श्रावण महिना सुरु झाला की सगळ्यांनाच उत्सुकता असते ती, श्रावणातल्या सोमवारची. श्रावण महिना म्हटले की, डोळ्यासमोर येते ती शिव भक्ती. हा संपूर्ण महिनाच भगवान शिवाला समर्पित आहे. मात्र असे असले तरी श्रावणातल्या सोमवारचे महत्व जरा विशेष आहे. श्रावण महिन्यातला सोमवार म्हटल्यावर त्याला अनन्यसाधारण महत्व तर असते सोबतच या दिवशी शंकराची पूजा केल्याने अनेक लाभ देखील मनुष्याला मिळतात. यावर्षी शुक्रवारी, २५ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू झाला आहे. तर शनिवारी, २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिना संपणार आहे. यंदा या श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार आले आहेत. यातला पहिला सोमवार २८ जुलै रोजी असणार आहे. (Shravan NEws)
आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला सृष्टीचे पालक श्रीविष्णू चार महिने निद्राधीन होतात. या काळाला चातुर्मास म्हटले जाते. दरम्यान विष्णू निद्रेत असल्याने सृष्टीचे पालकत्व महादेव यांच्याकडे असते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे. श्रावणी सोमवारी महादेवावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक करण्याची परंपरा असून, असे केल्याने आपण अनेक दुःखातून तरतो अशी मान्यता आहे. यासोबतच श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूठ वाहण्याचेही महत्त्व आहे. (Marathi News)
उद्या श्रावणातला पहिला सोमवार असून या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो. सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या वेळेत शिव मंदिरात किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. या दिवशी महादेवाला गंगाजल आणि दुधाने अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. या दिवशी महादेवाला १०८ बेलपत्र वाहिल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. शिवाय शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून शंकराची आरती करावी. शिवाय त्या सोमवारी भगवान महादेवाला शिवामूठ वाहावी. (Todays Marathi HEadline)
=========
हे देखील वाचा : Shravan : महादेवाला होती एकूण 8 अपत्ये, जाणून घ्या त्यांच्या रंजक जन्मकथा
=========
श्रावणातला पहिल्या सोमवारी महादेवाला तांदुळाची शिवामूठ वाहावी. शिवामूठ अर्पण करणे म्हणजे, महादेवाच्या पिंडीवर मुठीमध्ये तांदूळ घेऊन हाताच्या अंगठयाने तांदूळ देवावर वाहणे. लग्नानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ वाहण्याचे व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केली जातात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून अर्थात एक वेळेस जेवून शिवलिंगाची पूजा करावी आणि ‘ओम नमः शिवाय’ हा मंत्र म्हणत देवाला तांदूळ शिवामूठ म्हणून अर्पण करावे. शिवामूठ वाहिल्यानंतर देवाला प्रार्थना करून आपल्या कुटुंबासाठी, पतीसाठी आणि मुलांसाठी उदंड निरोगी आयुष्याची मागणी करावी. (Top Marathi NEws)
श्रावण सोमवार शिवामूठीची कहाणी
आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता, त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगटं,नेसायला जाडें भरडे,राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावणमास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली, ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. नावडतीने विचारलं त्याने काय होतं ? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं,मुलबाळ होतं,नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ? नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते.नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. (Latest Marathi Headline)
नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या, नावडतीने विचारलं काय बोलताय, तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामूठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं ? मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी. गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा,नणंदाजावा,भ्रतरा,नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा.पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग,चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीकरीता घ्यावे. (Marathi Trending News)
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानणंदानीं उष्टं माष्टं पान दिलं ते तीनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला , नावडतीने घरातून सर्व सामान घेतला, पूढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली, आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या,दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तिळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन निजून राहिली, संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे. (Latest Marathi NEws)
नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत कांटे कुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली,घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. (Top Marathi HEadline)
नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करूणा आली. नागकन्या, देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा,सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतिची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. (Social News)
=========
हे देखील वाचा : Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
=========
राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं ? सूनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. (Social Updates)