आपण पाहतो बहुतांश लोक जेवल्यानंतर थोडा वेळ तरी फिरताना दिसतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ही एक उत्तम सवय असल्याचे मानले जाते. आयुर्वेदात सुद्धा याचा उल्लेख केला आहे. तर डॉक्टर सुद्धा आपल्याला जेवल्यानंतर फेऱ्या मारण्यास सांगतात. पण काही लोकांना खाल्ल्यानंतर चालण्याचे फायदे माहिती नसतात. खरंतर जेवल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. या विषयावर झालेल्या रिसर्चनुसार, जेवल्यानंतर वॉक (Walk after dinner) केल्यास रक्तातील ग्लुकोजचा स्तर नियंत्रित ठेवता येऊ शकतो. या व्यतिरिक्त शऱिरातील अतिरिक्त चरबी आणि लठ्ठपणाची समस्या ही दूर होण्यास मदत होते. तर आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर शतपावली करण्याचे काय फायदे होतात याबद्दल अधिक सांगणार आहोत.
-गॅस आणि ब्लोटिंग कमी होते
गॅस आणि ब्लोटिंगची समस्या खाल्ल्यानंतर शतपावली केल्यानंतर दूर होते. या विषयावर झालेल्या एका रिसर्चमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. त्यानुसार जेवल्यानंतर शरीरिक हालचाल करण्यामध्ये चालण्याचा सुद्धा समावेश आहे. यामुळे तुम्हाला पोट फुगणे किंवा गॅसची समस्या ही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. खरंतर जेवल्यानंतर शतपावली केल्याने शारीरिक हालचालीमुळे अँन्टी-ब्लोटिंग प्रभाव होतो जो ब्लोटिंगसह गॅसच्या समस्येला दूर ठेवण्यास मदत करते.
-रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते
रक्तातील ग्लुकोजचा स्तर वाढल्याने मधुमेहाची समस्या उद्भवते. या समस्येला कमी करण्यासाठी जेवल्यानंतर शतपावली केल्याचे फायदे दिसून आले आहेत. या संबंधित एका शोधानुसार जेवल्यानंतर रक्तात असलेली ग्लुकोजजचा स्तर वाढू लागतो जो कमी करण्यासाठी जेवल्यानंतर लगेच शतपावली करणे साकारात्मक परिणाम करते.
हे देखील वाचा- झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनिटे करा ‘अशी’ स्ट्रेचिंग, रहाल दिवसभर फ्रेश
-मानसिक आरोग्य राखण्यासम मदत करते
जेवल्यानंतर शतपावली केल्यास मानसिक आरोग्य व्यवस्थितीत राहण्यास मदत होते. रिसर्चनुसार चालणे, पळणे आणि शारीरिक हालचाल हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठवतेच. पण जेवल्यानंतर शतपावली (Walk after dinner) केल्यानंतर मानसिक आरोग्य ही संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये तुम्ही नियमित अॅरोबिक व्यायाम केल्यास तुम्हाला मानसिक आजार दूर राहतात.
-उत्तम झोप लागते
झोपेची समस्या कमी करण्यासाठी आणि उत्तम झोप लागण्यासाठी जेवल्यानंतर चालणे फायदेशीर होऊ शकते. रिसर्चनुसार दररोज १० हजार स्टेप्स चालल्यास उत्तम झोप लागते. त्याचसोबत जेवल्यानंतर चालल्यास झोपेची गुणवत्ता वाढण्यास ही मदत होऊ शकते.
-रक्तदाब नियंत्रित राहतो
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज जेवल्यानंतर चालले पाहिजे. एका शोदानुसार रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज शारीरिक हालचालीची सुद्धा आवश्यकता असते. त्यामध्ये चालणे हे फार महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त एका रिसर्चमध्ये चालण्यामुळे सिस्टोलिक रक्तदाब आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी केला जाऊ शकतो.