हिंदी महासागरातल्या एका छोट्याशा बेटावर, ट्रोमेलिन आयलंडवर एक जहाज येऊन आदळलं. ज्यात १६० आफ्रिकन लोकं होते ज्यांना गुलाम म्हणून विकण्यासाठी फ्रान्सला नेलं जात होतं. या जहाजात १२२ फ्रेंच क्रू मेंबर्स सुद्धा होते. हे जहाज ट्रोमेलिन आयलंडवर आदळल्यानंतर जागीच ८० गुलामांचा मृत्यू झाला. बाकीचे जे वाचले ते एका अशा बेटावर होते जे फक्त दीड किलोमीटर लांब, ८०० मीटर रुंद होतं आणि त्याच्या चारही बाजूंनी फक्त समुद्र होता आणि बेटावर फक्त वाळू आणि वाळू! एकही झाड नाही, पाण्याचा थेंब नाही, खायला काहीच नाही. अशा बेटावर त्या वाचलेल्या ८० गुलामांना सोडून ते फ्रेंच क्रू मेंबर्स परतले. परतताना त्यांनी गुलामांना एक वचन दिलं आम्ही तुम्हाला नेण्यासाठी परत येऊ आणि ते त्यांना सोडून निघून गेले. मग वर्ष उलटली आणि तब्बल १५ वर्षांनी जेव्हा या बेटावर ते गुलामांना घेण्यासाठी परतले तेव्हा त्यांनी जे पाहीलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पूर्ण गोष्ट काय? जाणून घेऊ. (Trapped on Tromelin)
ही गोष्ट सुरू होते १७६१ मध्ये. आफ्रिकेच्या मेडागास्करपासून मॉरिशसपर्यंत, गुलामांचा व्यापार चालायचा. हाचं व्यापार करण्यासाठी एक उटील नावाचं जहाज, मेडागास्करवरून १६० गुलामांना घेऊन मॉरिशसला निघालं होतं. पण हे जहाज चालवणारा कॅप्टन ज्यां दे ला फार्ग, हा खरं तर गुलामांचा व्यापार करायला पात्र नव्हता. म्हणजे त्याच्याकडे त्याचं licence नव्हतं. तरीही पैशाच्या लालसेपोटी त्याने १६० लोकांना गुलाम बनवून जहाजात कोंबलं. पण मॉरिशसला जायच्या रस्त्यात रात्रीच्या अंधारात गडबड झाली. जहाजाचा नकाशा वाचताना भांडण झालं आणि जहाज थेट ट्रोमेलिन बेटाच्या किनाऱ्यावर जाऊन आदळलं. जहाज बुडायला लागलं. त्या १६० गुलामांपैकी ८० जण समुद्रातच बुडाले. बाकीचे ८० जण कसेबसे पोहत बेटावर पोहोचले. यात बायका, मुलंही होती. जहाजातले काही फ्रेंच क्रू मेंबर्सही वाचले.
पण इथून खरी लढाई सुरू झाली. बेटावर काहीच नव्हतं! ना अन्न, ना पाणी, ना निवारा. जहाजाचा दुसरा कॅप्टन, बार्थलेमे डु वरने, याने कमांड आपल्या हातात घेतली. त्याने दोन कॅम्प बनवले. एक फ्रेंच क्रूसाठी, दुसरं गुलामांसाठी. जहाजातून वाचलेलं थोडं अन्न त्याने या दोघांमध्ये वाटलं, पाण्यासाठी त्यांनी बेटावर विहीर खणून पाणी साठवून वापरण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं फार काळ टिकणार नव्हतं. तीन महिन्यांनी परिस्थिती इतकी खराब झाली की बार्थलेमेने जहाजाच्या तुटलेल्या लाकडांपासून एक छोटी नाव बनवली. आणि मग काय? १२२ फ्रेंच क्रू मेंबर्स त्या नावेत बसले आणि मॉरिशसला निघाले. बार्थलेमे स्वतःचा जीव वाचवून तिथून पळ काढला होता, पण जाताना त्याने त्या लोकांना वचन दिलं होतं की तो परत येईल. पण हे वचन फक्त शब्दांपुरतंच राहिलं.(Trapped on Tromelin)
चार दिवस समुद्रात भटकल्यावर वरने मॉरिशसला पोहोचला. तिथल्या गव्हर्नरला त्याने विनंती केली, “बेटावर अडकलेल्या लोकांना वाचवा.” पण गव्हर्नरला कसलीच दया आली नाही. त्याला फक्त एकच चिंता होती, “तुला परवानगी नसताना गुलामांचा व्यापार तू का केलास?” बार्थलेमेने खूप प्रयत्न केले, पॅरिसपर्यंत बातमी पोहचवली, पण काहीच फायदा झाला नाही. का? कारण तेव्हा फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये युद्ध सुरू होतं. फ्रान्स हरत होता, मग त्या ८० लोकांचं काय? कोणीच त्यांना वाचवायला पुढे आलं नाही. असेच १५ वर्ष उलटली…(Top Stories)
