Fast tips- श्रावणातील महिना भगवा शंकराला प्रिय असतो. भगवान शकंराच्या प्रति आपली श्रद्धा-भक्ती प्रकट करण्यासाठी बहुतांशजण हे श्रावणी सोमवारचा उपवास करतात. या दिवशी शंकराची पूजा सुद्धा केली जाते. असे मानले जाते की, व्रत केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळेच काही लोक निर्जळी उपवास करतात. परंतु असे करणे काहीवेळेस आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. यामुळे गॅस, अॅसिडिटी, डोकेदुखी आणि उलटी सुद्धा होण्याची शक्यता असते. तर जाणून घेऊयात जर तुम्ही उपवास ठेवला असेल तर गॅस आणि अॅसिडिची समस्या उद्भवत असेल तर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत.
-चहा
चहाचे उपाशी पोटी सेवन करणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. श्रावण आणि नवरात्रात लोक काहीही न खाता फक्त चहा पितात. परंतु यामुळे गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. एक-दोन कप चहा प्यायल्याने काही होत नाही पण पाण्याप्रमाणे चहा पिणे ते सुद्धा उपाशी पोटी अनेक समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
-आंबट फळ
उपवासादरम्यान उपाशी पोटी आंबट फळ खाणं टाळा. त्याऐवजी केळ, सफरचंद, टरबूज अशी फळं खा. सकाळी उपाशी पोटी संत्र, मोसंबी, लिंबू किंवा अन्य कोणतेही आंबट फळ खाल्ल्यात तुम्हाला गॅस आणि अॅसिडिची समस्या होऊ शकते.
हे देखील वाचा- खाल्ल्यानंतर कधीच करु नका ‘या’ चुका, आरोग्याला बसेल फटका
-तळलेले-भाजलेले पदार्थ
दररोजच्या दिवसाच्या तुलनेत उपवासावेळी बहुतांश लोक हे अधिक तळलेले-भाजलेले पदार्थ खातात. जे आरोग्यासाठी नुकसानदायक असतातच. त्याचसोबत यामुळे गॅस, अॅसिडिटी सारखी समस्या होऊ शकते. या गोष्टींचे कमी प्रमाणात सेवन करा. उपाशी पोटी राहू नका पण तळलेले-भाजलेले पदार्थ खाण्याऐवजी फळ, सुकामेवा किंवा लिक्विड्सचे सेवन करा.(Fast tips)
-उपाशी पोटी राहणे
देवाच्या प्रति आपली श्रद्धा-भक्ती व्यक्त करण्यासाठी व्रत करणे योग्यच आहे. पण काहीही न खाता राहणे हे आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे तुम्हाला विकनेस, डोकेदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि उलटीची समस्या होऊ शकते.
त्याचसोबत तुम्ही पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर कमी वेळेसाठी करा. फक्त एकाच वेळी अधिक खाणे टाळा. या व्यतिरिक्त कठीण व्यायाम किंवा अधिक वेळ व्यायाम करण्यापासून दूर रहा. कारण शरिराला उर्जेची गरज असते. अशातच तुम्ही व्यायाम केल्यास शरिरातील उर्जा कमी होऊ शकते. यामुळे थकवा जाणवू शकतो. आणखी महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला आरोग्यासंबंधित एखादी समस्या असेल तर आणि तुम्ही औषध घेत असाल तर उपवास करु नका.