Home » Mamdani VS Trump : ममदानीविरोधात ट्रम्पनी थोपटले दंड !

Mamdani VS Trump : ममदानीविरोधात ट्रम्पनी थोपटले दंड !

by Team Gajawaja
0 comment
Mamdani VS Trump
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यू यॉर्क शहरातील महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांच्यात वाक् युद्ध सुरु झाले आहे. वेड्या कम्युनिस्टला न्यू यॉर्कचा नाश करु देणार नाही, अशा शब्दात ट्रम्प यांनी जोहरान ममदानीवर निशाणा साधला आहे. तर ममदानी यांनी ट्रम्प यांचे हे विधान म्हणजे, लोकशाहीवर हल्ला असल्याचे सांगितले आहे. (Johran Mamdani)

न्यू यॉर्कचे डेमोक्रॅटिक महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ममदानी यांचा थेट ‘मूर्ख डावे’ असा उल्लेख करत त्यांच्या नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारतीय वंशाचे नेते जोहरान ममदानी यांनी न्यू यॉर्क शहरातील डेमोक्रॅटिक महापौरपदाची प्राथमिक निवडणूक जिंकली आणि ते वादाच्या फे-यात अडकले आहेत. यासाठी ममदानी यांची विचारसरणी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. (International News)

ममदानी यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला. त्यानंतर ममदानी सार्वत्रिक निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान महापौर एरिक अॅडम्स, अपक्ष उमेदवार जिम वॉल्डेन आणि रिपब्लिकन कर्टिस स्लिवा हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र या सर्वात ममदानी हे कट्टरपंथीय नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच न्यू यॉर्कमधील मुस्लिम मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट आहे. आता हेच ममदानी डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार असून त्यांनी ही निवडणूक जिंकली तर ते न्यू यॉर्कचे होणारे पहिले भारतीय वंशाचे आणि पहिले मुस्लिम महापौर असतील. या सर्वात त्यांच्यावर मुस्लिम नागरिकांना चिथावणी दिल्याचा आणि अमेरिकेत बेकायदेशीरपणे रहात असलेल्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरुनच ट्रम्प आणि ममदानी यांच्यात वाद आहे. ट्रम्प यांनी ममदानीला धमकी दिली आहे की, जर त्यांनी न्यू यॉर्कमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध इमिग्रेशन विभागाची कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना अटक करतील. या ट्रम्प यांच्या धमकीनंतर ममदानी यांनीही ट्रम्प यांच्या विरोधात विधानं केली आहेत. शिवाय ट्रम्प हे लोकशाहीचे विरोधक असल्याची टीका केली आहे. (Johran Mamdani)

या सर्व वादाचे कारण म्हणजे, जोहरान ममदानी यांनी ते महापौर म्हणून निवडून आल्यास न्यू यॉर्क शहरात इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट विभागाला काम करू देणार नसल्याचे आश्वासन त्यांच्या मतदारांना दिले आहे. जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून फेडरल एजन्सीने अमेरिकेत बेकायदेशीरपणे रहाणा-या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. ही अटक थांबवण्यासाठी ममदानी मैदानात उतरले आहेत. (International News)

साहजिकच ट्रम्प यांनी ममदानी यांना आत्तापासून विरोध सुरु केला आहे. ममदानी यांना फक्त ट्रम्पचा विरोध आहे, असे नाही, तर अमेरिकेतील मुळ नागरिकाही त्यांच्या विरोधात आहेत. शिवाय न्यू यॉर्कमध्ये मोठ्या संख्येनं रहाणा-या इस्रायली नागरिकांचाही ममदानी यांना विरोध आहे. इस्रायलनंतर सर्वात जास्त ज्यू लोकसंख्या न्यू यॉर्क मध्ये आहे. जोहरान ममदानी हे उघडपणे इस्रायलच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. हेच ममदानी न्यू यॉर्कचे महापौर झाले तर येथे रहाणा-या ज्यू नागरिकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. ममदानी या निवडणुकीत उतरताच न्यू यॉर्कमध्ये ज्यूंविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत. हेच जर ममदानी महापौर झाले तर या घटनांमध्ये अधिक वाढ होण्याची भीती, ज्यू नागरिकांना वाटत आहे. ममदानी यांनी निवडणुकीत उतरण्याआधीपासून स्थलांतरितांना आधार देण्याचे काम केले आहे. मेक्सिको आणि मुस्लिम बहुल देशांमधून आलेल्या स्थलांतरितांना आसरा देण्याचे काम ममदानी करतात. यामध्ये अनेक नागरिक बेकायदेशीरपणे अमेरिकेत येत असल्याचा आरोपही होत आहे. (Johran Mamdani)

=============

हे ही वाचा : Golden Visa : यूएई भारतीयांना देणार स्पेशल ‘गोल्डन व्हिसा’

America : भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या विद्यापीठापर्यंतचा प्रवास अडचणीचा !

=============

तसेच यातील अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं असून ममदानी त्यांना आश्रय देऊन न्यू यॉर्कमध्ये गुन्हेगार वाढवत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. यामुळे ममदानी यांना विरोध वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही त्यांच्या विरोधात प्रचार करीत आहेत. ट्रम्प यांनी ममदानीला मूर्ख, डावे अशा शब्दांत संबोधित केले असून ममदानीच्या अमेरिकन नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ममदानी यांना 2018 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. त्यांची पत्नी ही सीरियन वंशाची आहे, आणि त्यामुळेही त्यांच्यावर टीका कऱण्यात येते. एकूण नोव्हेंबर पर्यंत होणा-या न्यू यॉर्क शहराच्या निवडणुकांपर्यंत ट्रम्प आणि ममदानी यांच्यातील वाद अधिक तीव्र होत जाण्याची शक्यता आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.