Home » या आंब्यांमध्ये ‘दशहरी आंबा’ हा खास खवय्यांच्या आवडीचा

या आंब्यांमध्ये ‘दशहरी आंबा’ हा खास खवय्यांच्या आवडीचा

by Team Gajawaja
0 comment
Dussehri Mango
Share

उन्हाच्या झळा जशा वाढू लागताच आंब्याची सिझन सुरु होतो.  या आंब्यांमध्ये दशहरी आंबा हा खास खवय्यांच्या आवडीचा आहे.  उत्तरप्रदेशमधील दशहरी या गावापासून या आंब्याचा प्रचार झाल्याचे सांगण्यात येते.  गंमत म्हणजे या दशहरी आंब्याचे (Dussehri Mango) मुळ झाड अद्यापही असून त्याच्यावर भरपूर दशहरी आंबेही लागतात. या झाडाला ‘मदर ऑफ मँगो ट्री’ म्हटले जाते. या आंब्याच्या झाडाला बघायला अनेक पर्यटक मुद्दामून या गावात येतात. 200 वर्षे जुने असलेल्या या झाडाला नबाब मोहम्मद अन्सार अली यांनी लावले होते. उत्तरप्रदेशच्या लखनौजवळील दशहरी गावात लावले गेलेल्या या आंब्यानं खवय्यांना भुरळ घातली. त्यामुळे त्याचे नावच दशहरी गावावरुन ठेवण्यात आले.  आज भारतात सर्वाधिक उत्पादन या दशहरी आंब्याचे करण्यात येते.   

चवीला गोड आणि सुगंधी असलेला दशहरी आंबा (Dussehri Mango) आता भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे.  या आंब्याची परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.  200 वर्षापूर्वी मोहम्मद अन्सारी यांनी लावलेल्या या झाडाची आता अनेक कलमे करण्यात आली आहेत.  दशहरी गाव हे लखनौच्या काकोरी या भागापासून जवळपास आहे. येथे आता दशहरी आंब्यांच्या (Dussehri Mango) मोठ्या बागा असल्या तरी त्याच्या मुळ झाडाला बघण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात.  आता या एका आंब्याच्या झाडापासून हजारो दशहरी आंब्याची झाडे या भागात झाली आहेत.  अर्थात सर्वच झाडांच्या आंब्यांची चव ही अविट गोडीची आहेत.  दशहरी गावातला हा 200 वर्षापूर्वी लावलेला दशहरी आंबा जगातला पहिला दशहरी आंबा (Dussehri Mango) असल्याचे सांगण्यात येते.  नबाब मोहम्मद अन्सार अली यांचे वंशज आता या झाडाची काळजी घेतात.  दशहरी आंब्याच्या एका झाडापासून साधारणपणे अनेक टन फळे निघतात.  आश्चर्य म्हणजे या सर्व झाडांचे मुळ असलेल्या पहिल्या झाडांपासूनही तेवढेच आंबे आज निघतात.  आंब्याचा हंगाम येताच या मुळ झाडावर भरभरुन मोहोर येतो आणि आंब्यांचे घड दिसू लागतात.  मात्र या झाडाचे एकही फळ विकले जात नाही.  नवाब मोहम्मद अन्सार अली यांच्या वंशंजांकडे या झाडाची मालकी आहे.  हे कुटुंबिय या झाडाचे एकही फळ आदरानं विक्रीला काढत नाही.  तर या झाडाची सर्व फळे त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात वाटण्यात येतात.  दशहरी गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपूर्वी या मुळ दशहरी आंब्याच्या झाडाची फांदी गावकऱ्यांपासून लपून मलिहाबादला नेली.  तेथे ही फांदी रुजवण्यात आली.  तेव्हापासून दशहरी आंबा मलिहाबादी आंबा म्हणूनही ओळखला जाऊ लागला.  आता याच एका झाडापासून या परिसरात हजारो दशहरी आंब्याची (Dussehri Mango) झाडे झाली आहेत.  हे मुळ झाड काही वर्षापूर्वी पूर्णपणे सुकले होते.  पण अंब्यांचा सिझन चालू होताच या झाडाला पुन्हा पालवी फुटली आणि आंबे धरु लागले.  स्थानिक या घटनेचे चमत्कार असेच वर्णन करतात.   

======

हे देखील वाचा : लंगड्या आंब्याचा इतिहास…

======

या दशहरी आंब्याबाबत (Dussehri Mango) अजून एक किस्सा सांगितला जातो.  मिर्झा गालिब कोलकाता ते दिल्ली असा प्रवास करत असत तेव्हा ते आवर्जून या दशहरी आंब्याची चव घेण्यासाठी थांबत असत.  आजही अनेक सेलिब्रिटी दशहरी गावात येऊनच हा आंबा खरेदी करतात.   तसेच दशहरी आंब्याचे मुळ झाड बघण्यासाठी  चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते गावात येतात. आता या झाडाच्या खाली नवा सेल्फी पॉईंटच झाला आहे.  दशहरी गावात काही खवय्ये वर्षपरंपरेनुसार ठराविक बागायतदारांकडून दशहरी आंबे खरेदी करतात.  या आंब्यांची परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  तसेच परदेशात पाठवण्यासाठीही स्थानिक प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.  एकूण भारतात हजाराच्या वर आंब्याच्या जाती असल्या तरी त्या प्रत्येक जातीची वेगळी चव आहे आणि त्यावरुनच त्याची ओळख आहे.  उत्तरप्रदेशमधील दशहरी आंबाही तसाच खास आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.