जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलं तरी त्याच्या साहसी चित्रपटांची मालिका समोर उभी रहाते. 007 या नावानं परिचित असलेल्या जेम्स बॉण्डचे पात्र इयान फ्लेमिंग यांनी तयार केले. याच जेम्स बॉण्डच्या साहसी कथांचे 1953 पासून अनेक हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यातील प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. (Blaise Metreweli)
यात जेम्स बॉण्डची बॉस ही एम नावाची महिला दाखवण्यात आलेली आहे. ब्रिटनची गुप्तचर संस्था, MI6 ची प्रमुख असलेली ही मॅडम एम, जेम्स बॉण्डकडून अनेक कारनामे करुन घेत असे. जेम्स बॉण्डच्या चित्रपटांतून प्रसिद्ध झालेल्या या ब्रिटीश गुप्तचर संस्थेला आता प्रत्यक्षातही एक महिला प्रमुख मिळाली आहे. ब्लेझ मेट्रेवली यांची MI6 च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 116 वर्षानंतर या संघटनेवर एका महिलेची प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. MI6 या ब्रिटीश गुप्तचर संस्थेवर सध्या अनेक गोष्टींची जबाबदारी आहे. रशिया-युक्रेन युद्धामध्ये MI6 ची भूमिका, बदलते तंत्रज्ञान नुकतेच सुरु झालेले इस्रायल-इराण युद्ध आणि या सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे, ब्रिटनमध्ये ड्रग्ज, कोकेन यांचा व्यापार वाढला आहे. सोबतच ब्रिटीश तरुणींच्या शारीरिक शोषणाचे एक मोठे रॅकेट समोर आले आहे. या सर्वांना रोखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या गुप्तहेर संस्थेचा पुन्हा वचक निर्माण करण्याची जबाबदारी ब्लेझ मेट्रेवली यांच्यावर आली आहे. (International News)
जेम्स बॉण्डच्या चित्रपटातून गाजलेली MI6 ही ब्रिटीश गुप्तहेर संघटना आता पुन्हा चर्चेत आली आहे. कारण या संघटनेला आता वास्तवातही महिला बॉस मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात माहीर असलेल्या ब्लेझ मेट्रेवली यांच्याकडे MI6 ची सूत्र सोपवण्यात आली आहेत. ही ऐतिहासिक नियुक्ती ठरली आहे. सध्या ब्रिटन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रित्या अनेक समस्यांनी वेढलेला असतांना ब्लेझ मेट्रेवली यांची नियुक्ती ही विशेष ठरणार आहे. मॅट्रेवली या यापूर्वी MI6 मध्ये तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे महासंचालक म्हणून नियुक्त होत्या. मध्य पूर्व आणि युरोपमध्ये त्यांनी आपल्या नियुक्तीचा बहुतांश काळ घालवला आहे. त्यामुळे सध्या मध्यपूर्वेतील युद्धपरिस्थितीमध्ये ब्लेझ यांची नियुक्ती झाल्यामुळे MI6 ला पुन्हा गतवैभव मिळेल, अशी आशा करण्यात येत आहे. (Blaise Metreweli)
MI6 च्या प्रमुखपदावर पोहचणा-या ब्लेझ या पहिल्या महिला अधिकारी आहेत. 47 वर्षीच्या मेट्रेवली या पूर्वी MI6 च्या तांत्रिक शाखेच्या प्रमुख होत्या. त्या MI6 मध्ये Q या सांकेतिक नावाने ओळखल्या जातात. मेट्रेवेली 1999 मध्ये MI6 मध्ये सामील झाल्या. सुरुवातीपासून त्यांची नियुक्ती ही मध्यपूर्वेमध्ये करण्यात आली होती. याशिवाय युरोपमध्येही ब्लेझ यांनी मोहिमा पार पाडल्या आहेत. त्यामुळे सध्या MI6 मध्ये मध्यपूर्वेबाबत जे अभ्यासू आहेत, त्यामध्ये ब्लेझ यांचा समावेश आहे. सध्याचे MI6 प्रमुख रिचर्ड मूर हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन लवकरच निवृत्त होणार आहेत. (International News)
अशावेळी ब्लेझ MI6 च्या प्रमुख झाल्यावर त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. मध्यपूर्वेत असतांना ब्लेझ या अनेक ऑपरेशनमध्ये सहभागी होत्या. यशस्वी ऑपरेशनमुळे ब्लेझ यांची लोकप्रियता MI6 मध्ये अधिक आहे. केंब्रिजमधील पेम्ब्रोक कॉलेजमधून मानववंशशास्त्रामध्ये पदवीधर असलेल्या ब्लेझ या MI6 मध्ये सहभागी होणा-या गुप्तहेरांसाठी आयकॉन आहेत. युरोप आणि मध्यपूर्वेत त्यांनी अनेक अतिशय अवघड कारगिरी अचूक योजनेनं पार पाडली आहेत. त्यामुळे MI6 ने त्यांना पुरस्कारही दिले आहेत. MI6 ही जगातील सर्वात जुन्या गुप्तचर संस्थांपैकी एक गुप्तचर संस्था आहे. (Blaise Metreweli)
===========
हे देखील वाचा : Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !
===========
MI6 ची सुरुवात 1909 मध्ये झाली. 1920 पासून या गुप्तचर संघटनेचे नाव MI6 झाले. परदेशात जाऊन देशाताल घडामोडींवर लक्ष ठेवणे, देशातील अंतर्गत दंगली किंवा देशविघातक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे कामही MI6 करते. याच MI6 च्या 18 व्या प्रमुख म्हणून आता ब्लेझ मेट्रेवली काम पहाणार आहेत. त्यांना या नियुक्तीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ही ऐतिहासिक नियुक्ती आहे. MI6 ला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान ब्लेझ सहज पार पाडतील, अशी आशाही स्टारमर यांनी व्यक्त केली आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics