Home » फिटनेसची आवड असेल तर ‘हे’ पर्याय ठरतील तुमच्यासाठी बेस्ट करियर ऑप्शन

फिटनेसची आवड असेल तर ‘हे’ पर्याय ठरतील तुमच्यासाठी बेस्ट करियर ऑप्शन

by Team Gajawaja
0 comment
Fitness Career
Share

प्रत्येकाची आपली-आपली आवड असते. कोणाला खेळात आवड असते तर कोणाला गाण्याची. अशाच प्रकारे सध्या तरुणाईमध्ये फिटनेसचे खुप वेड दिसून येत आहे. त्यामुळेच तुम्हाला ही फिटनेसची आवड असेल तर यामध्ये तुमच्यासाठी करियर म्हणून यामध्ये काही बेस्ट पर्याय सुद्धा आहेत. फिटनेस मध्ये करियर करण्यासोबत तुम्हाला यामधून पैसे ही कमवता येतील. तुम्ही तंदुरुस्त रहाल तर बहुतांश आजारांना दूर ठेवू शकतात. त्यामुळेच फिटनेसवर सध्या अधिक भर दिला जात असून तो एक उत्तम करियर ऑप्शन ठरु शकतो. जर जाणून घेऊयात फिटनेसची आवड असेल तर पुढील काही पर्याय ठरतील तुमच्यासाठी बेस्ट करियर ऑप्शन.(Fitness Career)

-योगा प्रशिक्षक
योगा हा एक फिटनेस करियरमधील बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुमचे आरोग्य तंदुरुस्त राहतेच पण पैसे सुद्धा उत्तम मिळतात. खरंतर जेव्हा कोरोनाची परिस्थिती ओढावली तेव्हा बहुतांश जणांनी आपली जवळची माणसे गमावली. तर काहींनी नोकरी आणि बरंच काही गमावले. याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला. यामधून बाहेर पडण्यासाठी बहुतांश लोकांनी योगाचा आधार घेतला. त्यामुळे योगा संदर्भातील एखादी डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्स करुन तुम्ही योगा प्रशिक्षक होऊ शकता. योगा प्रशिक्षण एखाद्या शाळेत, फिटनेस सेंटर्स, योगा सेंटर्स मध्ये हमखास काम करु शकतात.

हे देखील वाचा- सत्तरीतही राहा तंदुरुस्त नियमित करा हे 3 योगप्रकर; 3 नंबरचा आहे एकदम सोपा… 

-फिटनेस ट्रेनर
फिटनेस आणि आपले आरोग्य तंदुस्त ठेवण्याची आवड असेल तर तुम्ही याचा करियरच्या दृष्टीने नक्कीच फायदा करुन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून सर्टिफिकेट घेणे अनिवार्य आहे. काही संस्था फिटनेस ट्रेनरसाठी विविध प्रकारचे फिटनेस ट्रेनिंग कोर्स उपलब्ध करुन देतात. या सर्टिफिकेशन कोर्सचा कालावधी सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही बेसिक ते अॅडवान्स फिटनेस ट्रेनरची ट्रेनिंग घेऊ शकता. यानंतर तुम्ही फिटनेस ट्रेनर म्हणून नोकरी करु शकतात. तसेच याच्या माध्यमातून तुम्ही स्वत:चा व्यवसाय ही सुरु करु शकता आणि यामधून चांगले पैसे ही मिळतात.(Fitness Career)

-झुंबा प्रशिक्षक
आजकाल योगा. जिम करण्यासह झुंबाचे क्लासेस सुद्धा बहुतांश जणांकडून फिटनेस ऑप्शन म्हणून निवडले जातात. डान्स करता करता फॅट आणि ताण ही याच्या माध्यमातून कमी होते. त्यामुळे तुम्ही झुंबा प्रशिक्षक म्हणून ही फिटनेसच्या करियर बेस्ट पर्याय ठरु शकते. परंतु यासाठी तुम्हाला प्रोफेशनल कोर्सेस करणे अनिवार्य असणार आहे.



Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.