युद्धांचा इतिहास पाहिला तर कळतं की सत्तेपासून फळांपर्यंत, आणि धर्मांपासून शांतीपर्यंत अशा अनेक गोष्टींसाठी माणसाने युद्ध केलेलं आहे. इतिहासाच्या पानांवर असे अनेक युद्ध आहेत जे मानवाच्या शौर्याची आणि विध्वंसाची साक्ष देतात. पण मानवांच्या युद्धाच्या इतिहासात एक युद्ध असं झालं होतं. जे कोणत्या देशा देशांमध्ये नाही किंवा माणसांमाणसामध्ये नाही तर माणूस आणि पक्षांमध्ये झालं होतं. हा पक्षी म्हणजे एमू. एमू या पक्ष्याने सैनिकांच्या कसे नाकी नऊ आणले होते? माणसा आणि पक्षांमधलं हे युद्ध कुठे झालं होतं आणि का? हे जाणून घेऊया. माणसा आणि पक्षांमधल्या या आगळ्यावेगळ्या युद्धाला सुरुवात झाली १९३२ साली, पहिल्या महायुद्धानंतर सेवानिवृत झालेल्या काही सैनिकांना सरकारने जमिनी दिल्या. ह्या जमिनी प्रामुख्याने पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये होत्या. आता हे सैनिक इथे शेतकरी झाले आणि त्यांनी आपापल्या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली, पण काहीच काळात त्यांच्या सर्व पिकांची नासधूस होण्यास सुरुवात झाली. ही नासधुस करणारे पक्षी होते एमू. एमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. पण त्या काळात तो राष्ट्रीय पक्षी नव्हता. शेतकरी आणि सेवानिवृत्त सैनिक या पक्षांच्या हल्ल्याला वैतागले होते. कारण त्यांच मोठ्याप्रमाणावर नुकसान होत होतं. नुकसान होत होतं कारण हे पक्षी संख्येने एक दोन नाही तर तब्बल २० हजार होते. (Australia)
एमू हे खाण्यासाठी पिकांवर हल्ला करत होते. नंतर शेतकऱ्यांनी एमूपासून पिकांच्या संरक्षणासाठी आपापल्या शेतांभोवती फेंसिंग लावायला सुरुवात केली. पण एमूंनी या फेंसिंग सुद्धा तोडल्या. एमू हा काही इतर पक्षांसारखा पक्षी नाही आहे. त्याला उडण्यासाठी पंख नसतात पण तो जगातला सर्वात वेगवान धावणारा पक्षी आहे. जेव्हा फेंसिंग लावूनसुद्धा पिकांवर हल्ला होऊ लागला. तेव्हा निवृत्त सैनिक आणि शेतकरी एमूंची तक्रार घेऊन सरकारकडे पोहचले. या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया सरकारने शेतकऱ्यांची मदत करण्याच ठरवलं. ही मदत एमूंविरुद्धच्या युद्धाची सुरुवात होती. ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन संरक्षणमंत्री यांनी मशीनगनने सुसज्ज असलेली सैन्याची एक टुकडी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठवली. २ नोव्हेंबर १९३२ चा दिवस सरकारने पाठवलेल्या सैन्याने एमू विरुद्धच ऑपरेशन सुरू केलं. पहिल्याच दिवशी त्यांना एमूंचा ५० पक्ष्यांचा ग्रुप दिसला सुद्धा, पण त्यापूर्वीच पक्ष्यांनी ओळखलं की त्यांच्यावर हल्ला होणार आहे आणि त्या मशीनगनच्या रेंजच्या बाहेर धावले. मग दुसऱ्या दिवशी या सैन्याच्या हाती काही लागलं नाही. पण ४ नोव्हेंबरच्या दिवशी सैनिकांना सुमारे १००० एमूंचा जथा त्यांना दिसला. त्यांनी लगेच त्यावर मशीनगनने फायर करण्यास सुरुवात केली. पण अचानक मशीनगन जाम झाली. पुन्हा एमू यशस्वीपणे पळून गेले. पण बारा एमू मारले गेले. पण यानंतर एमू सावध झाले होते. (International News)
========
हे देखील वाचा : वाळवंटातील गुलाबाला जेव्हा नरक म्हटले जाते
========
हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी एमूंनी छोटे छोटे ग्रुप्स बनवले आणि प्रत्येक गटात एक एमू पहारा देण्यासाठी ठेवला होता, शेतकऱ्यांनी एमी पक्ष्यांना ट्रक वापरून एकत्र करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयोग सुद्धा फसला. ट्रक एमूला धडकल्यामुळे ट्रकचा अॅक्सिडेंट झाला. एका गनरने ट्रकवरून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण एमू या ट्रकपेक्षा खूप फास्ट धावत होते. त्यात एमूंची चामडी जाड असल्यामुळे मशीन गनचा गोळीबारही त्यांना गंभीर दुखापत किंवा मृत्यू आणू शकत नव्हता. कारण काही एमी गोळ्या लागल्यानंतरही पळत राहिले आणि केवळ नंतर त्यांच्या जखमांमुळे मरण पावले. यानंतर अनेक मीडिया चॅनेलस वर एमू विरुद्धच्या युद्धाच्या सैन्याच्या अपयशाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. सैनिक अपयशी होऊन परतले. पण शेतकऱ्यांनी त्यांना विनंती करून पुन्हा बोलावलं. 12 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान 986 एमू मारले गेले, आणि जखमी एमूंमुळे २५०० एमू मारले गेले. पण यावेळी देखील एमू पक्ष्यांनी सैनिकांना पुरेपूर चुकवलं आणि पराभूत होऊन परत जाण्यास भाग पाडलं. सैन्याचं ऑपरेशन चालवणारे मेजर मर्डिथ म्हणाले होते की, जर आमच्याकडे एमू पक्ष्यांच एक डिविजन असतं आणि त्यांना बंदूक चालवता आली असती, तर आम्ही जगातल्या कोणत्याही सैन्याचा सामना करू शकलो असतो. असं होतं हे पक्षी आणि माणसांमधलं आगळंवेगळं युद्ध जे पुढे ‘द ग्रेट एमू वॉर’ म्हणून ओळखलं गेलं. (Australia)