा उघड केला. आज तिच्या नावानं जर्मनीमध्ये अनेक क्लब आहेत. शाळा आहेत. या सर्वांत ॲनची आठवण म्हणून तिचा वाढदिवस साजरा केला जातो.    

१२ जून १९२९ रोजी ॲनचा जन्म जर्मनीमधील एका संपन्न ज्यू घरात झाला.  मार्च १९४५ रोजी ॲनचा मृत्यू यातनागृहात झाला. या दरम्यान तिनं लिहिलेल्या आठवणींची डायरी १९४७ मध्ये द डायरी ऑफ ए यंग गर्लया नावाने प्रथम प्रकाशित झाली.  आतापर्यंत हे पुस्तक ७०हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.  अद्यापही त्याच्या सुधारीत आवृत्या येत आहेत.  दुस-या महायुद्धात बळी पडलेल्या या ज्यू मुलीनं नाझींच्या दडपशालीला साहित्यातून विरोध केला. (Anne Frank) 

लोक तुमचे तोंड बंद ठेवण्यासाठी तुमच्याशी बोलू शकतात, पण ते तुम्हाला तुमचे मत व्यक्त करण्यापासून रोखू शकत नाही.या वाक्यापासूनच द डायरी ऑफ ए यंग गर्ल‘ ची सुरुवात होते.  यावरुनच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या या युवतीला नाझींच्या छळछावणीत किती असह्य वेदना दिल्या गेल्या, याची कल्पना येते.  

ॲनला तिच्या १३व्या वाढदिवसाला भेट म्हणून लाल आणि पांढऱ्या चौकोन असलेली एक डायरी तिच्या वडिलांकडून मिळाली.  तिचे वडील पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्यात लेफ्टनंट होते.  पिढीजात श्रीमंत असलेल्या या कुटुंबाचा मोठा व्यापार होता.  पण जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला आणि जर्मनीतील अनेक ज्यू कुटुंबाबरोबरच या कुटुंबाचेही दिवस फिरले.  नाझींच्या कटवटपणाची त्यांना कल्पना होती. (Anne Frank)

त्यामुळे कित्तेकवेळा त्यांनी नाझी अधिका-यांना पैशाची लालूच देऊन आपल्या कुटुंबाचे रक्षण केले.  पण नंतर नाझींचा ज्यू विरोध वाढल्यावर ॲनच्या कुटुंबाने फ्रँकफर्ट सोडले आणि नेदरलँडमध्ये पलायन केले.  त्यावेळी ॲनचा जन्म झाला होता.   दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली तेव्हा ॲन १० वर्षांची होती.  नेदरलॅंडमध्येही फ्रँक कुटुंबाने आपल्याच घरात लपून आयुष्य घालवलं.  ॲनचे अर्धे बालपण कुटुंबासोबत लपून-छपून गेले.  ॲनला १३ व्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी, ओटो फ्रँक यांनी डायरी दिली आणि तिच्या या लपाछपीच्या जिवनात एक आशेचा किरण आला.  ॲनचे वडिल हे पेपर काढत असत.(Anne Frank) 

त्यातून ते नाझींच्या क्रूरतेच्या कहाण्या लिहित असत.  अर्थातच हे सर्व अत्यंत गुप्तपणे होत असे.  त्यामुळे ॲनलाही पत्रकार होण्याची इच्छा होती.  डायरी हाती आल्यावर ती आपल्या जीवनातील सर्वच घटना लिहू लागली.  १९४४ मध्ये नाझींनी ॲनीच्या कुटुंबाला आपल्या ताब्यात घेतले.  तेव्हा घरातील पुरुष आणि महिला यांची विभागणी झाली.  ॲन आणि तिची मोठी बहिण मार्गो यांना वेगळ्या डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. बर्गन-बेल्सन येथील या सेंटरवर या फ्रॅंक बहिणींवर अमानुष अत्याचार करण्यात आले. डिटेन्शन सेंटरमध्ये अशा अनेक महिला होत्या. 

बंदिस्त असलेल्या या महिलांच्या स्वच्छचेसाठी योग्य सुविधाही उपलब्ध नव्हत्या.  त्यांना अतिशय लहान जागेत ठेवण्यात आले होते.  तसेच तिथे हवा आणि सूर्यप्रकाशाचीही व्यवस्था नव्हती.  परिणामी या डिटेन्शन सेंटरमध्ये भयंकर रोग पसरले होतेॲन आणि तिच्या बहिणीलाही याच रोगांचा सामना करावा लागला. ॲनची मोठी बहिण मार्गो हिला त्वचारोग झाला. त्यामुळे तिची रवानगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.  येथेही प्रचंड अस्वच्छता आणि भूकमरीची अवस्था होती.  ॲन त्याही अवस्थेत आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या वाट्याला आलेले अन्न देत असे.  पण दुर्दैवानं तिच्या बहिणीचा मृत्यू झाला. 

पुढे हाच त्वचा रोग आणि भूक मारीमुळे ॲनचाही मृत्यू झाला. तेव्हा ती १५ वर्षाची होती.  तिच्या मृत्यूनंतर काही दिवसातच या डिटेन्शन सेंटरवर अमेरिकेच्या सैन्यानं हल्ला केला आणि कैद म्हणून ठेवलेल्या महिलांची सुटका केली.  यातील एका महिलेकडे ॲनची डायरी होती.  ही डायरी मग ॲनीच्या वडिलांपर्यंत पोहचवण्यात आली.  त्यात ॲननं लिहिलेल्या छळाच्या कथा वाचून ओटो फ्रँक यांनी हंबरडा फोडला. 

==========

हे देखील वाचा : चालत्या ट्रेनमध्ये तिकीट हरवल्यास अथवा फाटल्यास काय करावे?

==========

पण आपल्या मुलीनं नाझींचा क्रूर चेहरा फाडला असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी ही डायरी द डायरी ऑफ ए यंग गर्ल‘ या नावानं प्रसिद्ध केली.  यावर पुढे अनेक चित्रपट तयार झाले,  नाटके आली.  टिव्हीवरील मालिकाही आल्या.  आजही जर्मनीमध्ये ॲन फ्रँक या नावाने शाळा उभ्या रहात आहेत.  ॲनच्या वाढदिवसाला अनेक कार्यक्रम होतात.  यामध्ये हुकूमशाहीला आपण कायमच विरोध करणार अशी शपथ ॲनचे चाहते घेतात.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.