Home » Ekadshi :देवशयनी एकादशी- भगवान विष्णूंचा निद्राधीन होण्याचा दिवस

Ekadshi :देवशयनी एकादशी- भगवान विष्णूंचा निद्राधीन होण्याचा दिवस

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ekadshi | Top Stories
Share

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील सर्वात महत्त्वाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. तिला पद्म एकादशी, आषाढी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हटले जाते. देवशयनी एकादशीचे व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. दु:ख दूर होतात. मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. देवशयनी एकादशीला इतर एकादशीच्या तुलनेत जास्त महत्व असते. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. (Ekadshi)

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये देवशयनी एकादशीच्या दिवशी वैष्णवांचा मेळा भरतो. भीमा नदीच्या काठावरती वसलेल्या वारकऱ्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरमध्ये तर या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जमतात. भीमा नदीला पंढरपूर मध्ये “चंद्रभागा” असे देखील म्हणतात, कारण पंढरपुरात भीमा नदीचे पात्र चंद्राकृती सारखे दिसते. (Marathi News)

विष्णु पुराणानुसार आषाढ महिन्यातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात आपल्या योगनिद्रामध्ये जातात. या प्रक्रियेसाठी देवशयनी एकादशी साजरी केली जाते. देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या एकादशीनंतर सुमारे चार महिन्यांनी प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू या निद्रेतून बाहेर येतात. एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्रांचा जप करावा. तामसिक पदार्थांपासून दूर रहावे. देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतेही नशा करणारे पदार्थ सेवन करू नयेत. एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये, अथवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. (Todays Marathi Headline)

Ekadshi

काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे. श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिक एकादशी प्रबोधिनी नावाने ओळखली जाते. (Top Marathi HEadline)

देवशयनी एकादशीची कथा 1
सूर्यवंशात मांधाता नावाच्या राजाचे राज्य होते. प्रामाणिक, शांतताप्रिय, न्यायप्रिय असण्यासोबतच ते एक शूर आणि कुशल योद्धाही होते. राजा आपल्या प्रजेच्या प्रत्येक गरजांची नेहमी काळजी घेत असे. हे राज्य सदैव सुख-समृद्धीने नांदत होते. दैवी कृपेने मांधाताच्या राज्यात सर्व काही ठीक चालले होते. पण अचानक काळाने वळण घेतले आणि त्यांच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला. नागरिक उपासमार आणि निराशेशी झुंजू लागले. (Latest Marathi News)

या अनपेक्षित घटनेने राजा मांधाताला खूप आश्चर्य वाटले. त्यांच्या राज्यात अशी कोणतीही आपत्ती कधीच घडली नव्हती. मग राजाने दुष्काळावर मात करण्यासाठी उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत राजाने ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिराच्या आश्रमात जाऊन आपल्या राज्याची व्यथा सांगितली. राजाने ऋषींची प्रार्थना करुन मदत मागितली. यावर अंगिराने राजाला देवशयनी एकादशीचे व्रत करण्याची सूचना केली. राजाने सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचे पालन केले आणि त्यानुसार उपवास सुरू केला. काही वेळातच राजा मांधाताचे राज्य दुष्काळापासून मुक्त झाले. त्यामुळे त्यांच्या राज्यात पुन्हा शांतता आणि समृद्धी आली. तेव्हापासून या व्रताचे महत्त्व वाढले आहे. (Top Stories)

============

हे ही वाचा : Rathyatra : जिच्या स्पर्शाने होते पुण्यप्राप्ती अशा भगवान जग्गनाथांच्या रथाच्या दोरीचे नाव देखील आहे खास

Pandharpur: विठू माऊलीच्या कपाळावरील टिळ्याचे आहे खास वैशिष्ट्य

=============

देवशयनी एकादशी कथा 2
पुराणकाळानुसार म्रुदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न केले. वरदान म्हणून त्यांनी मला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, झालेच तर स्त्रीच्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. वरदान प्राप्त झाल्यानंतर म्रुदुमान्य राक्षसाने सर्व देवांचा पराभव करुन त्यांना बंदिस्त केले. भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला. भगवान शंकरही आपल्या वरदानामुळे हताश झाला होता. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेशसह सर्व देवी-देवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. काही दिवसांनी ब्रह्मा-विष्णू-महेश या तीघांच्या श्वासातून एका देवीची उत्पत्ती झाली. तिने सर्व देवातांना अभय देऊन म्रुदुमान्याला मरण दिले. तिला एकादशी देवी म्हणून ओळखू लागले. देवांनी तिची स्तुती केल्यानंतर तिने सांगितले एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने त्यांची सर्व पापांपासून मुक्ती होईल. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.