Tilbhandeshwar Temple : वाराणसी शहरातील एक अद्भुत व पवित्र मंदिर म्हणजे तिलभांडेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टीनेच नव्हे, तर त्यामागील गूढ आणि अद्वितीय रहस्यामुळेही प्रचंड प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, येथे असलेले महादेवाचे शिवलिंग दरवर्षी स्वतःहून थोडेसे उंच होते! ही गोष्ट शास्त्राच्या दृष्टीने अद्याप सिद्ध झालेली नसली तरी भाविकांमध्ये याचा प्रचंड विश्वास आहे.
शिवलिंगाचा नैसर्गिक आकार
तिलभांडेश्वर महादेव मंदिरातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातील शिवलिंग स्वतःहून निर्माण झाल्याचे मानले जाते, ज्याला ‘स्वयंभू’ म्हणतात. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग दरवर्षी तिळाच्या आकाराएवढे उंच होते, त्यामुळे या मंदिराला “तिलभांडेश्वर” असे नाव पडले आहे. हजारो वर्षांपासून ही प्रक्रिया सतत चालू आहे, असा लोकसमज आहे.
मंदिराचा इतिहास आणि स्थान
हे मंदिर वाराणसीच्या लंका भागात स्थित आहे. इतिहास सांगतो की, या जागेवर तपस्वी मुनींनी घोर तपस्या करून भगवान शंकरांची कृपा मिळवली होती. त्याच ठिकाणी शिवलिंग प्रकट झालं, असं मानलं जातं. प्राचीन काळापासून हे मंदिर वाराणसीतील एक प्रमुख तीर्थस्थान आहे. महाशिवरात्री, श्रावण मास, नागपंचमी अशा पावन पर्वांमध्ये येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येतात.

Tilbhandeshwar Temple
धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
या मंदिरात दररोज विशेष पूजा, रुद्राभिषेक, अष्टोत्तर पूजन केलं जातं. असे मानले जाते की, येथे प्रार्थना केल्याने आरोग्यसंपन्न जीवन, मानसिक शांती, आणि पापांपासून मुक्ती मिळते. अनेक लोक येथे येऊन शनि दोष, कालसर्प योग, आणि गंभीर आजारांपासून मुक्तीसाठी पूजा करतात. हे मंदिर काशी विश्वनाथ मंदिराइतकेच महत्त्वाचे मानले जाते.
========
हे देखील वाचा :
Nagpanchami : नागपंचमीच्या दिवशी ‘हे’ उपाय करा आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवा
Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
Nagpanchmi : बत्तीस शिराळा गावातील नागपंचमीचा अनोखा इतिहास
=========
वास्तूशिल्प आणि मंदिरातील वातावरण
तिलभांडेश्वर मंदिराची रचना प्राचीन भारतीय शैलीत केलेली असून, नक्षीदार खांब, सुशोभित मंडप आणि शांतीदायी परिसर यामुळे येथे आल्यानंतर भक्ताला अपूर्व आध्यात्मिक अनुभव मिळतो. मंदिरात असलेल्या पवित्र नंदीच्या मूर्तीसमोर बसून जप करणं, किंवा गाभाऱ्यात शिवलिंगावर जल व बेल अर्पण करणं यामुळे भक्तांना शांती लाभते.(Tilbhandeshwar Temple)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics