उन्हाळ्याच्या दिवस एसीचा वापर करणे भले आरामदायी वाटते. काही लोक कार मधून ऑफिस आणि ऑफिसमधून घर अशावेळी प्रत्येकवेळी एसीचा वापर करतात. पण हिच समस्या तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कारण जेव्हा एसीचा वापर केला जात नाही तेव्हा त्या लोकांना खुप अनकंम्फर्टेबल वाटू लागते. एसीचा अत्याधिक वापर केल्याने आरोग्याला नुकसानच होते हे लक्षात ठेवा. (Ac effect on health)
वेबएमडीच्या एका रिपोर्टनुसार खराब वेंटिलेशनसोबत एसीचा अत्याधिक वापर केल्याने डोकेदुखी, खोकला, मळमळ वाटणे, कोरड्या त्वचेसह आरोग्यासंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एसीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. एसीचा अधिक वापर तुम्हाला आजारी पाडू शकतो. खसाकरुन जी लोक खुप वेळ एसीत राहतात. त्यांनी यामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल जरुर जाणून घेतले पाहिजे.
एसीचा अधिक वापर केल्याने होणारे नुकसान
-एसी हा ओलावा कमी करणे आणि खोली थंड ठेवण्याचे काम करतो. पण यामुळे तुमची स्किन खेचल्यासारखी होऊ शकतो. तुम्ही डिहाइड्रेशनचे शिकार होऊ शकता.
-काही अभ्यासात असे ही समोर आले आहे की, जी लोक वातानुकूलित ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये नैसर्गिक वेंटिलेशन असणाऱ्या इमारतीत काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत श्वसनासंबंधित समस्या जसे की, नाक आणि श्वास घेण्यासंबंधित समस्या निर्माण होतात.
-तज्ञांच्या मते, उन्हाळ्या एसीचा अत्याधिक वापर केल्याने डोकेदुखी किंवा माइग्रेनचा धोका वाढतो. ज्या लोकांना माइग्रेनची समस्या आहे त्यांनी एसीचा अधिक वापर करु नये, अन्यथा माइग्रेन ट्रिगर होऊ शकतो.
-वैज्ञानिकांच्या मते एसीत अधिक वेळ घालवल्याने लोकांना उष्ण तापमानाचा सामना करणे कठीण होते. जर तुम्ही दीर्घकाळ एसीत राहत असाल तर शरिरात हीट टॉलरेंस कमी होते. त्यामुळे अन्य उष्ण ठिकाणी गेल्यानंतर खुप गरम होऊ लागते. (Ac effect on health)
-वातानुकूलित ठिकाणी ओलाव्याची कमतरता असते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांत ड्राइनेसटी समस्या निर्माण होऊ शकते. या व्यक्तिरिक्त डोळ्यांना खाज येणे, इरिटेशन होऊ शकते. ऐवढेच नव्हे तर दीर्घकाळ एसीत राहिल्याने तुम्हाला दिसणे सुद्धा काहीसे अंधुक होऊ शकते.
-या व्यतिरिक्त खुप कमी तापमानावर एसी सेट केला जातो आणि त्यात अधिक वेळ आपण बसतो तेव्हा काही समस्या उद्भवतात.
-एसीचा फिल्टर स्वच्छ नसेल किंवा त्याची वेळोवेळी सर्विंग केली नाही तर त्यात जमा झालेली डस्ट आणि घाण यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ शकता. त्याची हवा जर फुफ्फुसात गेल्यास तर नुकसान होऊ शकते.
हेही वाचा- आर्टिफिशियल स्विटनरचा वापर करत असाल तर व्हा सावध
-एसीमधून बॅक्टेरियायुक्त हवा बाहेर पडल्यास घश्यात खवखव होणे, सर्दी-खोकला, ताप अशी लक्षण दिसून येऊ शतता. त्याचसोबत खाज आणि जळजळ अशी समस्या सुद्धा उद्भवू शकते. तर अस्थमा असलेल्या रुग्णांची प्रकृती यामुळे अधिक बिघडू शकते.