पृथ्वीवर सध्या सात खंड आहेत. आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि ज्या खंडात आपला भारत देश येतो, तो म्हणजे आशिया. पण हे सात खंड पूर्वी पासून पृथ्वीवर अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला पृथ्वीवर एक विस्तृत भूभाग होता, ज्याला आपण सपूरखंड म्हणू शकतो. तो म्हणजे पँजिया. मग या पँजियाचेच तुकडे होऊन पुढे सात खंड तयार झाले, आणि त्यामुळेच माऊंट एवरेस्ट आणि हिमालय पर्वत रांगासारखे उंच पर्वत तयार झाले. आता ही माहिती सांगण्याचं कारण म्हणजे, भविष्यात होणाऱ्या काही भौगोलिक घटनांमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हिमालय पर्वत रांगासारख्या पर्वत रांगा तयार होणार आहेत. म्हणजे येणाऱ्या काळात मुंबई सारखं शहर सुद्धा पर्वत रांगामध्ये वसलेलं असले. या पर्वत रांगा तयार कशा होतील? जाणून घेऊया. (Africa)
आज पासून जवळ जवळ ३३५ दशलक्ष वर्षांपूर्वी जगातले सातही खंड एकाच जमिनीचा भाग होते, ज्याला चारही दिशांना महासागर होता. मग नंतर पँजिया या सुपरखंडाचे तुकडे होऊन त्या जमिनीच्या प्लेटस म्हणजे आजचे सात खंड वेगवेगळ्या दिशेत सरकू लागले. या सरकण्याला कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट म्हणतात. पँजियातून आधीच तुटून वेगळ्या झालेल्या युरेशियन प्लेटला इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट म्हणजेच सध्याचे ऑस्ट्रेलिया आणि भारत देश एकत्र असलेला त्याकाळचा एक खंड येऊन धडकला, ज्यामुळे हिमालय पर्वत रांग निर्माण झाली. आता हे जे कॉन्टिनेन्टल Drift आहे, ते पुन्हा आफ्रिकेत होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी आफ्रिकेच्या मध्यभागी दरी निर्माण झाली होती. त्याचा आकार सातत्याने वाढत आहे. मार्च 2023 च्या सुरुवातीला जेव्हाही दरी आढळली तेव्हा तिची लांबी 56 किलोमीटर होती. आता हा दुरावा पूर्वीपेक्षा लांबला असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आफ्रिकेचे दोन भागात विभाजन होण्याची चिंता भूगर्भशास्त्रज्ञांना सतावत आहे. (International News)
जिओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनचे म्हणणे आहे की, आफ्रिकेच्या मध्यभागी निर्माण होणाऱ्या या दरीत एक नवा महासागर तयार होऊ शकतो. आता प्रश्न असा पडतो की, आफ्रिका खरोखरच दोन भागांत विभागला जाईल का? नासाच्या अर्थ ऑब्जर्वेटरीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व आफ्रिकेतील सोमालीया देश आणि नुबिया देश पूर्वेकडे खेचले जात आहेत. म्हणून ही दरी निर्माण झाली आहे. ओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनने केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, या सर्व प्लेट्स इथिओपियामध्ये वाय आकाराचा क्रॅक तयार करत आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठातील पृथ्वी विज्ञानाचे तज्ञ आणि प्राध्यापक केन मॅकडोनाल्ड यांच्या मते, क्रॅक तयार होण्याचं प्रमाण मंद आहे, परंतु हा धोका खूप मोठा आहे. (Africa)
======
हे देखील वाचा : आश्चर्य सहारा वाळवंटात आला पूर !
======
जर सोमालिया देशाचा भूभाग म्हणजे सोमाली टेक्टोनिक प्लेट आणि नुबिया देशाची न्युबियन टेक्टोनिक प्लेट आफ्रिके पासून वेगळ्या झाल्या, तर पृथ्वीवर एक नवा महासागर तयार होईल. अनेक देश पाण्याखाली जातील. अमेरिकन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, पूर्व आफ्रिका म्हणजेच सोमालिया, केनिया, टांझानिया आणि मादागास्कर हा भूभाग भारताच्या पश्चिम किनारपट्टीला येऊन धडकेलं, आणि जशी हिमालय पर्वत रांगाची निर्मिती झाली होती, तशीच या धडकेमुळे एक मोठी पर्वत रांग तयार होईल. ज्याला अमेरिकन जर्नल ऑफ सायन्सच्या टीमने सोमालया असं नाव दिलं आहे. हे टेक्टोनिक प्लेटस भारताला येऊन धडकण्यासाठी बरीच वर्ष लागतील, तेव्हा आपण अस्तित्वात असू नसू माहित नाही. पण या स्टडीमुळे बऱ्याच वर्षांनंतर होणाऱ्या घटनेची माहिती आपल्याला मिळाली आहे, आणि या माहितीनुसार ही धडक जेव्हा केव्हा होईल तेव्हा भारताच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्याच्या किनार पट्टीवर पर्वत रांगा तयार होतील ही शक्यता नाकारता येणार नाही. (International News)