बार्थलेमे कस्तालान डु वरनेचं आयुष्य मजेत चाललं होतं पण त्याला एक गोष्ट खातं होती. १५ वर्षांपूर्वी त्या बेटावर सोडलेले गुलाम आता कसे असतील. त्या बेटावर १५ वर्ष जिवंत राहणं तसं खूपच अवघड होतं, पण वचन तर वचन होतं. वरने ने एका फ्रेंच जहाजाच्या कॅप्टनला विनंती केली. खूप विनवणी केल्यानंतर त्याने फ्रान्सपासून हिंदी महासागराकडे प्रवास सुरू केला. जेव्हा तो त्या बेटावर पोहचला तिथे त्याने जे पाहिलं, ते कोणालाही भयभीत करणारं होतं. त्याआधी मधल्या काळात सुद्धा त्या गुलामांना वाचवण्याचे प्रयत्न झाले होते. युद्ध संपल्यानंतर त्या अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या चर्चा खूप होतं होती पण अॅक्शन काहीच होतं नव्हती. (Trapped on Tromelin)
शेवटी १७७२ मध्ये फ्रेंच अधिकाऱ्यांना जाग आली. तरीही बेटापर्यंत जहाज पाठवायला आणखी तीन वर्षं लागली. १७७५ मध्ये दोन लोक एका छोट्या नावेतून बेटावर पोहोचले. त्यापैकी एकजण तिथेच थांबला, आणि दुसऱ्याने परत जाऊन सांगितलं की बेटावर अजूनही काही लोक जिवंत आहेत. त्यानंतर आणखी दोन नावा बेटावर जायचा प्रयत्न करत होत्या, पण वादळामुळे दोन्ही वेळा मिशन फेल झालं. शेवटी १७७६ मध्ये बार्थलेमेने या फ्रेंच जहाजाच्या कॅप्टनला इथे पाठवलं होतं. तो जेव्हा बेटावर पोहचला तेव्हा तिथे फक्त सात बायका आणि एक आठ वर्षांचा मुलगा हे आठ लोक जीवंत होते. बाकीचे ७२ लोकं मरण पावले होते.(Top Stories)
आता खरा प्रश्न होता की या सात बायका आणि तो मुलगा गेल्या १५ वर्षांत कसे जिवंत राहिले? हे लोक आपल्या घराबाहेर कधीच पडले नव्हते. तरीही त्यांनी जगण्याचा मार्ग शोधला. जेव्हा फ्रेंच लोकांनी गुलामांना त्या बेटावर एकटं सोडलं, तेव्हापासून पुढच्या १५ वर्षांत त्या लोकांनी फक्त एक गोष्ट जपली. त्यांनी ती आग कधीच विझू दिली नाही, जी त्यांनी खूप मेहनतीने पेटवली होती. बेटावर एकही झाड नव्हतं, म्हणून त्यांनी जहाजाच्या तुटलेल्या लाकडांचा वापर आग पेटवायला केला. खायला त्यांनी समुद्री खेकडे, मासे यांचा आधार घेतला. या काळात अनेकदा असं झालं की काही लोकांनी बेट सोडायचा प्रयत्न केला. दोन वर्षांनंतर १८ लोकांचा एक गट नाव बनवून समुद्रात निघाला. त्यांचं काय झालं, ते कोणालाच कधी कळलं नाही. (Trapped on Tromelin)
==============
हे देखील वाचा : Marine Drive एका ‘मराठी’ माणसाने बांधलय !
==============
कदाचित या लोकांची गोष्टही कधी समोर आली नसती. पण मग २००६ मध्ये एका फ्रेंच संशोधकाने या गोष्टीत इंटरेस्ट घेतला आणि त्याच्या टीमसोबत बेटावर खाणकाम सुरू केलं. त्यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्या लोकांनी पाण्यासाठी पाच मीटर खोल विहीर खणली होती. एक स्वयंपाकघर बनवलं होतं. याशिवाय जमीन खणून वाळूच्या दगडांनी भिंत बांधली होती. त्यात छोट्या छोट्या खोल्या बनवल्या होत्या, जिथे ते रात्री झोपायचे. भांड्यांसाठी त्यांनी जहाजातून मिळालेल्या धातूंचा वापर केला. बेटावर खाणकामत दोन कबरीही सापडल्या. त्यांच्या तपासणीतून कळलं की ते लोक समुद्री पक्षी आणि कासव मारून खायचे. (Trapped on Tromelin)
वर्षांनंतर त्यांना कदाचित कळलं असावं की त्यांना कोणी वाचवायला येणार नाही. म्हणून त्यांनी तिथेच आपलं एक छोटा समाज बनवला आणि सगळी कामं वाटून घेतले. अशा रीतीने ते कित्येक वर्षं जिवंत राहिले. १७७६ मध्ये त्या सात बायका आणि एका मुलाला वाचवून मॉरिशसला आणलं गेलं. तेव्हा मॉरिशसचा गव्हर्नर बदलला होता. त्याने त्या सगळ्या बायकांना गुलामगिरीतून मुक्त केलं. एका फ्रेंच अधिकाऱ्याने तर एका बाईला आणि तिच्या मुलाला आपल्या घरी आश्रय दिला. पण गुलामांचा व्यापार त्यानंतरही चालूच राहिला. १८४८ मध्ये फ्रान्सने गुलामगिरी बेकायदेशीर ठरवली, पण त्याआधी अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंट्समध्ये सांगा!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics