दळवी महाविद्यालयात नेहमीच अनेक नवनवीन उपयोजित उपक्रम साजरे करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि के.वि.पेंढारकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने असाच एक अभिनव उपक्रम म्हणून दळवी महाविद्यालयाचे मानद ‘मार्गनिर्देशक’ आणि डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद शैक्षणिक ‘मार्गदर्शक’ श्री विनायक दळवी यांच्या संकल्पनेतून आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या जीवनावर आधारित कथा-कथन स्पर्धा आयोजित केली आहे. कारगिल विजयदिनी ह्या स्पर्धेची घोषणा मुंबई विद्यापीठ खाजगी महाविद्यालय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवारे यांनी केली होती.
७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, १५ ऑगस्ट २०२० रोजी आपल्या देशाच्या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून सतीश कथामाला ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आपल्या स्व-शैलीत मराठा, राजपूत, शीख आणि इतरांच्या बलिदानाच्या किंवा 1857 च्या उठावातील किंवा स्वातंत्र्य चळवळीत ज्यांना फाशी देण्यात आली होती किंवा गोळी घालून ठार मारण्यात आले होते, किंवा ज्या वीरांना मरणोपरांत परमवीर चक्र,अशोकचक्र इ. प्रदान करण्यात आले होते अशा वीस भारतीय हुतात्म्यांच्या कथा खास शैलीत सादर केल्या जातील. सिंधुदुर्गातील सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या ह्या स्पर्धेत मुंबईतील सेंट. झेवीयर महाविद्यालयही सामील झाले आहे.
मा. गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. शहीद हेमंत करकरे यांची सुद्धा कथा या कथामालिकेत गुंफली गेली आहे. पोलिस प्रशासनाने नेहमीच आपले शौर्य, पराक्रम दाखवले आहे. आजच्या कोरोनाच्या जागतिक महामारीत सुद्धा त्याचे कार्य अफाट असे असल्याने, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री लाभले हे योग्यच आहे.
१५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दळवी कॉलेजच्या युट्युब चॅनल वर
https://youtu.be/lXpKxVCWSeg
थेट प्रक्षेपीत होणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुंबई तसेच होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेंडणेकर भूषवित आहेत. आजच्या तरूणांच्या मनात राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणे, कुर्बानीची आठवण ठेवणे हे या स्पर्धेचे उद्धिष्ट ठेवून कुलगुरू महोदयांनी ह्या कार्यक्रमास जातीने प्रोत्साहित केले आहे.
अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी ही स्पर्धा आवर्जून पहावी व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करावी असे आवाहन के.वि.पेंढारकर महाविद्यालय डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनी पाहूया वीस हुतात्मांच्या कथा
166
previous post