हिंदूंचे मुख्य तीर्थक्षेत्र मानले जाणारे अमरनाथ मंदिर, हे जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून १४५ किमी अंतरावर आहे. अमरनाथ गुहा काश्मीरच्या बर्फाळ पर्वतांच्या मधोमध आहे, जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भोलेनाथच्या मंदिरात बर्फाच्या शिवलिंगाच्या रूपात बाबा बर्फानीचे दर्शन घ्यायला येतात. असे म्हणतात की, भगवान भोलेनाथाचे हे बर्फाचे शिवलिंग स्वतःच तयार झाले आहे आणि त्याचा आकार वाढतच जात आहे. अमरनाथ मंदिराशी लोकांची श्रद्धा आणि अनेक मान्यता जोडलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया अमरनाथ यात्रेच्या महत्त्वामागे कोणती पौराणिक कथा सांगितली जाते… (amarnath temple history)
काय आहे अमरत्वाच्या रहस्याशी संबंधित पौराणिक कथा?
पौराणिक कथेनुसार, एकदा माता पार्वतीने भोलेनाथकडून अमरत्वाचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा प्रथम भोलेनाथने त्यांना हे रहस्य सांगण्यास नकार दिला होता. पण माता पार्वतीने वारंवार विनंती केल्यावर, त्यांची उत्सुकता पाहून शिव राजी झाले. पण हे रहस्य इतर कोणाला ऐकू जाऊ नये, म्हणून ते दोघेही हिमालय पर्वताच्या दिशेने कुठल्यातरी निर्जन ठिकाणी निघाले. (amarnath temple history)
त्याच वेळी, शिवजीने हे रहस्य पूर्णपणे गोपनीय ठेवण्यासाठी त्यांचा नंदी बैल, त्यांच्या केसांमधील चंद्र, गळ्यातील साप आणि गणेशला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी आणि जल या पंचभूत घटकांना सोडून, भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या गुहेच्या आत गेले. (amarnath temple history)
त्या गुहेच्या आत शिवशंभूंनी आपल्या भोवती अग्नी प्रज्वलित केला आणि ते स्वतः ध्यानात लीन झाले. त्यानंतर ते माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगू लागले. पण पेटलेल्या त्या आगीमुळे महादेवाच्या आसनाखाली असलेल्या कबुतराची अंडी भस्म होऊ शकली नाही आणि अंड्यातून बाहेर आल्यावर कबुतराच्या एका जोडीने अमरत्वाची संपूर्ण कहाणी ऐकली. (amarnath temple history)
हे देखील वाचा: १२ जुलै १९६१! नक्की काय घडलं होतं त्या दिवशी?
असे म्हणतात की, अमरनाथमध्ये आजही यात्रेकरूंना गुहेत कबुतरांची जोडी दिसते, ज्याला अमर पक्षी म्हणून ओळखले जाते. तसेच, या गुहेच्या आत महादेवाने अमरत्वाच्या रहस्याची कथा सांगितली असल्याने, या गुहेला ‘अमरनाथ गुहा’ असे संबोधले जाऊ लागले. (amarnath temple history)