Home » Saiyaara : ‘सैयारा’ सिनेमाची गाडी सुसाट, विकेंडला सिनेमाची रेकॉर्डतोड कमाई

Saiyaara : ‘सैयारा’ सिनेमाची गाडी सुसाट, विकेंडला सिनेमाची रेकॉर्डतोड कमाई

by Jyotsna Kulkarni
0 comment
Saiyaara
Share

‘सैयारा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपटाच्या प्रदर्शानाआधीच सिनेमाची चांगलीच हवा निर्माण करण्यात आली होती. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मात्र ‘सैयारा’ने सर्वच रेकॉर्ड मोडले आहे. कमाईच्या बाबतीत सिनेमाची गाडी सुसाट धावत आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा या दोन नवीन कलाकाराच्या सिनेमाने अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘स्टार किड’चा डेब्यू आणि कोणत्याही मोठ्या प्रमोशन्सशिवाय हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिनेमाच्या कमाईने सगळ्यांनाच सुखद धक्का दिला आहे. (Marathi News)

२०२५ हे वर्ष बॉलिवूडची फारसे चांगले ठरत नसल्याचे चित्र आहे. मोजके काही चित्रपट सोडले तर जवळपास सर्वच सिनेमे सुपरफ्लॉप झाले. मागील अनेक दिवसांत अनेक बॉलिवूडच्या सुपरस्टार्सचे सिनेमे आले आणि गेले. मोठमोठ्या सुपरस्टारच्या चित्रपटांना तर आपले बजेटसुद्धा वसूल करता आले नाही. पण, याला अपवाद ठरला नुकत्याच रिलीज झालेला आणि नवीन कलाकार असलेला ‘सैयारा’ हा सिनेमा. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नुसता धमाका केला आहे. सुरुवातीला कोणीही नोटीस न केलेल्या या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आणि सिनेमाला माऊथ पब्लिसिटी मिळायला सुरुवात झाली. याचा फायदा थेट चित्रपटाच्या कलेक्शनवर पडताना दिसत आहे. (Todays Marathi Headline)

Saiyaara

‘सैयारा’ सिनेमाने या आठवड्याच्या शेवटी बक्कळ कमाई केली आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा म्युझिकल रोमँटिक ड्रामा असलेल्या ‘सैयारा’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच ८० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘सैयारा’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जवळपास २१ कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘सैयारा’ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी बॉक्स ऑफिसवर ३७ कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. या तीन दिवसांचा विचार करता चित्रपटाने भारतात तीन दिवसातच एकूण ८३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Bollywood News)

मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ सिनेमाचे यश पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. सिनेमाच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिनेमाच्या कथेसोबतच अहान पांडे आणि अनीतच्या प्रभावी अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. हा सिनेमा टिपिकल मोहित सूरी स्टाइल सिनेमा आहे. सिनेमाची गाण्यांनी देखील चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सिनेमातील फाइट सीन, रोमान्स, इमोशन्स सर्वच गोष्टी प्रभावी असल्याने सिनेमागृहातून निघाल्यानंतरही यांचा प्रभाव प्रेक्षकांवर राहताना दिसत आहे. (Celebrity News)

============

हे देखील वाचा : Saudi :२० वर्ष कोमात राहिल्यानंतर सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे निधन

============

जाणकारांनी सैयारा सिनेमा एवढा मोठा हिट होण्यामागे काही कारणं असल्याचे सांगितले आहे. मुख्य म्हणजे यश राजचा सिनेमा असलेल्या ‘सैयारा’ या सिनेमाची कास्ट आपल्याला कुठेच दिसली नाही. मुद्दामच या सिनेमातील कलाकारांना यश राजने कुठेही पब्लिक अपिरियन्स न करण्यास सांगितले होते. त्यामुळे लोकांमध्ये देखील या दोन्ही नवीन कलाकारांबद्दल उत्सुकता होती. शिवाय बऱ्याच काळाने मोठा आणि इंट्स प्रेमकहाणी असलेला सिनेमा आल्याने देखील प्रेक्षकांनी ‘सैयारा’ला उचलून घेतले आहे. अनन्या पांडेचा चुलत भाऊ असलेल्या अहान पांडे या सिनेमातून पदार्पण करत आहे. बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेल्या अनन्या पांडेला देखील एवढे मोठे यश अजून मिळवता आले नाही. अहानने तर त्याच्या पहिल्याच सिनेमात सिक्सर मारला आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.