Home » पंखांशिवाय 150 किमी उडू शकतो हा पक्षी

पंखांशिवाय 150 किमी उडू शकतो हा पक्षी

by Team Gajawaja
0 comment
andean condor
Share

पक्ष्यांच्या विविध प्रजाती असतात. त्यापैकी काही प्रजातींचे आपण पालन करतो. मात्र असे काही पक्षी असतात जे उडू शकत नाहीत. याशिवाय काही पक्षी उंच उडतात. अशातच आम्ही तुम्हाला आज एका पक्ष्याबद्दल सांगणार आहोत जो एकदा उड्डाण केल्यानंतर पंख न फडफडवता १५० किमी पर्यंत सातत्याने उडू शकतो.(Andean condor)

एंडियन कोंडोर असे त्या पक्षाचे नाव आहे. त्या पक्षाचे पंख १० फूट लांब असतात. त्याचे वजन जवळजवळ १५ किलो असते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तो सध्या जगातील सर्वाधिक उंच उडणारा पक्षी आहे. वैज्ञानिकांनी ८ कोंडोर पक्षांवर एक रेकॉर्डिंग उपकरण बांधले आणि त्यांचा उडण्याचे क्षण त्यात रेकॉर्ड केले. या अभ्यासादरम्या या पक्षांनी २५० तास सातत्याने उड्डाण केल्याचे दिसून आले.

वैज्ञानिकांनी हे सुद्धा कळले की, या पक्षांनी एकदा उड्डाण केल्यानंतर ते फार कमी वेळा आपल्या पंखांची फडफड करतात. केवळ उड्डाणावेळीच पंख फडफड करता. पण उड्डाणानंतर जवजवळ पाच तास हे उडू शकतात. हैराण करणारी गोष्ट अशी की, या दरम्यान ते पंखांची फडफड करत नाहीत. एकाच वेळेस १६० किमी पर्यंतचा प्रवास करतात.

एंडियन कोंडोर पक्षी सर्वसामान्यपणे एंडीज पर्वत रागांजवळ आपले घर बनवतात. एंडीजच्या पर्वतरांगा जगातील सर्वाधिक लांब पर्वतरांगांपैकी एक असून त्या काही देशात पसरल्या गेल्या आहेत. हा पक्षी आपले घरटे फार उंचावर तयार करतो. काहीवेळेत तो आपल्या वजनापेक्षा सुद्धा अधिक खातो. असे केल्याने तो आराम ही करतो. (Andean condor)

हेही वाचा- वैज्ञानिकांना पृथ्वीवर कोठे आढळला ९०० फूट खोल रहस्यमयी ब्लू होल?

एंडियन कोंडोर पक्षामध्ये नर आणि मादा मधील एकच फरक असतो. नरच्या मानेवर सफेद रंगाची कॉलर असते. तर मादाच्या मानेवर काहीच नसते. एंडीयन कोंडोर सर्वसामान्यपणे अर्जेंटिना आणि पेरुत आढळतात. यांची वेगाने घटती संख्या पाहता त्यांना विलुप्त होणाऱ्या प्रताजींमध्ये आता गणले जात आहे. या पक्षाचा प्रजनन दर कमी असतो. ५-६ वर्षानंतर ते प्रजनानासाठी तयार होतात. खरंतर काही एंडीज पौराणिक कथांबद्दल असे सांगितले जाते की. जेव्हा कोंडोर वृद्ध होतात तेव्हा त्यांना आयुष्य जगावेसे वाटत नाही. अशा स्थितीत ते पर्वतरांगांच्या सर्वाधिक उंच ठिकाणी जाऊन स्वत: वर मृत्यू ओढावून घेतात. कोंडोर हा गिधाडाच्या प्रजातीमधीलच आहे. पण त्यांच्या स्वत: च्या अशा दोनच प्रजाती आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.