इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी असेसमेंट इअर २०२२-२३ साठी टॅक्सपेअर्स ई-फाइलिंग पोर्टलवर टॅक्स रिटर्न दाखल करता येते. सरकारने यंदाच्या वर्षी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै ठरविली आहे. आता इनकम टॅक्स डिपार्टमेंटने आयटीआर फाइलिंग करण्यासाठी काही नियमांत बदल करण्यात आले आहे. या बदलांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे अन्यथा आयटीआर दाखल केल्यानंतर सुद्धा तुम्हाला डिपार्टमेंटकडून नोटीस पाठवली जाईल.(AIS how to download)
खरंतर टॅक्सपेअर्सची सुविधा लक्षात घेता नुकतेच इनकम टॅक्स डिपार्टमेंटने नवे टूल अॅन्युअल इंफोर्मेशन स्टेटमेंट किंवा एआयआस लॉन्च केले आहे. अॅन्युअल इंफोर्मेशन स्टेटमेंट १ नोव्हेंबर २०२१ रोजी लॉन्च करण्यात आले होते. आयटी डिपार्टमेंटने याची सुरुवात आयटीआर फाइलिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गोष्टी सोप्प्या करण्यासाठी आहे. हे स्टेटमेंट २६एस ची तुलनेत अधिक माहिती देते. फक्त हायवॅल्यूचे ट्रांजेक्शन आणि टीडीएसचा उल्लेख फॉर्म २६एस मध्ये केला जाते तर एआयएस मध्ये सेविंग बॅंक इंटरेस्ट, डिविडेंट, कॅपिटल गेन आणि शेअर ट्रांजेक्शन अशा सर्व ऑप्शनचा समावेश असतो.
हे देखील वाचा- ‘या’ उत्पादनावर लागत नाही इनकम टॅक्स, आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

एआयएसच्या मदतीने इनकम टॅक्स रिटर्न फाइल करताना टॅक्सपेअर्ससाठी अधिक सोप्पे होईल. टॅक्सपेअर्सने आता आपले आयटीआर फाइल करण्यापूर्वी एआयएसच्या माध्यमातून सत्यापित करु शकतात. भविष्यात इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीसचा आली तरीही बचाव करु शकता येतो.(AIS how to download)
कसे कराल AIS डाउनलोड
-सर्वात प्रथम तुम्हाला पॅन किंवा आधार किंवा पासवर्डच्या माध्यमातून आयटीआर फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
-सर्वात वरती सर्विस सेक्शनमध्ये गेल्यानंतर एआयएसवर क्लिक करा.
-आता प्रोसिडवक क्लिक करावे लागेल.
-आता तुम्हाला डाउनलोडवर टॅप करावे लागणार आहे. येथे तुम्ही पीडीएफ किंवा JSON चा ऑप्शन निवडू शकता.
आयटीआर भरल्याने तुम्हाला बँक किंवा अन्य कर्ज देणारी संस्था आयटीआर रिसिप्टला सर्वाधिक विश्वासनीय उत्पादन प्रमाणपत्र मानते. जर आयटीआर दाखल करत आहात आणि भविष्यात जेव्हा तुम्ही कार, कर्ज किंवा होम लोनसह कोणत्या प्रकारचे कर्ज घेता तेव्हा यामध्ये आयटीआर खुप कामी येईल. त्याचसोबत वीजा मिळणे, टीडीएस रिफंडसाठी गरजेचे असते.