जगातला सर्वात श्रीमंत माणूस जेफ बेजोस असू द्या, किंवा सर्वात श्रीमंत हॉलीवूड सुपरस्टार ड्वेन जॉनसन म्हणजेच दी रॉक असू द्या, नाहीतर आपल्या महाराष्ट्रातले अर्धे अविवाहीत तरुण असू द्या. या सर्वांनाच आयुष्यात एकदा तरी सतावणारा किंवा सतावलेला ग्लोबल विषय म्हणजे केस. काही काही लोकं केसं म्हणतात ते चालायचच, शुद्ध अशुद्ध व्याकरणात न घुसता, शुद्ध आणि अशुद्ध अशा केसांना लावणाऱ्या तेलाच्या वादात घुसूया. सध्या सर्वत्र चर्चा आहे आदिवासी हेअर ऑइलची. यूट्यूब आणि बॉलीवुडच्या फराह खान, सोनू सूद, अशा अनेक सेलेब्रिटींनी प्रत्यक्ष जंगलात जाऊन स्वत: तेल बनवून तेलाच्या बॉटलस घरी नेल्या आहेत. त्यांनी तुम्हाला सुद्धा हे तेल वापरण्याच Recommendation दिलं असेलच . तर काय आहे हे आदिवासी हेअर ऑइल? आणि ते वापरल्याने खरच हेयर फॉल थांबतो का? किंवा गेलेले केस पुन्हा येतात का ? किंवा पांढरे केस काळे होतात का? जाणून घेऊया.
या तेलाचे निर्माते आहेत हक्की-पिक्की समाजातले लोकं. हक्की-पिक्की हा एक आदिवासी समाज आहे. या समाजातली एक Intresting गोष्ट म्हणजे कुटुंबातील मोठा सदस्य आपले केस कापत नाही, ज्यामुळे तो कुटुंबप्रमुख आहे हे सर्वांना समजतं. आणखी एक गोष्ट म्हणजे या समाजात मुलाकडेचे मुलीकडच्यांकडून हुंडा न घेता, मुलीकडेचे मुलाकडच्यांकडून हुंडा घेतात, अशी जुनी प्रथा होती. आता ती प्रथा कायम आहे की नाही, माहिती नाही. असा Unique परंपरा असलेला समाज भारताच्या दक्षिण आणि पश्चिमेकडे राहतो, खास करून जिथे जास्त जंगल आहे तिथे. कारण यांच उदरनिर्वाह करण्याच साधन म्हणजेच जंगल आहे. (Aadivasi Hair Oil)
पक्ष्यांची शिकार करणं हे या समाजाच पारंपरिक काम आहे. पण काळानुसार वन्यजीव सुरक्षा कायदे अधिक कडक झाल्यामुळे यांची शिकार बंद झाली. त्यामुळे त्यांनी जंगालातच उगणाऱ्या वनौषधी वनस्पती, मसाले, नैसर्गिक तेल आणि प्लॅस्टिकच्या वस्तु विकण्यास सुरवात केली. हाच व्यवसाय करत या जमातीतले लोक जगभरात विखुरले गेले आहेत. सुदानमध्ये झालेल्या गृहयुध्दात या समाजाचे १८१ लोक अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी भारत सरकारने मिशन कावेरी लॉंच केलं होतं आणि त्यांना वाचवण्यात आलं होतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या समजाची यांच्या व्यवसायबद्दल त्यांची प्रशंसा केली होती. (Aadivasi Hair Oil)
याच प्रशंसेचे दाखले देतं आदिवासी तेल विकण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आदिवासी तेल विकण्यासाठी त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण खूप वेगळी आहे. यूट्यूबर्सना बोलावून त्यांच्या सोबत तेल बनवतानाचे व्हिडिओ बनवले जातात. त्या तेलात कधी १०८ आयुर्वेदिक वनस्पती टाकतात, तर कधी १८०. पण तुम्ही या यूट्यूबर्सचे हे तेल प्रमोट करतानाचे व्हिडिओ बघाल तर समजेलं की जेमतेम तीस ते चाळीसच मसाले आणि वनस्पती तेलात टाकल्या जातात आणि एक ‘सीक्रेट इंग्रेडिएंट’ असतो ज्यात काय आहे हे ते कुणालाच सांगत नाहीत. आता एवढं सगळं ऐकून तुम्हाला वाटलं असेल की हे तेलं मागवून बघावं, तर मागवणार कोणाकडून हा प्रश्न येतो. कारण ‘आम्हीच ओरिजिनल’ ‘आम्हीच ओरिजिनल’ असं प्रत्येक आदिवासी तेलं विकणारा म्हणतोय आणि प्रत्येक जण तेलाचा प्रभाव जाणवला नाही तर मनी बॅक Guarantee सुद्धा देतोय. आदिवासी तेल विकणाऱ्यांचं झालयं लोणावळ्याच्या मगणलाल चिक्की विकणाऱ्यांसारखं, सगळेच ‘ओरिजिनल’. (Aadivasi Hair Oil)
पण हे आदिवासी हेअर ऑइल गुणकारक आहे का? तर काही काही जणांसाठी आहे, आणि काही काही जणांसाठी नाही. प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा आहे, आणि त्याच्या समस्यांवर उपाय सुद्धा वेगवेगळे आहेत. हे तेल बनवणाऱ्या प्रत्येकाच म्हण असं आहे की या तेलामुळे केसांची वाढ होते, केसगळती कमी होते, आणि कोंडा पण कमी होतो. आता या विषयातले जे तज्ञ आहेत त्यांना जर तुम्ही विचारलत, तर तुम्हाला कळेल की हे तेल विकणाऱ्यांनी केलेले दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. तेलाच्या रिजल्टचा रिसर्च कुठेच उपलब्ध नाहीये. (Aadivasi Hair Oil)
======
हे देखील वाचा : नंदिनीचे तुप
======
एक दोन महीने मागे गेलात तर रामदेव बाबांच्या पतंजलि आयुर्वेद कंपनीच 14 Products बनवण्याचं Licenses रद्द झालं होतं. कारण तपासणी केल्यावर ते प्रोडक्टस आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं आढळलं होतं. कसये प्रत्येक कंपनी स्वत:चं माल विकण्यासाठी करोडो रुपायांच्या जाहिराती बनवतात त्यामुळे तुम्ही जर ह्यांच्या मार्केटिंग ला भुलून किंवा त्यांच्या व्हिडिओ मध्ये दाखवल्या जाणाऱ्या लांब लांब केसांच्या व्यक्तींकडे बघून हे तेल वापरण्याचा विचार करत असला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग वापरा. कारण हे तेल विकण्यासाठी Hire केलेल्या Influencers ना लाखोंरुपय मिळतात पण तुमचं आरोग्य त्यापेक्षा अमूल्य आहे तर त्याची काळजी घ्या. (Aadivasi Hair Oil)