या डिजिटल युगात जर कोणी म्हटलं की, त्यांच्या शहरात मोबाईल आणि टीव्ही चालवले जात नाही, तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. एवढेच नाही, तर टीव्हीचे रिमोटसुद्धा या शहरात खेळणी म्हणून वापरता येत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगात एक असे शहर आहे, जिथे ना टीव्ही बघता येतो ना मोबाईल वापरण्याची परवानगी आहे. तुम्हाला वाटेल की हा नक्कीच उत्तर कोरिया असेल, जिथे हुकूमशहाने असा हुकूम दिला असेल. पण असे नाही. (Ban on mobile and tv)
मोबाईल आणि टीव्हीवर बंदी असलेले हे शहर सध्या अमेरिकेत आहे. होय! अमेरिका, ज्याला जगातील महासत्ता देखील म्हटले जाते. परंतु या देशात एक असे शहर आहे, जिथे टीव्ही तर लांबच पण मोबाइल आणि रेडिओच्या वापरावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

‘या’ गोष्टी वापरल्यावर होते तुरुंगवासाची शिक्षा
इथे टीव्ही, मोबाईल, रेडिओ कोणीही वापरू शकत नाही. असे करताना कोणी पकडले गेले, तर त्याला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. ग्रीन बँक हे खास शहर अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनियामधील पोकाहोंटासमध्ये आहे, जिथे या वस्तूंवर बंदी आहे. (Ban on mobile and tv)
हे देखील वाचा: ‘या’ देशात लावलं गेलंय पैशांचं झाड, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
खरं तर या शहराची लोकसंख्या खूपच कमी आहे. या परिसरात केवळ १५० लोक राहतात, मात्र कोणाकडेही टीव्ही आणि मोबाइल नाही. यामागेही एक खास कारण आहे.

‘हे’ आहे बंदीचे मुख्य कारण
ग्रीन बँक सिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवण्यास मनाई आहे. कारण जगातील सर्वात मोठी स्टीरेबल रेडिओ दुर्बिणी या शहरात आहे. याला ग्रीन बँक टेलिस्कोप असेही म्हणतात. ही दुर्बीण खूप मोठी आहे. एक मोठे फुटबॉल मैदान त्याच्यात सामावू शकते. ही दुर्बीण ४८५ फूट लांब आणि ७६शे मेट्रिक टन आहे. (Ban on mobile and tv)
येथे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी आहे. टीव्ही, रेडिओ, मोबाईलपासून ते आयपॅड, वायरलेस हेडफोन, रिमोट कंट्रोल खेळणी आणि मायक्रोवेव्हवरही बंदी आहे.

जिथे ही दुर्बीण बसवली आहे, तिथे अमेरिकेची नॅशनल रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी आहे. त्याची स्थापना १९५८ मध्ये झाली. येथून शास्त्रज्ञ अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या लहरींचा अभ्यास करतात. (Ban on mobile and tv)
टीव्ही, मोबाईल इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणाऱ्या लहरींचा अंतराळातून येणाऱ्या लहरींवर परिणाम होईल आणि शास्त्रज्ञांना ते अचूकपणे पकडता येणार नाही. त्यामुळे येथे इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. (Ban on mobile and tv)