सध्या मनोरंजनविश्वात मेट गालाचेच वारे वाहत आहे. आता ज्यांना मेट गालाबद्दल थोडीफार माहिती असेल त्यांना हे ज्ञात असेल की, हा मेट गाला कार्यक्रम मोठा प्रतिष्ठेचा, ग्लॅमरस आणि महत्वाचा मानला जातो. अतिशय विचित्र फॅशनसाठी देखील हा शो जगप्रसिद्ध आहे. यंदा देखील हा सोहळा न्यूयॉर्कमध्ये संपन्न होत आहे. यावर्षी बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, टॉपची अभिनेत्री कियारा अडवाणी मेट गालामध्ये पदार्पण केले. याशिवाय दिलजीत दोसांझ देखील मेट गालाच्या रेड कार्पेटवर हटके लूकमध्ये दिसला. शिवाय प्रियांका चोप्रा देखील नवरा निकसोबत या इव्हेंटमध्ये स्पॉट झाली. (Met Gala)
मेट गाला (Met Gala) हा दरवर्षी न्यू यॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित केला जाणारा एक प्रसिद्ध फॅशन शो आहे. १९४८ मध्ये या इव्हेंटला सुरुवात झाली. आज हा शो अतिशय मानाचा शो समजला जातो. दरवर्षी या शो साठी विविध थीम ठेवल्या जातात आणि त्याच टीमला अनुसरून सेलिब्रिटी आपला लूक तयार करतात. यंदा २०२५ सालासाठी मेट गालाची थीम ‘सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाइल’आहे, जी काळ्या फॅशन वारशानं प्रेरित आहे. कार्यक्रमाच्या ड्रेस कोडबद्दल सांगायचं झालं तर, ‘टेलर्ड फॉर यू’वर आधारित असेल. दरवर्षी ‘व्होग’ मासिकाकडून वेगवेगळी थीम जाहीर केली जाते. (Met Gala 2025)
मेट गाला या कार्यक्रमाला जगभरातील कला, फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहतात. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी अतिशय विचित्र लूकमध्ये देखील दिसतात. विचित्र फॅशन हे देखील या शोचे मोठे वैशिष्ट्य आहे. मात्र मेट गाला नक्की काय आहे? का या शो ला एवढे महत्व असते? या शो चे नियम कोणते? चला या संपून शोची माहिती जाणून घेऊया. (Marathi)
=======
हे देखील वाचा : Virginia Giuffre : ब्रिटीश राजघराण्याला हादरवणारे स्कॅंडल !
=======
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी न्यूयॉर्कमध्ये हा फॅशन जगतातील ऑस्कर समजला जाणारा भव्य सोहळा आयोजित केला जातो. संपूर्ण जगातील मनोरंजनविश्वातील अनेक नामवंत सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी होतात. या शो ची खास बाब म्हणजे, या कार्यक्रमात फक्त निवडक लोकांनाच आमंत्रण दिले जाते. या संपूर्ण फॅशन इव्हेंटमधून उभारलेला निधी हा ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट’च्या फॅशन प्रदर्शनासाठी वापरला जातो. यासाठीच याला एक चॅरिटी इव्हेंट सुद्धा म्हटलं जातं. (Top Trending Marathi News)
प्रत्येक वर्षी जगभरातील प्रसिद्ध डिझायनर्स आणि ब्रँड्स आपापले कलेक्शन घेऊन मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी न्यूयॉर्क शहरात मेट गालासाठी एकत्र जमतात. हा सोहळा प्रामुख्याने ड्रेस डिझायनिंगमधील क्रिएटिव्हिटी आणि या क्षेत्रातील डिझायनर्सच्या नाविन्यपूर्ण कल्पना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचे प्रदर्शन मांडण्यासाठी आयोजित केला जातो. दरवर्षी या मेट गालासाठी विशिष्ट थीम ठरवली जाते. मोठमोठे ब्रँड अभिनेते, खेळाडू आणि सेलिब्रिटीजच्या माध्यमातून आपले पेहराव या सोहळ्यात सादर करतात. व्होग या मासिकाकडून या सोहळ्याचं आयोजन केलं जातं. फॅशन जगतातील सर्वात हॅपनिंग रात्र असं या मेट गालाच्या सोहळ्याचं वर्णन केलं जातं. (Marathi Top News)
जरी मेट गाला जगभरात खूप पूर्वी सुरू झाला असला तरी 2017 पासून, या फॅशनच्या महामेळाव्यात भारतीय सेलिब्रिटी देखील सहभागी व्हायला सुरुवात झाली. भारताकडून पहिल्यांदाच प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. मागच्या वर्षी आलिया भट्टने या शोमध्ये एन्ट्री घेत आपले मेट गालामध्ये पदार्पण केलं होते. तिने तिच्या साडीतल्या अनोख्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (Marathi Latest News)
=======
हे देखील वाचा :WAVES : मनोरंजनसृष्टीची Waves Summit
=======
यंदाच्या सोहळ्यात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याच्या स्टारडमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुखने सोनेरी नेकलेससह स्टायलिश काळा सूट घातला होता. त्याच्या एका नेकलेसवर त्याच्या नावाची आद्याक्षरे अर्थात ‘SRK’ लिहिलेले दिसत होते तर दुसऱ्यावर ‘K’ अक्षर लिहिलेले दिसले. शाहरुख सोबतच अभिनेत्री कियारा अडवाणी देखील या शोमध्ये कमालीचा भाव खाऊन गेली. तिचा क्युट बेबी बंपसहचा लुक सगळ्यांनाच खूप भावला. कियाराने मदर हार्ट आणि बेबी हार्ट दर्शविणारी चेन घातली होती जी तिच्या बेबी बंपला स्पर्श करत होती. (Top Stories)
पंजाबी गायक आणि संगीतकार असलेल्या दिलजीत दोसांझच्या महाराजा लूक खूपच चर्चेत आला. दिलजीतने प्रबल गुरुंग यांनी डिझाइन केलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्याच्या लूकमधून पंजाबी राजेशाहीची झलक प्रकर्षाने दिसली. दिलजीतच्या पोशाखात कुर्ता आणि लांब अंगरखा होता आणि पगडी होती. तर दुसरीकडे ग्लोबल स्टार अशी ओळख असलेल्या प्रियांका चोप्राने देखील आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंकाने यंदाच्या मेट गालामध्ये पोल्का डॉट सूट ड्रेस परिधान केला होता. प्रियांकाच्या ड्रेसवर प्रतिष्ठित इटालियन हाऊस बव्लगारी मधील आकर्षक दागिन्यांचा समावेश होता. (Marathi News)
शिवाय या मेट गालामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सर्वेसर्वा ईशा अंबानी देखील हटके लूकमध्ये दिसल्या. मेट गालामध्ये ईशा अंबानींच्या लूकची खूपच चर्चा झाली. ईशा यांनी डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. पांढरा नक्षीदार कॉर्सेट, काळी पँट आणि पांढरा केप घातला. एकूणच काय तर २०२५ सालातला मेट गाला इव्हेंट भारतीय सेलेब्ससाठी खूपच चांगला ठरला.